All Paid Courses (Free for First 4500 People)
𝗣𝗮𝗶𝗱 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 𝗙𝗥𝗘𝗘 (PART - 1)
1. Artificial Intelligence
2. Machine Learning
3. Prompt Engineering
4. Claude,Chatgpt,Grok
5. Data Analytics
6. AWS Certified
7. Data Science
8. BIG DATA
9. Python
10. Ethical Hacking
(72 Hours only )
Like + RT + comment ' Drive '
Must Follow me so I can DM you.
राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत #मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
#कृषी आणि #आपत्तीव्यवस्थापन विभागांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे :
🔹शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.
🔹विजेच्या कडकडाटाच्या वेळी स्वतःसह व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
🔹झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.
#पाऊस
#वादळीपाऊस
#हवामानअंदाज
#Monsoon
#WeatherUpdate
#IMD
राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ अर्थात POSH कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत.
यासंदर्भात महिला व बाल विकास विभागाने महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले असून, विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या https://t.co/ip6G0Njf4K संकेतस्थळावर शासन निर्णय या लिंकवर 202605141652232030 या क्रमांकाने संबंधित परिपत्रक उपलब्ध आहे.
#महिलासुरक्षा
#शासनपरिपत्रक
#PoshAct2013
डेटा सायन्स ❤️
अलीकडे अच्युत गोडबोले आणि पियूष कुलकर्णी लिखित डेटा सायन्स हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच काही पानांमध्ये जाणवलं की हा फक्त तांत्रिक विषय समजावणारा ग्रंथ नाही, तर बदलत्या जगाकडे नव्या नजरेने पाहायला लावणारं पुस्तक आहे.
डेटा सायन्स हे पुस्तक आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डेटा या संकल्पनेचं महत्त्व सामान्य वाचकाला समजावून सांगणारं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. डेटा सायन्स हा विषय अनेकांना क्लिष्ट वाटतो; कारण त्यामध्ये गणित, सांख्यिकी, संगणकशास्त्र आणि व्यवसाय या सर्वांचा संगम असतो. मात्र या पुस्तकात लेखकांनी हा विषय मराठीत सोप्या भाषेत उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
पुस्तकाची सुरुवात डेटा म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्त्व का वाढलं आणि डिजिटल जगात माहिती कशी नवी संपत्ती बनली यापासून होते. त्यानंतर डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, बिग डेटा, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कॉम्प्युटर व्हिजन यांसारख्या विषयांची ओळख करून दिली जाते. विशेष म्हणजे लेखकांनी फक्त तांत्रिक परिभाषा न देता त्या संकल्पना प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांमधून समजावून सांगितल्या आहेत.
मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे लेखकांची मांडणी. अवघड विषय समजावताना त्यांनी कुठेही अनावश्यक तांत्रिक भाषा वापरलेली नाही. उलट प्रत्येक प्रकरण वाचताना असं वाटतं की एखादी गुंतागुंतीची गोष्ट शांतपणे समजावून सांगितली जात आहे.
लेखकांनी डेटा सायन्सचा वापर उद्योग, आरोग्य, बँकिंग, ई-कॉमर्स आणि सामाजिक क्षेत्रात कसा होतो हेही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ शैक्षणिक राहत नाही, तर डेटा सायन्सचा प्रत्यक्ष जगातील प्रभाव दाखवतं. करिअरच्या दृष्टीनेही हा विषय किती महत्त्वाचा आहे याची जाणीव पुस्तक करून देतं.
हे पुस्तक वाचल्यानंतर डेटा सायन्सकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. आधी हा विषय फक्त आयटी क्षेत्रापुरता मर्यादित वाटत होता; पण आता जाणवतं की येणाऱ्या काळात जवळपास प्रत्येक क्षेत्रावर डेटा सायन्सचा प्रभाव असणार आहे.
तथापि, ज्या वाचकांना प्रत्यक्ष प्रोग्रामिंग किंवा तांत्रिक अंमलबजावणी शिकायची आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक प्राथमिक स्वरूपाचं वाटू शकतं. कारण पुस्तक संकल्पना समजावण्यावर अधिक भर देतं; सखोल तांत्रिक प्रशिक्षण देण्यावर नाही.
एकंदरीत, डेटा सायन्स हे पुस्तक मराठीतून आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. माझ्या दृष्टीने हे पुस्तक केवळ माहिती देत नाही,
तर नव्या तंत्रज्ञानाबद्दल भीती कमी करून उत्सुकता निर्माण करतं.
~ महेंद्र कोलते-पाटील
@Atarangi_Kp @BTechComedian @LetsReadIndia@rutu609
जनगणना २०२७ साठी सज्ज व्हा! 🏡📊
घरांची व कुटुंबांची अचूक माहिती देऊन देशाच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवा.
आता घरबसल्या स्व-गणना (Self Enumeration) द्वारे १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान स्वतःची नोंदणी करा.
#Census2027#SelfEnumeration#parbhani
राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.
मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त : https://t.co/rmeRtveV03
#उष्णतेचीलाट
डिग्री कोणतीही असो, आता AI शिकणं अनिवार्य आहे!
तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनिअर किंवा विद्यार्थी - AI चं बेसिक माहिती असणं आता गरजेचं आहे. कोणतंही अवघड गणित न शिकता, अतिशय सोप्या पद्धतीने AI मास्टर करण्यासाठी हा कोर्स नक्की जॉईन करा.
University of Helsinki कडून ही खास भेट. 🎁