इंग्रजी सुधारायचे आहे-
आजच्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय, तंत्रज्ञानाच्या जगात इंग्रजीचे महत्त्व मोठे आहे. अनेक मराठी तरुणांना इंग्रजी समजते आणि वाचताही येते, पण बोलताना अडखळतात. याचे कारण ज्ञानाचा अभाव नसून प्रत्यक्ष संभाषणाचा अपुरा सराव हे आहे.
आपल्या शिक्षणपद्धतीत वाचन, लेखन आणि व्याकरणावर भर दिला जातो, परंतु बोलण्याची संधी कमी मिळते. म्हणून इंग्रजी सुधारण्यासाठी केवळ अभ्यास न करता त्याचा नियमित वापर करणे आवश्यक आहे.
१. चुका होण्याची भीती सोडा
लोक हसतील का? उच्चार चुकेल का? या भीतीमुळे अनेक जण इंग्रजी बोलणे टाळतात. परंतु पाण्यात उतरल्याशिवाय पोहणे व सरावाशिवाय इंग्लिश बोलणे अशक्य असते. सुरुवातीला छोटी, अपूर्ण वाक्ये बोलली तरी हरकत नाही. सातत्याने बोलल्यानेच अचूकता येते.
२. रोजच्या कृती इंग्रजीत सांगा
आपल्या रोजच्या कृती इंग्रजीत व्यक्त करा
- I am getting ready for the office.
- I have an important meeting today.
- I need to finish this work before lunch.
आपण काय करत आहोत, काय विचार करत आहोत किंवा पुढे काय करणार आहोत, हे स्वतःशी इंग्रजीत बोला. या ‘Self-talk’ तंत्रामुळे कोणाच्याही मदतीशिवाय नियमित सराव करता येतो.
३. शब्दांपेक्षा वाक्यांश शिका
स्वतंत्र शब्द पाठ करण्याऐवजी उपयोगी वाक्यांश शिका
-In my opinion
-Let me think about it.
-Could you please explain?
-I completely agree.
-I am not sure, but…
असे तयार वाक्यांश लक्षात असल्यास बोलताना प्रत्येक शब्द स्वतंत्रपणे शोधावा लागत नाही. त्यामुळे संवाद अधिक सहज होतो.
४. मराठीतून शब्दशः भाषांतर टाळा
प्रत्येक विचार आधी मराठीत तयार करून नंतर त्याचे इंग्रजी भाषांतर केल्याने बोलण्याचा वेग कमी होतो. छोट्या गोष्टींचा थेट इंग्रजीत विचार करा. उदाहरणार्थ, “आज वातावरण प्रसन्न आहे” याचा विचार थेट “The weather is pleasant today” असा करा. सुरुवातीला छोटे विचार आणि नंतर पूर्ण वाक्ये इंग्रजीत तयार करा.
५. ‘Shadowing’ तंत्र
एखादी इंग्रजी बातमी, मुलाखत, छोटा व्हिडिओ ऐका. वक्त्याने बोललेले वाक्य त्याच लयीत आणि उच्चारांसह पुन्हा म्हणा. सुरुवातीला ३० सेकंदांचा व्हिडिओ निवडा. तो इंग्रजी उपशीर्षकांसह दोनदा ऐका आणि नंतर वक्त्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा.
दररोज दहा मिनिटांच्या या सरावाने उच्चार, ऐकण्याची क्षमता, बोलण्याचा वेग आणि आत्मविश्वास सुधारतो.
६. स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा
दररोज एखाद्या साध्या विषयावर एक-दोन मिनिटे इंग्रजीत बोलून मोबाईलवर रेकॉर्ड करा
My family, My work, What I learned today, My plans for tomorrow.
रेकॉर्डिंग ऐकून आपण कुठे अडखळतो, कोणते शब्द वारंवार वापरतो आणि कोणते उच्चार अस्पष्ट आहेत, हे समजते. आठवड्यानंतर त्याच विषयावर पुन्हा बोलल्यास आपली प्रगती जाणवते.
७. आवश्यक तेवढे व्याकरण पक्के करा
स्पोकन इंग्लिशसाठी व्याकरणाचे सर्व गुंतागुंतीचे नियम पाठ करण्याची गरज नाही. वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ, प्रश्न व नकारार्थी वाक्ये, तसेच is–am–are, do–does–did, have–has–had आणि can–could–should यांचा वापर व्यवस्थित समजून घ्या.
प्रत्येक नियमासाठी स्वतःच्या जीवनाशी संबंधित काही वाक्ये तयार करा.
८. चारही कौशल्यांचा सराव करा
इंग्रजी सुधारण्यासाठी वाचन, श्रवण, लेखन, संभाषण यांची सांगड घाला
-दररोज एक छोटा इंग्रजी लेख वाचा.
-दहा मिनिटे इंग्रजी बातमी किंवा मुलाखत ऐका.
-दिवसातील अनुभव पाच वाक्यांत लिहा.
-मित्राबरोबर पाच मिनिटे इंग्रजीत बोला.
नवीन शब्दाचा केवळ अर्थ पाहू नका. तो वाक्यात वापरा. वापरलेले शब्दच शब्दसंग्रहाचा भाग बनतात.
९. मित्र आणि तंत्रज्ञानाची मदत घ्या
इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या मित्राबरोबर दररोज दहा मिनिटे इंग्रजीत संवाद साधा. चुकल्यास संभाषण थांबवू नका. चर्चा संपल्यानंतर महत्त्वाच्या चुका दुरुस्त करा.
मोबाईलची भाषा इंग्रजी करा. शब्दकोशातून शब्दांचे उच्चार आणि उपयोग समजून घ्या. AI किंवा भाषा-अभ्यासाच्या अॅपचा वापर संभाषण.
लहेजावर लाजू नका. विदेशी उच्चारांची नक्कल करण्यापेक्षा शब्द स्पष्ट बोलणे, योग्य ठिकाणी थांबणे आणि आत्मविश्वासाने विचार मांडणे महत्त्वाचे आहे.
रोज ३० मिनिटांचा सराव
* ५ मिनिटे -इंग्रजी परिच्छेद मोठ्याने वाचा.
* ५ मिनिटे -पाच उपयोगी वाक्यांश शिका.
* १० मिनिटे -व्हिडिओ ऐकून ‘Shadowing’ करा.
* ५ मिनिटे -इंग्रजीत बोलून आवाज रेकॉर्ड करा.
* ५ मिनिटे -दिवसाचा अनुभव इंग्रजीत लिहा.
हा सराव सलग नव्वद दिवस केल्यास ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन आणि आत्मविश्वास या सर्वांमध्ये सुधारणा दिसेल.
इंग्रजी म्हणजे बुद्धिमत्ता नसून ते फक्त सरावाने विकसित होणारे संवादकौशल्य आहे. दररोज ऐका, थोडे वाचा, थोडे लिहा आणि भरपूर बोला!
डॉ प्रशांत भामरे.
@dr_prashantsb Sir, please write an article on how to improve English. Your articles are always inspiring and make us think. It would be really helpful.
आराम, निवांतपणा, सहजस्थिती हे सर्वात मोठे व्यसन आहे. एकदा आपण त्याचा अनुभव घेतला की ते आपल्याला अजिबात सोडत नाही. त्याची नशा, ग्लानी अशी येते की त्या ग्रीप मधून चांगले चांगले बाहेर पडू शकत नाहीत.
एकदा तुम्ही आरामपासंद झालात की आपोआप तुम्ही सामान्य गर्दीचा भाग होऊन जातात.
जेव्हा तुम्ही या कंफर्ट झोनमध्ये मस्त असतात तेव्हा तुम्ही ज्या ज्या बाबींसाठीची निसर्गतः पात्रता/ योग्यता धारण करत असतात त्या सर्व जागा कोणीतरी इतर भरून काढत असते.
कंफर्ट झोन दुहेरी काम करते. एकतर ते तुम्हाला त्यातून अजिबात बाहेर पडू देत नाही आणि दुसरे ते तुमच्या मूळ क्षमता/ पात्रता/ योग्यता आणि आत्मविश्वास कमीकमी करत जाते.
कंफर्ट झोनच्या रिंगणातून बाहेर पाहिले असता बहुतांश आणि बऱ्याचदा सर्वच गोष्टी अशक्य नसतानाही अशक्य वाटतात.
साहस, धैर्य, डॉशिंग वृत्तीवरचा हमखास रामबाण उतारा म्हणजे कंफर्ट झोन.
असामान्य, इतरांपेक्षा अधिक चांगले, यशस्वी होण्याच्या दुष्प्रवृत्तीला थांबविण्यासाठी सर्वात प्रभावी औषध म्हणजे कंफर्ट झोन हे आहे.
डॉ प्रशांत भामरे.
“तुझ्यासारख्या सरळ माणसाचा
ना हा धंदा विद्यानंदा,
ओळख इथल्या आनंदी आनंदा…”
विद्यानंद बापट यांच्यासाठी अवधूत गुप्ते यांचे खास गीत...ऐका… आणि... आवाज पुढे पोहोचवा !#विद्यानंदबापट#अवधूतगुप्ते#स्वच्छविचार
Women are the strength of India - its foundation, its present, and its future.
You belong to no one but yourself.
Be loud. Be proud. Fight for your space.
Smash the patriarchy!
#ChhatronKiGoonj