पुन्हा एकदा फक्त 8 सवयी ज्या तुम्हाला अमुलाग्र बदलून टाकतील :-
इतर काही शक्य नसेल तरी फक्त या साध्या सोप्या सहज शक्य 8 सवयी पुढील दोन महिन्यासाठी आत्मसात करा आणि फरक पहा
१) सकाळी पाचला उठणे :-
सकाळी लवकर उठले म्हणजे तुम्ही ऑलरेडी जगाच्या पुढे असतात. सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला खालील बाबींसाठी अधिक वेळ उपलब्ध होतो.
- व्यायाम करणे
- दिवसाची नियोजन करणे
- उद्योग व्यवसाय यावर काम करणे
- अधिक उत्पादक बनणे
ही एक प्रचंड प्रभावी सवय आहे जी तुम्हाला अधिक उत्पादक आयुष्य जगण्यासाठी इतरांपेक्षा अधिकचा वेळ देते.
२) झोपण्यापूर्वी आपले विचार लिहून काढणे अर्थात जर्नलिंग :-
त्यामुळे अधिक क्लॅरिटी येते, स्पष्टता येते, झोपेची गुणवत्ता सुधारते. मग काय लिहावे
- उद्या काय करायचे आहे त्या बाबी व उद्दिष्टे
- आपण कशाबद्दल कृतज्ञ आहोत त्या बाबी
- काही नकारात्मक विचार असतील तर ते लिहून काढणे
यामुळे तुमचे मानसिक आरोग्य अनेक पटीने सुधारत जाईल, मनस्थिती खंबीर/ स्थिर/ सक्षम होऊन जाईल.
३) तीस मिनिटात अप स्किलिंग:-
दर दिवशी किमान 30 मिनिटे कोणतेही उत्पन्नात भर टाकणारे स्किल शिकण्यासाठी द्या. कालानुरूप संपादित केलेली कौशल्य तुमच्या गुणवत्तेत व उपयुक्ततेत भर टाकतात त्यामुळे आर्थिक स्थैर्य त्यातून मानसिक स्थैर्य प्राप्त होतात.
४) किमान एक तास व्यायाम करणे:-
मन सुदृढ असण्यासाठी शरीर सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे पळणे,खेळणे, पोहणे यासोबतच वेटलिफ्टिंगचा सुद्धा व्यायाम नियमित करावा.
५) झोपेचे निश्चित असे वेळापत्रक बनवावे:-
झोप ही आपल्या कार्यक्षमतेसाठी, मानसिक आरोग्यासाठी, तणाव निवारणासाठी व मनस्थिती अर्थात मूड इम्प्रूमेंट साठी आवश्यक आहे. अधिक गाढ व गुणवत्तापूर्ण झोपेसाठी
- झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम शून्य करा
- किमान दोन तास आधी अन्नग्रहण करू नका
- बॉडी स्कॅन तंत्र वापरा
६) निसर्गात फिरा:-
किमान 30 मिनिटं उघड्या जागेत मैदानावर निसर्गाच्या सानिध्यात फिरल्यामुळे
- अंक्सायटी कमी होते
-आनंदात वाढ होते
-मनस्थिती व मूड सुधारतो
वेळ मिळेल तेव्हा मोकळ्या जागेत वॉक घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
७) अवांतर वाचन :-
वाचनाने मन सक्षम होते तसेच
- एकाग्रता वाढते
- ज्ञान वाढते
- आत्मविश्वास वाढतो
दर दिवशी किमान 20 पाने वाचा तुम्हाला आयुष्यात प्रचंड मोठा फायदा होईल.
८) दहा मिनिटे माईंड फुलनेस:-
प्रत्येक क्षणी मनात शेकडो/हजारो विचार येत असतात. क्षणाक्षणाला विचार बदलत असतात. मन स्थिर वाटले तरी एका विशिष्ट पातळीत ते सदैव सैरभैर असते. त्यामुळे दहा मिनिटे
- शांततेत बसा
- माईंड फुलनेस प्रॅक्टिस करा
- ती दहा मिनिटे त्या क्षणात जगा
- विपश्यना करता आली तर सर्वोत्तम
दोन महिने सलग करून पहा तुम्हाला तुम्ही स्वतः सर्वच बाबतीत अमुलाग्र बदलून गेला आहात हे लक्षात येईल.
अनुभवांती !
डॉ प्रशांत भामरे.
डॅा. जगदीश हिरेमठ (प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ) यांचे एका वेगळया विषयावरचे, आवर्जून ऐकावे असे विचार. ( थोडं मोठं आहे पण कंटाळा करू नका हे विचार तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातील )
Everyone should listen to him and share this with everyone you love and care about..….
महाराष्ट्र भाजपच्या, अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे यांच्या सर्व लोकांनी मग ते समर्थक असो की आमदार की खासदार... हे पहा आणि शिका.नाहीतर सरळ गुलाम व्हा काँग्रेसचे.