खडूस कोण खांडेकर, खडस की आणखी कुणी ?
ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या नेतृत्वात 'Progressive Democratic Alliance' हे पॅनल Mumbai Press Club Election 2026-2028 मध्ये उतरले आहे.
राजीव खांडेकर यांनी कधीच पक्षभेद केला नाही. ABP माझा चालवताना त्यांनी इतर चॅनल्स आणि माध्यमांना शत्रू तर नाहीच आणि स्पर्धकही मानलं नाही. तो सर्वांचा मित्र आहे.
मुंबई प्रेस क्लब ही देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. सांस्कृतिक केंद्र आहे. राजीव खांडेकर यांच्या येण्याने प्रेस क्लबची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल. त्यांनी एबीपीमध्ये समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व प्रवाहांना सामावून घेतलं. असं चित्र अपवादाने दिसतं.
भोपाळ अजेंड्यानंतर मी मुंबईतल्या सर्व माध्यमप्रमुखांना आणि संपादकांना पत्र लिहलं होतं की, अमेरिकेतील माध्यमांप्रमाणे आपल्या माध्यमांमध्ये आणि वर्तमानपत्रातही समाजातील विविधता प्रतिबिंबित व्हायला हवी. SC, ST, भटके विमुक्त, OBC आणि Minority यातले किती प्रतिनिधी तुमच्या पत्रात किंवा चॅनलमध्ये आहेत? असं मी त्यांना विचारलं होतं. नसल्यास आपण प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं होतं. माझ्या या पत्राला पुढच्या काही काळात कृतीशील उत्तर दिलं ते फक्त राजीव खांडेकर यांनी.
राजीव खांडेकर यांचं पॅनल स्वतंत्र आहे. मात्र त्याला समर खडस यांनी पाठिंबा दिल्याने काही मित्र नाराज झालेत.
समर खडस हा कोकणातल्या फणसासारखा आहे. वरून काटेरी पण आतून गोड गरे. त्याच्या भूमिका अनेकांना त्रासदायक वाटत असतील. पण त्याने कधी भेदभाव केला नाही. समाजवादी नेते महम्मद भाई खडस यांचा विचार वारसा त्याने आजही जपला आहे. महमद भाई साने गुरुजी परिवारातले. सुधारणावादी चळवळीत आणि बाबा आढावांच्या पाणवठा चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. समरबद्दल अनेकांचे मतभेद असतील पण त्याने पाठिंबा दिला म्हणून राजीव खांडेकर यांच्या पॅनेलला विरोध करणं योग्य नाही.
राजीव खांडेकर कोणतेही वादी नसले तरी ते अत्यंत सभ्य, सुसंस्कृत पत्रकार आहेत.
राजीव खांडेकर यांच्या विरोधात जे उभे आहेत, त्यातले एक मुखीया उघडपणे नथुरामी समर्थक आहेत. ते नथुरामला परम देशभक्त मानतात. 'भक्त' सुद्धा नथुरामचं असं समर्थन करत नाहीत. अशा नथुराम समर्थकांना उमा भारतीने फटकारलं आहे. तो व्हिडिओ पाहायला हवा. खांडेकर - खडस यांच्याबद्दल काहींच्या मनात वेगळी भूमिका, भाव असू शकतो. पण ते थेट नथुरामी कळपात जाऊन बसत असतील तर ती वेदनादायक बाब आहे.
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेत मधुशालेचं सुंदर वर्णन आहे, जिथे सगळे भेद मिटतात.
'... बैर बढ़ाते मस्जिद मंदिर,
मेल कराती मधुशाला।'
प्रेस क्लबही तसाच हवा. खांडेकर, खडस नक्की हवेत. उगाच खडूसपणा नको.
~ कपिल पाटील
#MumbaiPressClub
#मुंबईप्रेसक्लब
@maha_tourism दुसर्या पक्षाचे नेते स्वतःचे म्हणून मिरवणाऱ्यांच्या सरकारकडून दुसऱ्याने आयोजित केलेला दीपोत्सव स्वतःचा म्हणून डांगोरा पिटण्यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार?
पुण्यनगरी आयोजित पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा २०२५ आणि नवरात्री नवरंग नवसाज २०२५ या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित राहून या दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतांचा सन्मान केला.
या समारंभास भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय तानपाठक, विशाल राजे, चंद्रशेखर पलथडी, आणि समीर बिर्जे उपस्थित होते.
#AshishShelar
@IndiGo6E हैद्राबाद-मुंबई फ्लाईट 6E5039 गेले दोन तास ताटकळत आहे. प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नाहीय. फ्लाईट मध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना भूक लागली आहे. एअरलाईन्सचे कुणीही काहीच सांगायला आलेले नाही. प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
विधानपरिषदेचे आमदार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या निधीतून मुलुंड पूर्व येथील सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाच्या बस स्टॉप समोरच्या फुटपाथवरच बाक टाकला आहे. चला रात्री बेवड्यांची 'बसायची' सोय झाली! फुटपाथवर असा नवाकोरा बाक म्हणजे चैनच की राव!
Watch: #Chennai's Auto Anna can give #startups a run for their money!
Anna Durai didn’t have a fancy degree from a business school or any family-owned business to learn the trade. But he knew from ‘day one’ that ‘Customer is King’. @anandmahindra@ErikSolheim
मी जर वर्तमानपत्राच्या रात्रपाळीत असतो, तर उद्याच्या अंकासाठी ही आठ कॉलमी हेडलाईन केली असती. उद्या कोणती मराठी वर्तमानपत्रे या बातमीची लीड हेडलाईन करतात ते पाहायची उत्सुकता आहे.
*बार्शीच्या जिल्हा परिषद शाळेतील रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार *
अभिनंदन