विरोधकांनी "वोट चोरी" चा आरोप करण्याआधी हे आकडे बघा 👇
✅ 95 कोटींपैकी 82 कोटी मतदारांनी स्वतः फॉर्म भरला.
✅ फॉर्म-7 ने फक्त 29 लाख नावे वगळली, 2 कोटींहून अधिक नावे जोडली गेली.
✅ सर्वोच्च न्यायालयाने SIR ची वैधता कायम ठेवली.
मात्र राहुल गांधींना काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तर त्यांच्या कडे नाही.
आज देशात अत्यंत धोकादायक आणि गंभीर परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशातील 140 कोटी जनता, जी सुख-शांतीने भारताच्या विकासात योगदान देत आहे, तिला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आणि हे कोण करत आहे? हे दोन अराजकवादी गट आहेत. त्यांपैकी एकाचे नेतृत्व ‘INDI आघाडी'चे नेते राहुल गांधी करत आहेत आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व अरविंद केजरीवाल यांचे सहकारी CJP करत आहेत.
मी या दोन्ही गटांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, भारताचे सुजाण नागरिक तुमच्या या उद्दिष्टांकडे बारका���ने लक्ष ठेवून आहे.
आज तुमची ही जी अराजकतेची स्पर्धा सुरू आहे ना, की “या देशात कोण अधिक अस्थिरता निर्माण करू शकतो?” तुमचे हे मनसुबे आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही.
जनतेने ��्यांना पूर्णपणे नाकारले आहे, मग ते राहुल गांधींची 'इंडी आघाडी असो किंवा अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष असो.
जेव्हा जनतेने त्यांना नाकारले आणि लोकशाही मार्गाने त्यांना शिक्षा दिली, तेव्हा तो कौल स्वीकारून त्यातून धडा घेण्याऐवजी, त्यांनी देशाला अस्थिर करण्याचा कट रचला.
मला स्पष्ट करायचे आहे की हा प्रयत्न त्यांच्या राजकीय उद्दिष्टांबरोबरच परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर होत आहे. देश पू���्णपणे विकासाच्या मार्गावर पुढे वाटचाल करत आहे आणि सततच्या जागतिक संकटांनंतरही आज निरंतर प्रगतीच्या दिशेने अग्रेसर आहे.
परंतु ही गोष्ट तुम्हा सर्वांना रुचत नाही. तुम्हाला भारताचा विकास, भारताची प्रगती आणि भारताची उन्नती पचवता येत नाही.
आज भारत ज्या प्रकारे एक आत्मनिर्भर आणि सशक्त राष्ट्र म्हणून प्रगती करत आहे, ते तुम्हाला पाहवत नाही; आणि परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर तुम्ही देशाला अस��थिर करण्याचा जो प्रयत्न करत आहात, त्याबाबत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की भारताच्या लोकशाहीत प्रचंड सामर्थ्य आहे. आमचे ��र्व देशभक्त आणि राष्ट्रप्रेमी एकत्र येऊन तुमच्या या शक्तींना परतवून लावतील आणि तुमचे मनसुबे उधळून लावतील.
गेल्या १२ वर्षांत, पंतप्रधानांच्या नेतृत्वात आम्ही देशातील भीतीचे वातावरण दूर करून, दहशतवाद मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. तरीही, 'अर्बन नक्षल' (शहरी नक्षलवादी) मानसिकता असलेले काही लोक अजूनही आहेत, ज�� देशाला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहेत.
राहुल गांधीजी, तुमचे हे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि INDI आघाडीचे लोक ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करत आहेत, तथाकथित युवा नेतृत्व ज्या भाषेचा वापर करत आहे, त्याकडेही भारताचा युवा पिढीचं लक्ष आहे.
भारताची युवा पिढी भारतीय संस्कृती आणि लोकशाहीशी जोडलेली आहे, भारताच्या संविधानाप्रती त्याची बांधिलकी दृढ आहे, आणि ��्हणूनच तुमची अराजकतावादी भाषा भारताची जनता कधीही स्वीकारणार नाही.
तुम्ही या देशाच्या संवैधानिक संस्था आणि लोकशाहीला यांना ज्या प्रकारे तुम्ही आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहात, तसेच देशातील सर्वोच्च पदांवर असलेल्या व्यक्तींबद्दल जी अनादराची भाषा तुम्ही वापरत आहात, ते या देशातील १४० कोटी जनता कधीही स्वीकारणार नाही आणि याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील.
परंतु त्याचबरोबर, आज मी तुम्हाला हा स्पष्ट इशाराही देतो की ज्या परकीय शक्तींच्या बळावर तुम्ही तुमचे विकाऊ राजकारण करत आहात आणि त्यांच्याशी संगनमत करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहात, तुमचे ते ��ाईट हेतू कधीही पूर्ण होणार नाहीत.
खोटेपणाच्या आधारे संविधानाच्या नावाखाली लोकशाहीला आव्हान देणे, हा जनादेशाचा अपमान आहे.
देशातील जनतेने ज्यांना जनादेश दिला आणि ज्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, तेच देशाचे नेतृत्व करत आहेत.
विविध राज्यांमध्ये तुमचा वारंवार झालेला पराभव आणि त्यातून निर्माण झालेली तुमची निराशा हेच दर्शवते की, हा देश शांततेने पुढे जावे असे तुम्हाला वाटत नाही.
परंतु आज मी तुम्हाला इशारा देतो की भारतीय जनता पार्टी आणि देशातील राष्ट्रभक्त जनताच तुम्हाला याचे चोख उत्तर देईल.
आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत, त्यांचा भारत सरकार कठोरपणे सामना करेल; शि��ाय, भाजपचे कार्यकर्ते जनतेच्या मध्ये राहून तुमचे हे मनसुबे हाणून पाडतील.
आज नव्या भारताच्या उभारणीत पंतप्रधान मोदीजी ज्या प्रकारे झटत आहेत आणि देशातील 140 कोटी जनतेचा जो विश्वास त्यांना मिळत आहे, त्याच्या बळावर आम्ही भारतातील जनतेला स्पष्टपणे हा विश्वास देतो की आम्ही देशाच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत.
आम्ही हे सुनिश्चित करू की देशातील जनता शांतता आणि विकासाच्या मार्गावर पुढे जाईल, आणि तुम्ही दिलेल्या विश्वासाच्या बळावर आपण सर्वजण मिळून विकसित भारताचे स्वप्न साकार करू.
देशांतर्गत किंवा देशाबाहेर सक्रिय असलेल्या सर्व देशविघातक शक्तींचा आम्ही अत्यंत कठोरपणे सामना करू.
उत्सव हिंदवी स्वराज्याचा… जागर श्री जगदंबेचा…!
श्री दुर्गामाता दौड २०२६
छत्रपती शिवाज��� महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास, शौर्य, पराक्रम आणि आई जगदंबेच्या भक्तीचा जागर करण्यासाठी सज्ज होऊया!
सकल हिंदू समाज, महादेववाडी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुणे यांच्या संयुक्त आयोजनातून घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत आयोजित श्री दुर्गामाता दौडीत सहभागी होऊन हिंदू संस्कृती, धर्माभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करूया.
कालावधी: रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६
वेळ: दररोज सकाळी ६:०० वाजता
जय भवानी! जय शिवाजी!
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या 'उ���्योग प्रकोष्ठ प्रदेश संयोजक व सह संयोजक' पदी पुढील प्र��ाणे नियुक्ती जाहीर केली आहे.
सन्मानीय पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🪷
#BJP #Maharashtra
अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!
आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि प्रत्येक भूमिकेत जीव ओतून ती व्यक्तिरेखा अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टी��ी मोठी हानी झाली आहे.
रंगभूमीपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणारा हा असामान्य कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला.
नाना पाटेकर हे नाव कायमच अभिनयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती
📍 पुणे
सेवेची २५ वर्षे… संकल्प विकसित भारताचा!
२५ वर्षांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारत सुरू झालेला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदीजींच्या सार्वजनिक जीवनातील प्रवास आज राष्ट्रसेवेच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे.
या २५ वर्षांच्���ा राष्ट्रसेवेच्या पर्वानिमित्त पुणे शहरात ‘सेवा ज्योती यात्रा’ आणि ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न झाली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ, मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते मा. श्री. प्रकाशजी जावडेकर, आमदार श्री. सिद्धार्थजी शिरोळे, महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, आमदार सुनीलजी कांबळे, माजी आमदार श्री. जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमालेजी, शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे,सभागृह नेते, पुणे मनपा. गणेशजी मधुकर बिडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“We Will Do It” या आत्मविश्वासपूर्ण संदेशातून २०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्येयासाठी सामूहिक प्रयत्नांची प्रेरणा मिळाली.
सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाच्या या २५ वर्षांच्या प्रवासाला अभिवादन करत, विकसित भारताच्या संकल्पासाठी आपला सहभाग आणि योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
मशाल यात्रेच्या भव्य नियोजनाची पूर्वतयारी!
देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्��� पुण्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून प्रदीर्घ काळ, अशी सलग दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी अखंड आणि निस्वार्थ लोकसेवा केली आहे. त्यांच्या याच ऐतिहासिक विकासपर्वाचा आणि राष्ट्रसमर्पणाचा गौरव करण्यासाठी विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच निमित्ताने येत्या ७ तारखेला शहरातील प्रत्येक प्रभागात भव्य ‘मशाल यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे व याची सांगता शुभारंभ हॉल येथे होणार आहे, याच दिवशी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी स��्वांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज जी घाटे, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, भाजपा प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष श्री. दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा मनिषाताई ल��कत, सर्व सरचिटणीस, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
@narendramodi
@ChDadaPatil @DheerajGhate @GaneshBidkarBJP @BJP4Maharashtra
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या ���ेंद्रीय निवडणूक समितीने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांना निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! मतदारांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आपण निश्चितच विजयी यश संपादन कराल, असा विश्वास आहे.
#BJP #BJP4Maharashtra #VidhanParishadElection #Maharashtra #भाजपा
@narendramodi
@PMOIndia
@AmitShah
@NitinNabin
@blsanthosh
@tarunchughbjp
@BJP4India
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra
काळेपडळ ,होळकरवाडी, महालक्ष्मी वनालिका सोसायटी, हांडेवाडी येथे नागरिकांच्या ड्रेनेज समस्येबाबत संबंधित अधिकारी मा.संजय गायकवाड साहेब, सौ.आशालता साळवे मॅडम व मा. संदेश शिर्केसाहेब यांच्यासोबत प्रत्यक्ष पाह���ी केली.
परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेत, ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
@pmccarepune @PMCPune
संस्कृतीचा वारसा, नव्या युगाची ताकद... आपली मायमराठी!
संतांची वाणी आणि शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा जपणाऱ्या आपल्या मायबोलीला मिळालेला 'अभिजात दर्जा' हा प्रत्येक मराठी माणसाचा सन्मान आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सत्य व अहिंसा या मूल्यांवर आधारित सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर नेणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती.
शांततेचे व अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधींचा देश अशीच आजही भारताची जगभरात ओळख आहे. त्यांच्या शिकवणीचा सर्व देशवासीयांनी अव���ंब करणे हेच आजच्या काळात महात्मा गांधींना खरे अभिवादन ठरेल. महात्मा गांधीजी यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !
भावपूर्ण श्रध्दांजली
दिवेआगार (रायगड) इथं सहलीसाठी गेलेल्या आळंदी येथील खासगी क्लासच्या ८ विद्यार्थ्यांचा पोहण्यासाठी गेले असताना समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
या दुःखातून सावर��्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
पुणे-ओकायामा '��िस्टर सिटी' संबंधांना २० वर्षे पूर्ण होत
असताना, जपान दौऱ्यात ओकायामा प्रीफेक्चरचे गव्हर्नर रि��ुता इबालागी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुणे आणि ओकायामा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासोबतच विविध विकासात्मक विषयांवर चर्चा केली.
जपानी उद्योजकांनी पुण्यात गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले. तसेच पुण्यात जपानी भाषा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, स्मार्ट अॅग्रीकल्चर, आयुर्वेद व वेलनेस तसेच उद्योग-गुंतवणुकीच्या नव्या संधींबाबत विचारविनिमय करण्यात आला.
पुणे-जपान मैत्री अधिक दृढ करत पुण्याच्या विकासासाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.
अशोकजी म्हणायचे की, हिंदू धर्म जगापर्यंत पोहोचवण्यामागे आपण हिंदू आहोत, या अभिमानाची भावना असण्यासोबतच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची चिंता करणारी विचारधारा हिंदू धर्म���त आहे, हा व्यापक विचार जगापर्यंत पोहोचला पाहिजे. - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah जी