Heartiest congratulations to all the young guys and girls. It is because of your determination that this high-handed government finally backed down.
What you and your parents have endured for the last 36 days is difficult to even imagine. The Maharashtra Navnirman Sena stood firmly by your side throughout this struggle and will continue to do so.
To celebrate this hard-earned victory, let us gather tomorrow, as planned, at 10:00 a.m. at Veer Savarkar Marg, Shivaji Park. Bring your families along and join us in celebrating this historic achievement.
This victory belongs to you.
Raj Thackeray |
BJP IT सेल अजूनही त्याच रटाळ पॅटर्न मध्ये आहे !
पांचट विनोद, मुद्दा भरकटवणे, मॉर्फ फोटो, कथा सांगणे (मी अमुक अमुक ठिकाणी गेले असता अनुभव आला/ माझा ६ वर्षाचा भाचा मला प्रश्न विचारत होता), कंटाळवाणी ट्रोलिंग, पोलिसांच्या नावाने धमक्या देणे, देशद्रोही, हिंदू, पाकिस्तान, चायनीज एजंट, लवंग वेलदोडे वगैरे वगैरे...
अरे मुर्खांनो तुमची पूर्ण IT सेल स्कॅन केली आहे GenZ ने. ते वेगळ्या प्लॅटफॉर्म वर Humour ने
खेळत आहेत, बावळट लोकांनो पक्षाचे पैसे (चोरीचे) वाया घालवत आहात तुम्ही.
#BJP IT सेल
तुमचा Nokia झालाय!
शर्मिला ठाकरे 🔥
निर्दयी सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर स्वतः शर्मिला ठाकरेंनी जागेवर कार्यकर्ते सोडवले.
#NarendraModi_Must_Resign
आम्ही ज्या प्रदेशात जाऊ, ज्या देशात जाऊ, आम्ही तिथल्या भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान करू, ती स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करू आणि तिथे आमच्याकडून कोणताही उपद्रव होणार नाही याची जबाबदारी घेऊ, कारण तेवढे संस्कार आमच्यात आहेत.
पण आमची मूळ ओळख ही #मराठी च राहणार!
राज ठाकरे यांनी काँग्रेस सत्तेत असताना "तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम रहा, जग तुमची दखल घेईल" हे जाहीर भाषणात म्हटले होते, तेव्हा काँग्रेसला त्याचा अर्थ कळाला नव्हता. आज काँग्रेस सत्तेत नसताना काँग्रेसला राजसाहेबांच्या त्याच वाक्याचा अर्थ कळतोय.
राज ठाकरे थोडे उशिराच कळतात!
मनसे चे फक्त ६ नगरसेवक आलेत असे सुपर महापौर अमीत साटम बोंबलत सुटलेत तर तीच कॅसेट डमी महापौर रितू तावडे सुध्दा वाजवत आहेत.
पण एक चागलं आहे, सत्ताधारी ह्यांच्या टीकेने मनसे चे कॅडर अजूनच अँक्टिव्ह होत आहे. आता तुमच्या कारभाराची पोलखोल अजून जोरात होणार आणि ती मनसे करणार. पाहत रहा.
हे राज्यात आणि केंद्रात मंत्री होते, सध्या ते लोकसभा खासदार आहेत यांना साध CIBIL काय असतो हे माहित नाही अन् यांचा वारसा चालवणारे नितेश राणे अर्थशास्त्रावर इतरांवर टीका करत आहेत.
अडाणी भाजपमध्ये असे असे नग आहेत जे म्हणतात आपण २ रुपयाला १ रुपया मानू म्हणजे डॉलर ४५ वर येईल.
कधी कधी वाटतं कोणासाठी लढायचं?
ज्यांच्यासाठी लढायचं आहे? त्यांनाच त्यांचं काहीही सोयरं सुतक नाही.
आपल्या जमिनी जात आहेत, आपला मराठी टक्का कमी होतोय, आपली भाषा पायदळी तुडवली जात आहे, आपलीच मराठी माणसे मार खात आहेत, मराठी शाळा बंद होत आहेत
आणि मराठी माणूस अतिशय थंड आहे.....
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच.
अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत.
आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.
सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत !
प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा.
तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.
बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच !
स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !
धन्यवाद !
आपला नम्र
राज ठाकरे
तुम्हाला आणि सर्व मराठी माणसांना जागतिक मातृभाषा दिनाच्या (आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन) मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#मायमराठी ही फक्त भाषा नाही, तर आपली ओळख, संस्कृती आणि हृदयाचा ठोका आहे.
मराठी शाळा हीच तर मातृभाषेची खरी पाळणा आहे, जिथे बालपण रंगवले जाते, स्वप्ने उमलतात आणि मायमराठीचा अभिमान जपला जातो.
मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मराठी शाळा मराठी शाळा, माझी आईसारखी शब्द शिकवते, प्रेम लावते मनात अ अ आ आ क का की कू
मातृभाषेचा गोडवा भरतो कानात दिवसभर खेळ, गाणी, गोष्टी, ज्ञानेश्वर-तुकाराम येतात जवळ शाळेच्या अंगणात फुलतो अभिमान
मराठी बोलतो, जग जिंकतो सगळं!
मायमराठी जपू, शाळा वाचवू पुढच्या पिढीला हा वारसा देऊ जागतिक मातृभाषा दिनी वचन देतो
मराठी शाळेतूनच उज्ज्वल भविष्य घेऊ!
एकत्र #मायमराठी चा जयघोष करूया!
जय मातृभाषा! जय महाराष्ट्र!!
#मराठी #महाराष्ट्र
@JyotiPa84626226@maharastriyana3@thhakre70183
इथे प्रत्येक घटकाला टोपी घातली जाते तर !
सध्या राज्यात मुस्लिमांना आरक्षण कागदावर होते , म्हणजे प्रस्ताव होता. ते मिळत नव्हते. मात्र त्या न मिळणाऱ्या आरक्षणात खोडा घातला म्हणून तेव्हाचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी विधानसभेत मुस्मिलांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला होता हे विसरून जमणार नाही. #मुस्लिम_आरक्षण
तेजस ठाकरे हे सध्या राजकारणात नाहीत, ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत असतात.
आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते इस्पितळात भरती आहेत , काही तासांत डिस्चार्ज होतील. मात्र राजकारणात नसलेल्या व्यक्तीबाबत देखील भक्त मंडळींकडून ज्या पद्धतीची विकृत टीका होते ते शोभनीय नाही.
राज ठाकरेंनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही भाजपकडे ?
🔸रझा अकादमी दंगलवेळी भाजप कुठे होती?
🔸मोदी सरकार आल्यानंतर गोमांस एक्स्पोर्ट मध्ये ९ वरून २ नंबरवर कसे आलो ?
🔸कावड यात्रेत अश्लील नृत्य करणे ही आपली धर्मसंस्कृती आहे का?
🔸संघ अराजकीय असेल तर राजकारणात का पडतोय ?
प्रति श्री. मोहन भागवत,
अलीकडे काही वक्तव्यांमधून स्थानिक भाषांपेक्षा इतर भाषांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली जात आहे.
मात्र महाराष्ट्राची माती, संस्कृती आणि इतिहास यांचा विचार केला तर मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून आपल्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा कणा आहे.
त्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर किंवा तिच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे राहणे हे कुठल्याही मराठी माणसाला मान्य होऊ शकत नाही.
मराठी ही संतांची, शिवरायांची आणि समाजसुधारकांची भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या अभंगातून अध्यात्म तर लोकमान्य टिळक, फुले, आंबेडकर यांच्या विचारातून सामाजिक परिवर्तनाची ताकद या भाषेनेच दिली. ही भाषा केवळ शब्दांची मांडणी नाही, तर इतिहास, संस्कार आणि संघर्षांची साक्ष आहे.
आज जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे गरजेचे आहे, यात शंका नाही. परंतु त्यासाठी मातृभाषेला दुय्यम स्थान देणे योग्य नाही.
आपली मूळ ओळख जपूनच आपण इतर भाषा आत्मसात करू शकतो. ज्या समाजाने आपली भाषा विसरली, त्याची संस्कृती आणि परंपरा हळूहळू लुप्त होते, हे इतिहासाने दाखवून दिले आहे.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठीला मान देणे, शासकीय कामकाजात, शिक्षणात आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषा जपणे म्हणजे कोणाच्याही विरोधात जाणे नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा सन्मान करणे होय.
मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपला स्वाभिमान आहे. ती टिकली तरच आपली ओळख टिकेल. म्हणूनच प्रत्येकाने अभिमानाने म्हणावे.
"मराठी माझी मातृभाषा, माझा श्वास आणि माझा अभिमान!"
#मराठी #महाराष्ट्र @mnsadhikrut@mnsreport9