मा.ॲड. रविंद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त ‘सुविचार मंच’ आयोजित
प्रेरणादायी व्याख्यान
व्याख्यानाचा विषय - महाराष्ट्र धर्म
वक्ते - अभिनेते मा.खा.डॅा. अमोलजी कोल्हे
बुधवार, दि.१ जूलै रोजी सायंकाळी ५ वाजता
स्थळ- रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक
सर्वांना उपस्थितीची विनंती.
समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची #सुविचारगौरव पुरस्कारासाठी नावे संयोजक @akashpagar यांनी जाहीर केली असून यात कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनेत्री निवेदिता सराफ, पार्श्वगायिका सावनी रवींद्र व अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा समावेश आहे.
नाशिकचा सर्वात मोठा असा #सुविचारगौरव पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दि.०६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक @akashpagar यांनी दिली आहे.
#नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
१४ व्या वर्षीच्या #देवद्यादेवपणघ्या उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
#गोदावरी नदीचे प्रदुषण रोकण्यासाठी सुमारे २ लाख ५ हजार नाशिककरांनी या उपक्रमांतर्गत मुर्ती सुपुर्द केल्या.
व
यावेळी १ लाख ७० हजार टन निर्माल्य देखील जमा झाले.
मुर्ती व निर्माल्य #नाशिक मनपा यांचेकडे सुपुर्द केले.
#गोदावरी नदीला प्रदुषणापासुन वाचविण्यासाठी #देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी सुमारे २ लाख ५ हजार मुर्ती व १ लाख ७४ हजार मे.टन निर्माल्य देऊन आमच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
#नाशिक येथील या उपक्रमाचे यंदाचे १४ वे वर्ष होते.
#akashpagar
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी आपल्या नाशिकमध्ये सुविचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सव काळात 'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या ‘टी शर्ट्स’चे प्रकाशन माझ्या हस्ते पार पडले.
नाशिकमधील आपल्या कार्यालयात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्रनाना पगार देखील उपस्थित होते. त्यांचे सुपुत्र आकाश पगार यांच्या संयोजनातून हा विधायक उपक्रम पार पडतोय. यावेळी बोलताना, 'देव द्या, देवपण घ्या' या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत असून हे कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गोदावरी नदीच्या रक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे शासनास देखील मदत होत असून सरकारचा मंत्री या नात्याने सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.
यंदाच्या गणेशोत्सवात दीड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी नाशिक शहरातील चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ९ वाजेपासून ‘देव द्या देवपण घ्या’ उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या गोदामातेचे प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करत या उपक्रमात सहभागी व्हावे, असे माझे आवाहन आहे.
यावेळी विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, सुजित सोनवणे, जीत मोरे, ललित पिंगळे, गौरी घाटोळ, प्रणाली शिंदे, राहुल मकवाना, मदन म्हैसधुने, अक्षय नेर, संदिप उफाडे, कुणाल सानप, सोनु जाधव, वैभव बारहाते, योगेश निमसे, विकास धरम, शुभम पगार, प्रसाद हिरे, सचिन पवार, योगेश माळोदे, किशोर वाघ, शरद पगार, किरण शिंदे, जयंत सोनवणे, युवराज कुरकुरे, शुभम पाटील, युवराज कुरकुरे, चेतन आहिरे, प्रज्वल गुंजाळ, मयुर पाटील, अधिराज आपसुंदे, राहुल मोरे, संतोष सानप, आकाश शिंदे, प्रभाकर देवरे, जयेश आढाव, सुशिल डोंगरे, राहुल साठे, वैभव भालेराव, सौरभ वरपे, पंकज शिंदे, सुरेंद्र आहिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
#Nashik #PollutionFreeCity #Maharashtra
देव द्या,देवपण घ्या ! उपक्रमास उत्साहात सुरुवात
#गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी १४ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या #देवद्यादेवपणघ्या उपक्रमांतर्गत घरगुती गणेशोत्सवातील ५ दिवसाच्या मूर्तींचे संकलन करून उपक्रमास सुरुवात झाली आहे.
#ecofriendly#nashik#akashpagar#नाशिक
#देवद्यादेवपणघ्या ! या उपक्रमांतर्गत नाशिककरांमध्ये जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेते अभिजीत खांडकेकर यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. @ravindrappagar यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
#ravindrapagar#akashpagar
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावरील रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे #गोदावरी नदी व इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे हि नम्र विनंती.
#नाशिक#देवद्यादेवपणघ्या#godavari#akashpagar#nashik