भगवान श्री सोमनाथ सृष्टि के कण-कण में विराजते हैं। उनकी अखंड आस्था अनंत काल से निरंतर प्रवाहित हो रही है। वे सदैव भारत की आध्यात्मिक ऊर्जा के प्रतीक रहेंगे।
सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार :
समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे.
विश्वनेते आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पाठबळामुळे जनतेच्या मनातले सर्वसामान्यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊ शकले. देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सहकाऱ्याने या राज्यात ऐतिहासिक काम करता आले. यापुढे अधिक उत्साहाने आणि वाढलेल्या जबाबदारीच्या भावनेसह जोमाने काम करण्याची उमेद या निर्विवाद विजयाने दिली आहे. हा आशीर्वाद शिरोधार्य मानून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर दुप्पट वेगाने नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. शरीरातला प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण लाडक्या महाराष्ट्रासाठी वाहून घेणार, हे वचन!
पुन्हा एकदा सर्व मतदारांना त्रिवार दंडवत.
जय महाराष्ट्र!
#Shivsena #EknathShinde #Maharashtra #Mahayuti #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024
@narendramodi@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks