@Core_punekar तुम्ही UBT समर्थक आहात का ?
शिंदे-फडणवीस यांचे शांततेत चालू आहे, तर तुम्ही का त्यात पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल सगळे टाकून स्पोर्ट घडत आहात??
@shubham_9909 आदित्य 8000 मतांनी वाचला आहे. कुठे त्या मूर्खाच्या नादी लागता!!!
त्यांच्या पक्षाला आमदार गेले, खासदार गेले तरी त्याचा बाप बोलतो," जात��त तर जाऊ दे"
पण नंतर निवडून येण्यासाठी 2029 किवा 2034 ची वाट पहावी लागेल इतके पण यांच्या "खोपड़ीत" घुसत नाही.
UBT म्हणजे मूर्खाचा बाजार.....
अगदी बरोबर. UBT गटाला त्यांचे आमदार खासदार सांभाळता येत नाहीत तर ते "धगधगती मशाल" काय सांभाळणार?
उद्धव ठाकरे यांनी धगधगती मशाल कशी धरली होती हे पाहिलेले आहे.
त्यांना एक ice-cream कोन हे चिन्ह देऊन आमची धगधगती मशाल आम्हाला परत देण्यात यावी @ECISVEEP@SpokespersonECI@CEO_Maharashtra
@CMOMaharashtra@hmo_maharashtra@DGPMaharashtra@Thane_R_Police@ThaneCityPolice@SPNashikRural
*बक्कल खानविरोधात मोक्का कारवाईची मागणी; विविध पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा दाखला देत सोशल मीडियावर खुले आवाहन*
*मुंबई/ठाणे* /- अब्दुल हकीम जमीरुल्लाह खान उर्फ बक्कल खान आणि त्याच्या कथित संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत एका व्यक्तीने सोशल मीडिया व्यासपीठावर खुले आवाहन केले आहे. या आवाहनात ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि नाशिक ग्रामीण येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांव���ही गंभीर आरोप करण्यात आले असून, बक्कल खानविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार, बक्कल खान याने स्वतःच्या आणि त्याच्या कथित संघटित टोळीच्या माध्यमातून वजन काट्यांमध्ये हेराफेरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवला असून, हजारो कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, त्याच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्व��ूपाचे गुन्हे दाखल असून काही प्रकरणांत तो फरार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
आरोपकर्त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३१६(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल असून संबंधित आरोपी अद्याप फरार आहे. तसेच शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२०/२०२५ अंतर्गत कल�� ३१६(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ अंतर्गत कलम ३१६(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल असून आरोपी फरार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, कासारवडवली पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक १०३७/२०२३ अंतर्गत भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ५०७ प्रमाणे नोंद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयातील दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३७/२०२२ अंतर्गत कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ तसेच गुन्हा क्रमांक ४२०/२०१५ अंतर्गत कलम ३९४, ३२६, ३६७, ३४२, १४१, १४२, १४३, १४७, ५०४ आणि ५०६(२) अन्वये गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७९/२०२१ अंतर्गत कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७ आणि ३४२ अन्वये गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८०/२०२० अंतर्गत कलम ४०७, ४११ आणि ३४, तर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३०/२०१४ अंतर्गत कलम ३७९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या डीसीबी-सीआयडी युनिट ३ मध्ये गुन्हा क्रमांक ३८/२०२२ अंतर्गत ���लम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित गुन्हा दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८०/२०२२ अंतर्गत कलम ४०५, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२९, १२०(ब) व ३ अन्वये गुन्हा नोंद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील दादर सागरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२४ व ३४ अंतर्गत कारवाई झाल्याचा ��ल्लेख करण्यात आला आहे. तसेच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळा ट्रक टर्मिनल येथे लोखंडी साहित्य चोरी करताना पकडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीणमधील वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३१६(३), ३१७(२), ३(५) तसेच वाढीव कलम ३५२ आणि ३५२(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय, विक्रोळी पोलीस ठाण्यातील गु���्हा क्रमांक १२९/२०२४ मध्ये कलम ४०७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल असून या प्रकरणात बक्कल खानला वगळण्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्याने ल���च घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशीगाव, पेल्हार आणि वालीव पोलीस ठाण्यांमध्ये धमकी, मारहाण आणि इतर स्वरूपाच्या एनसीआर नोंदी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये चौकशी सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आरोपकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयातील एका प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. त्यानुसार, फौजदारी अपील अधिकार क्षेत्रातील याचिका क्रमांक १२४९४/२०२३ मध्ये ३० ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयाने अब्दुल हकीम जमीरुल्लाह खान उर्फ
बक्कल खान याच्यावरील तडीपारीचा आदेश कायम ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व गुन्ह्यांचा दाखला देत मह��राष्ट्राचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून बक्कल खान व त्याच्या कथित संघटित टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर केलेल्या दाव्यांवर आधारित असून, त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित व्यक्ती, पोलीस विभाग किंवा इतर संबंधित पक्षांची भूमिका समोर आल्यानंतरच या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होऊ शकतील.
म्होरक्या बक्कल खान आणि संघटीत टोळीवर गंभीर गुन्हे दाखल असूनही मोक्का
अंतर्गत कारवाई करण्याचे धमक नाही?
कायदा सुव्यवस्था वेशीला टांगला आहे का? विचारतोय महाराष्ट्र!
@PMOIndia
@MahaChiefSec @maha_governor @LMMaharashtra @mieknathshinde @SunetraA_pawar @iYogeshRKadam
@IRS_CIT @CVCIndia @AmitShah @IPS_Association
@rashtrapatibhvn @MBVVPOLICE @HMOIndia @VPIndia
@nitin_gadkari @MumbaiPolice @Navimumpolice @nashikpolice @Palghar_Police
सरकारी मलिदा 16%
पहा हा वीडियो....
BJP सरकार आल्यापासून 16% commission वाटप चालू आहे. हे फक्त महाराष्ट्रात ���ाकी राज्यात अणि केंद्रीय स्तरावर किती असतील.
केंद्र सरकार जे 5 Trillion अर्थव्यवस्था दाखवत आहे. त्या हिशोबाने 80,000 कोटी फक्त बीजेपी अणि त्यांचे मित्र पक्ष यांच्यात वाटले जात आहे
काल एका खात्रीशीर माहिती नुसार कल्याण भिवंडी मधील माजी खासदार यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी छोट्या बिल्डर कडून 1 कोटी अणि मोठ्या बिल्डर कडून 2-5 कोटी तसेच इतर कारखानदार यांच्याकडून लाखाची हफ्ता वसूली केली आहे. पुराव��� आहेत.
@PMOIndia @narendramodi @AmitShah @rashtrapatibhvn @VPIndia
@FASTag_NETC@TeamSamataParty This complaint not about double amount deduction. This complaint about double amount charged by the Toll Authority of India in Samruddhi MahaMarg
डोंबिवलीत राजाजी पथ ते आयरे गाव रस्त्यावर अनधिकृत झोपडपट्टींचे साम्राज्य
https://t.co/wZ5YHGiXFh
धन्यवाद #mediavarta@ThaneCityPolice यांच्याकडून तक्रारीची दखल घेतल्याचा email प्राप्त झाले आहे, आता कधी कारवाई होते याची वाट पाहात आहे. अन्यथा 15 दिवसानी आंदोलन फिक्स..
कामगारांचा बुलंद आवाज आणि समतेचा प्रणेता: जॉर्ज फर्नांडिस
श्री. तृणेश अरुण देवळेकर
(प्रदेशाध्यक्ष, समता पार्टी)
भारतीय राजकारणाच्या आणि कामगार चळवळीच्या इतिहासात ज्या काही मोजक्या नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि अमोघ नेतृत्वाने इतिहास घडवला, त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जॉर्ज फर्नांडिस (जॉर्ज साहेब). जॉर्ज साहेब म्हणजे केवळ एक नाव नव्हते, तर तो अन्याय, जुलूम आणि हुकूमशाहीच्या विरोधात धडकणारा एक जळजळीत अंगार होता. आज समता पार्टीचे विचार पुढे नेत असताना, त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणे आणि त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्त���्य आहे.
मुंबईच्या गल्लीपासून संसदेपर्यंतचा प्रवास
जॉर्ज साहेबांचा प्रवास अत्यंत संघर्षातून सुरू झाला. मंगळुरूहून मुंबईत आलेल्या या तरुणाने सुरुवातीच्या काळात फूटपाथवर रात्री काढल्या. पण त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची उपजत ऊर्मी होती. त्यांनी मुंबईतील टॅक्सी चालक, रेल्वे कामगार, आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या छोट्या-छोट्या संघटना एकत्र करून एक अशी वज्रमुठ तयार केली, जिने प���रस्थापित सत्ताधाऱ्यांना हादरवून सोडले. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईत तत्कालीन बलाढ्य नेते स. का. पाटील यांचा पराभव केला आणि 'जायंट किलर' म्हणून देशाच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला.
हुकूमशाहीला दिलेले थेट आव्हान
१९७५ ची आणीबाणी हा ��ारतीय लोकशाहीचा काळा कालखंड होता. त्या काळात अनेक नेते तुरुंगात डांबले गेले, पण जॉर्ज साहेबांनी भूमिगत राहून हुकूमशाहीविरुद्ध लढा सुरू ठेवला. 'बडोदा डायनामाइट खटला' आणि त्यांचा तो साखळदंडांनी बांधलेला, पण हवेत उंचावलेला मुठीचा फोटो आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगावर रोमांच उभा करतो. लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाचीही परवा केली नाही.
'समता पार्टी' आणि देशाचे स��रक्षण मंत्री
जॉर्ज साहेबांची विचारसरणी ही वंचित, शोषित आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणावर आधारित होती. याच विचारांना राजकीय व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी 'समता पार्टी'ची स्थापना केली. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही या पक्षाची मुख्य तत्त्वे होती.
पुढील काळात देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेले निर्णय मैलाचा दगड ठरले. कारगिल युद्धाच्या काळात भारतीय सैन्याला दिलेले खंबीर नेतृत्व, सियाचीन सारख्या अ��्यंत दुर्गम आणि बर्फाच्छादित भागात सैनिकांची दुःख समजून घेण्यासाठी स्वतः केलेल्या असंख्य वाऱ्या, आणि पोखरण अणुचाचणीच्या वेळी देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेली कणखर भूमिका यांमुळे ते देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संरक्षण मंत्र्यांपैकी एक ठरले.
आमचा संकल्प: जॉर्ज साहेबांच्या विचारांची समता!
आज जॉर्ज साहेब आपल्यात नसले, तरी त्यांनी स्थापन केलेली 'समता पार्टी' आणि त्यांनी दिलेला समतेचा विचार आजही जिवंत आहे. आजच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत त्यांच्या विचारांची प्रासंगिकता अधिक वाढली आहे.
"लोकांचा आवाज दाबला जाऊ शकतो, पण तो नष्ट करता येत नाही."
जॉर्ज फर्नांडिस
समता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने, मी आणि माझे सर्व सहकारी महाराष्ट्राच्या मातीत जॉर्ज साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहोत. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि समाजातील शे���टच्या घटकाला न्याय मिळवून देणे, हीच जॉर्ज साहेबांना खरी आदरांजली ठरेल.
चला, जॉर्ज साहेबांच्या आक्रमकतेचा, प्रामाणिकपणाचा आणि देशप्रेमाचा वारसा सोबतीला घेऊन, एक समतावादी आणि प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी एकत्र येऊया!
जय हिंद! जय समता!
#GeorgeFernandes #samataparty @uday88mandal
@NirmalJ8881922
ठाणे पोलीस आयुक्तालय की ‘मलईदार पोस्टिंग’चे केंद्र?; बदली, पुनर्नियुक्ती आणि कथित भ्रष्टाचाराच्या सावटाखाली पोलीस प्रशासन ? विचारतोय महाराष्ट्र !
ठाणे पोलीस आयु��्तालयातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत होणारा कथित भ्रष्टाचार हा विव��ध गैरप्रकारांचे मुख्य कारण असल्याची चर्चा असून, याबाबत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात नेमकं सुरू तरी काय आहे? बदली झालेल्या अधिकाऱ्यांना काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर आणण्यामागे प्रशासनिक गरज आहे की सत्तेच्या आणि पैशांच्या गलियार्यात शिजलेला एखादा गुप्त व्यवहार? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांपासून पोलीस दलातील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
बदली ही प्रशासनातील नियमित प्रक्रिया मानली जाते. मात्र ज्यांची बदली होते, त्यांचे आदेश काही दिवसांतच रद्द होतात आणि त्याच अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच आयुक्तालयात महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागते, तेव्हा संशयाची सुई स्वाभाविकपणे भ्रष्टाचाराकडे वळते. ही केवळ योगायोगांची मालिका आहे की प्रभावशाली शक्तींचा हस्तक्षेप, याचे उत्तर जनतेला ���िळणे आवश्यक आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेसारख्या संवेदनशील विभागात वर्षानुवर्षे एकाच अधिकाऱ्याची पकड कायम राहते, तर दुसरीकडे बदली झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच जागी आणले जाते. यामुळे “ठाणे आयुक्तालयात काही पदे ही सार्वजनिक सेवेपेक्षा खास हितसंबंधांसाठी राखीव आहेत का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कथित संपत्तीबाबत सातत्याने चर्चा होत असते. जर सर्व काही पा���दर्शक आणि नियमबद्ध असेल, तर अशा अधिकाऱ्यांच्या नावावर अथवा कथित बेनामी मालमत्तांची स्वतंत्र चौकशी करण्यास प्रशासन किंवा तपास यंत्रणा का पुढे येत नाहीत? जनतेच्या मनातील संशय दूर करण्यासाठी निष्पक्ष चौकशीच सर्वात प्रभावी उत्तर ठरू शकते.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की पोलीस विभागातील बदल्या या प्रशासनिक प्रक्रियेपेक्षा “मलईदार पदांच्या वाटपाचा बाजार” असल्याची भावना जनमानस��त निर्माण होत आहे. बदल्या, पुनर्नियुक्त्या आणि पदस्थापना यामागील निकष सार्वजनिक केले जात नसतील, तर अफवा, संशय आणि अविश्वास वाढणारच.
राजकीय हस्तक्षेप, आर्थिक व्यवहार आणि प्रभावशाली लॉबिंग यांच्या आरोपांनी आधीच बदनाम झालेल्या बदली प्रक्रियेवर सरकारने मौन बाळगणे अधिक धोकादायक आहे. कारण पोलीस दलावरील जनतेचा विश्वास हा लोकशाहीचा कणा असतो. जर त्या कण्यालाच भ्रष्टाचाराची कीड लागली, तर कायदा-सुव्यवस्थेचे संपूर्ण चित्रच धोक्यात येऊ शकते.
आज गरज आहे ती आरोप झटकून टाकण्याची नाही, तर त्यांची निष्पक्ष चौकशी करण्याच���. राज्य सरकार, गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तसेच संबंधित तपास यंत्रणांनी बदली आणि पुनर्नियुक्ती प्रक्रियेची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. अन्यथा “ठाणे पोलीस आयुक्तालयात सर्व काही नियमांनुसार चालते” हा दावा जनतेच्या गळ्यात उतरणार नाही.
लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. मात्र प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर न देणे, हा प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभ�� करणारा प्रकार आहे.
प्रशासकीय बदली प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्यास त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो, असे मत विविध स्त��ांतून व्यक्त केले जात आहे. संबंधित प्रकरणातील तथ्य समोर आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
@CMOMaharashtra @HMOIndia
@hmo_maharashtra @DGPMaharashtra
@maha_governor @rashtrapatibhvn
@AshwiniUpadhyay @anjali_damania @KirenRijiju
@RubikaLiyaquat @SushantBSinha @AmanChopra_
@sudhirchaudhary @SureshChavhanke @ombirlakota
@VPIndia @dir_ed @republic @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @iYogeshRKadam
@UshaSrivastava_ @RajatSharmaLive @sardesairajdeep
@timesofindia @NCPspeaks
@Anna_hajare_ @ThaneCollector
@ThaneCityPolice @Info_Thane1 @MahaDGIPR
@BJP4Maharashtra
🛑 धडक कारवाई! अनाधिकृत गतिरोधक अखेर जमीनदोस्त! 💪🔥
समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. तृणेश अरुण देवळेकर यांच्या तक्रारीची तात्काळ दखल!
बापगाव (भिवं��ी) हायवेवरील ज्या अनधिकृत स्पीड ब्रेकर्समुळे वाहनधारकांना नाहक त्रास होत होता आणि अपघातांची भीती वाढली होती, त्यावर काल प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे! जनतेच्या सुरक्षेसाठी आणि हक्कासाठी समता पार्टीने उठवलेला आवाज अखेर यशस्वी ठरला.
🎯 आता पुढील टार्गेट: अनधिकृत इमारती आणि घरे!
भिवंडी आणि आसपासच्या परिसरात सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून उभारण्यात आलेल्या अनाधिकृत इमारती आणि भूमाफियांवर आता आमची नजर आहे.
📢 आमचा स्पष्ट इशारा: अनधिकृत बांधकामे करून जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध कृत्यांवर ही कायदेशीर कारवाई अशीच सुरू राहील!
#सत्यमेवजयते #समतापार्टी #तृणेशदेवळेकर #भिवंडी #धडककारवाई #जनतेचाआवाज #ActionAgainstIllegalConstructions #samataparty #GeorgeFernandes
समृद्धी महामार्गावर FASTag नसेल तर थेट दुप्पट (Double) टोल वसुलीची लूट का? आणि दुसऱ्या बाजूला NH-03 घोटी टोल प्लाझावर सरकारी पावती दिली जाते पण प��से मात्र कर्मचाऱ्यांच्या खाजगी UPI/Account वर घेतले जातात? हा कसला कारभार? डिजिटल इंडियाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक थांबणार कधी? नियम फक्त जनतेसाठीच आहेत का?
@nitin_gadkari @MSRDCOfficial @NHAI_Official @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar #TollLoot #SamruddhiMahamarg #Maharashtra #NHAI #samataparty #GeorgeFernandes @PMOIndia