महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील २५८ शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचे निवेदन त्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेऊन दिले.पुढील आठ दिवसांमध्ये उमेदवारांची वैद्यकीय तपासणी,पोलीस पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये ज्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासणीत मानवी चुका किंवा गंभीर त्रुटींचे पुरावे आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिकांचे तातडीने Revaluation + Retotaling करा.
संपूर्ण निकाल रद्द करून सर्व 438 पात्र उमेदवारांना पुन्हा अनिश्चिततेत ढकलण्याचा निर्णय घेण्याऐवजी त्रुटींचे पुरावे असलेल्या उमेदवारांचे Revaluation + Retotaling करावे. त्यातून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीची संधी द्यावी. आधीच पात्र ठरलेल्या 438 उमेदवारांच्या मुलाखती तातडीने घ्याव्यात. संपूर्ण प्रक्रिया अनावश्यकपणे 5-6 महिने लांबवू नये.
विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे, आणखी विलंब नाही.
MPSC ने निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे भविष्य आणि वेळ दोन्ही वाचवले पाहिजेत.
@INCMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MPSC #Rajyaseva2025 #dhananjayshinde #ChhatronKiGoonj
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत आयोगाकडून मानवी चुका झाल्याचे पुरावे समोर आले होते. हे पुरावे आम्ही आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा Revaluation + Retotaling ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका होती.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मात्र संपूर्ण मुख्य परीक्षेचाच निकाल रद्द करून सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करावं, अशी अव्यवहार्य मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही ती मान्य केली. त्यामुळं या प्रक्रियेला पुन्हा किमान पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शिवाय आधीच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सुमारे ४३८ विद्यार्थ्यांचं भवितव्यही अधांतरी असून याबाबत ते कोर्टातही जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचं Revaluation+Retotaling करून यातून जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांना अगोदरच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४३८ मुलांसोबत मुलाखतीची संधी उपलब्ध करून देणं हाच पर्याय योग्य आहे. अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #JusticeForStudents #StudentsFirst
MPSC मधून Telegram चॅनेलपर्यंत प्रश्नपत्रिका अथवा परीक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पोहोचत असल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. ‘व्यवस्था’ नेमकी कोणाची आणि कशासाठी, याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे.
फक्त Telegram चॅनेलवर कारवाई करून भागणार नाही; माहितीचा स्रोत शोधून संपूर्ण साखळी उघड झाली पाहिजे. Telegram चॅनेल्स/हँडल्सवरही कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी आणि दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
@mpsc_office
#MPSC #MPSC_PaperLeak #PaperLeak
महाराष्ट्र कृषी सेवा निवड झालेले उमेदवार नेहमीच नियुक्तीसाठी संघर्ष करत आले आहेत.
पण यावेळी शासन आमच्यासोबत न्याय करेल आणि आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देईल, असा विश्वास आहे. 🌱🤝
#महाराष्ट्रकृषीसेवा2024@Dhananjay4INC
@mpsc_office अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभार. आम्ही सर्व निवड झालेले उमेदवार आयोगाचे ऋणी आहोत. नम्र विनंती आहे की, शिफारस यादी शासनाकडे लवकरात लवकर पाठवावी, जेणेकरून नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.पुन्हा एकदा आयोगाचेमनःपूर्वकआभार