जंगल में चूनाव नहीं होता..
गरुड, सिंह यांचा कधी राज्याभिषेक होत नसतो..
त्यांना निवडणुकीच्या validation ची गरज नसते..
त्याच वागणं , बोलणं , जगणं हे राजासारखं असत..
🔥 Fearless 🔥 crystal clear 🔥 bright
Happy birthday @RajThackeray
माझे अत्यंत आवडते टीव्ही सादरकर्ते सर डेव्हिड अटेनबरो यांनी आज वयाची १०० वर्ष पूर्ण केली. त्याबद्दल डेव्हिड अटेनबरो यांना अनेकोत्तम शुभेच्छा.
२००६ च्या आसपास डेव्हिड अटेनबरो यांची 'प्लॅनेट अर्थ' नावाची सिरीज आली होती. तो काळ डीव्हीडीजचा होता. तेंव्हापासून डेव्हिड अटेनबरो या माणसाच्या कामाने मला शब्दशः वेड लावलं होतं. 'प्लॅनेट अर्थ' पासून पुढे आलेल्या सीरिजच्या डीव्��ीडीज आणि पुढच्या काळात ब्ल्युरेज, रिलीज झाल्या रे झाल्या की त्या मिळवून बघणे हा माझा छंदच झाला होता. पुढे २०१३ मध्ये त्यांची 'आफ्रिका' ही सिरीज आली. त्याचा सुरुवातीचा मोंटाज इतका सुंदर आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंगचा उत्कृष्ट नमुना होता, जो मी कितीवेळा पाहिला असेल याची मोजदादच नाही.
मला नेहमी सर अटेनबरोंच्या डॉक्युमेंट्रीज बघताना एक गोष्ट वाटत राहते ते म्हणजे, ते ज्या पद्धतीने सांगतात ती एक परीकथा वाटते आणि त्या सांगण्यात, त्या कथेत आपण गुंतून जातो आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट कायमची मनात घर करून बसते. डॉक्युमेंट्रीतून एखादा विषय मांडणारे अनेक जण होऊन गेले पण डेव्हिड अटेनबरोंच्या सारखा विरळाच.
सर डेव्हिड अटेनबरो यांच्या आयुष्याकडे पाहिलं की कमाल वाटते की हा माणूस काय जगलाय आणि काय जगाला देऊन गेलाय ? कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट ) ��े रंगीत ते हाय डेफिनिशन ते ३डी ते ४के या सगळ्या बदलांच्या काळात तो माणूस पडद्यावर होता, निसर्गाची कथा त्याच उत्कंठतेने सांगत होता, आणि हे करताना स्वतः पडदा न व्यापता, त्यांचं ज्या निसर्गावर अतिशय प्रेम होतं त्या निसर्गाला, त्यातील विस्मयकारक गोष्टींनाच त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं.
अनेक माणसं १०० वर्ष जगतात पण अशी थोडी फार माणसं असतात ती या काळात ��ातत्याने कशाचा शोध घेत असतात आणि तो शोध हाच त्यांचा मित्र असतो.
गेल्या १०० वर्षांत अटेनबरोनी त्यांच्याशी निगडित काय पाहिलं नाही ? टीव्हीचा उदय पाहिला, दुसरं महायुद्ध पाहिलं, कृष्णधवल टीव्हीचा स्क्रीन रंगीत झालेला पाहिला, सॅटेलाईट क्रांती पाहिली, जेट युग पाहिलं, डिजिटल युग, इंटरनेट युग आणि निसर्गाचा एक घटक ते विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करणाऱ्या मानवाचा प्रवास पाहिला. एका अर्थ���ने मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील सगळ्यात वेगवान शतकाला अनुभवलं आणि त्याचवेळेस या सगळ्या बदलांनी विचलित न होता निसर्गाची कथा ते भरभरून मांडत राहिले.
सुरुवातीला हा निसर्ग किती सुंदर आहे हे सांगणारे अटेनबरो पुढे आपण या निसर्गाचीच काय हानी करत आहोत हे उद्वेगाने मांडायला लागले. अवघ्या पाच सहा दशकांत झालेला ह्रास याचं मूर्तिमंत उदाहरण कुठे शोधायचं असेल तर डेव्हिड अटेनबरो यांच्या डॉक्युमेंट्रीजच्या प्रवासात सापडेल.
पब्लिक ब्रॉडकास्टींग इतका सुंदर कन्टेन्ट तयार करू शकतो आणि तो विज्ञान, निसर्ग इतक्या सोप्या आणि दृश्य पद्धतीने शिकवू शकतो हे जसं बीबीसी २ ने दाखवलं तसंच ते इतकं प्रभावी आणि अचूक कसं असू शकतं हे डेव्हिड अटेनबरो यांनी दाखवलं.
अटेनबरो यांच्याबद्दल मला अजून खूप दीर्घ लिहिता येईल. पण त्याऐवजी मी मराठी तरुण-तरुणींना विनंती करेन की कृपा करून त्यांच्या डॉक्युमेंट्रीज बघा. त्या स्टोरीटेलिंगसाठी बघाच पण निसर्ग कि���ी सुंदर आहे आणि आपण तो अमुक रस्ता, तमुक ब्रिज यांच्या नावाखाली कसा उध्वस्त करत आहोत हे समजून घेण्यासाठी पण बघा.
आणि अजून एका कारणासाठी अटेनबरो माझ्या माध्यमातील सहकाऱ्यांनी बघा ते म्हणजे एखाद्या विषयातील अभ्यास जर पक्का असेल तर तुम्हाला माझा कन्टेन्ट कोणी बघेल का? मला तो व्हायरल करायला काय करावं लागेल याची चिंता करावी लागत नाही यासाठी नक्की बघा.
अटेनबरो ज्या काळात जन्माला आले तेंव्हा पृथीबद्दलच, निसर्गाबद्दलच कुतूहल जागृत असण्याचा काळ होता, ते आज अवघ्या १०० वर्षांचे आहेत जेंव्हा हे कुतूहल जाऊन पृथ्वी, निसर्ग पार उध्वस्त करण्यापर्यंतचा काळ त्यांना बघावा लागत आहे. त्यांना इतकं दीर्घायुष्य लाभू दे की ही पृथ्वी हा निसर्ग पुन्हा रसरसलेला त्यांना बघायला मिळेल.
सर डेव्हिड अटेनबरो यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा !
राज ठाकरे ।
कॅम्लिन' च्या सुभाषजी दांडेकरांचं आज निधन झालं. सुभाषजी दांडेकर आणि कॅम्लिनशी या दोहोंशी माझा जुना ऋणानुबंध. माझा 'कॅम्लिन'शी संबंध पहिल्यांदा आला, तो कॅम्लिनच्या कंपास पॆटीमुळे. त्याकाळात उंटाची नाममुद्रा अस���ेली कॅम्लिनची आखीवरेखीव कंपासपेटी सगळ्यांकडेच असायची. कॅम्लिन सोडून दुसऱ्या कंपास पेटीचा विचारच करता येत नव्हता . फुटपट्टी, खोडरबर ते पेन्सिलपर्यंत प्रत्येक गोष्ट कॅम्लिनचीच असायची. पुढे कॅम्लिनचा ब्रश, कलर हातात आले. खरतर लहानपानापासूनच कॅम्लिनच्या रंगात मी रंगून गेलो होतो .
पण 'कॅम्लिन' हा ब्रँड किती मोठा आहे हे मात्र त्या वयात जाणवलं नव्हतं. १९३१ ला वेधशाळेत काम करणाऱ्या आणि महा��ालिकेत काम करणाऱ्या उच्चशिक्षित बंधूनी नोकरी सोडून सुखासीन सरकारी नोकरीचा ध्यास सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि तो देखील शाई बनवण्याचा. वेधशाळेत ढग कसे जमा होतात हे बघण्याच्या ऐवजी लोकांनी तेच ढग आपल्या रंगाने रंगवावेत असं का वाटलं असावं हे त्यांनाच माहीत. शाईच्या पासून सुरु झालेला प्रवासाने, 'कॅम्लिन'च्या ��्रॅण्डची ठळक मुद्रा जगभर उमटवली. 'उंट' ही कॅम्लिनची नाममुद्रा, महाराष्ट्रात न दिसणारा प्राणी नाममुद्रा म्हणून का घेतला याची कथा मला एकदा दांडेकरांनी सांगितलं होता.
शाई ते फाउंटन पेन्स, पेन्सिली, रंगवण्याचे ब्रश, क्रेयॉन्स पासून अनेक प्रकारचे रंग, खोडरबर ते ऑफिसेसला लागणाऱ्या स्टेशनरीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कॅम्लिनने बनवल्या.
इंग्रजीत एक म्हण आहे जिचा भावार्थ आहे, 'उंटाच्या पाठीव��� काडी ठेवली आणि उंट खाली बसला'. पण दांडेकरांच्या उंटाला कलात्मक उत्पादनाचं कधीच ओझं झालं नाही. मराठी उद्योजकाने घेतलेली ही लक्षणीय उडी.
पुढे काळाच्या ओघात इतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या, पण 'कॅम्लिन'च्या उत्पादनांमध्ये जी एक सौंदर्यदृष्टी आहे, ती मात्र कुठल्याच उत्पादनांमध्ये दिसत नाही.
जागतिकरणाच्या ओघात कॅम्लिनचा मोठा हिस्सा 'कोकुयो' नावाच्या जॅपनीज कंपनीने घेतला. पण जे मोज���े मराठी ब्रँड आंतरराष्ट्र���य पातळीवर पोहचले, त्याची दखल जगाने घेतली त्यात 'कॅम्लिन' हा एक महत्वाचा ब्रँड.
आज सुभाष दांडेकरांच्या निधनानंतर हा सगळा पट डोळ्यासमोर आला. 'कॅम्लिन' या ब्रँडच्या प्रवासाने किंवा एका उंटाच्या नाममुद्रेच्या प्रवासातुन मराठी मनांनी प्रेरणा घेऊन, मोठी स्वप्न पहायला हवी आणि अर्थात ती प्रत्यक्षात पण उतरवायला हवी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुभाषजी दांडेकरांना विनम्र श्रद्धांजली...
दररोज न चुकता माईंडफुलनेस अथवा मेडिटेशन का करावे :-
- दोन मिनिटे ड��ळे मिटुन शांत बसा. फक्त शांत बसा.
⁃श्वासावर लक्ष केंद्रित करा, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याचे निरीक्षण करत रहा.
⁃किती वेळ मन श्वासावर स्थिर राहते ? तर आपल्या लक्षात येईल कि 10-15-20 सेकंद सुद्धा चित्त/ मन श्वासावर स्थिर राहत नाही.
⁃अश्यावेळी त्या मनात प्रामुख्याने तीन प्रकारचे विचार मनात येत असतात.
⁃एक असतो भुतकाळात घडुन गेलेल्या घटनांबद्दल, कोणत्याही रँडम घटना, बाबी, व्यक्ती आठवतात, भुतकाळाबाबतचे विचार, काय झालं कसं झालं कसं झालं असतं तर बरं झालं असतं वगैरे विचार मनात येतात.
⁃दुसरा प्रकार म्हणजे भविष्यकाळाबद्दलचे विचार. यात म्हणजे अगदी आज दिवसभरात किंवा येत्या काळात करावयाची एखादी गोष्ट किंवा अनेक गोष्टी, अनवधानाने करायच्या राहुन गेलेल्या बाबी किंवा भविष्यकाळातील चिंता, भीती याबाबतचे विचार असतात.
⁃तिसरा प्रकार असतो तो आपलं मन श्वासावर का राहत नाहीये ��णि ते सारख�� का भरकटतंय याबाबत चिड संताप राग येत राहणे, आपल्याला हे शक्य होणार नाहीच, या मेडिटेशनचा खरोखर काही उपयोग आहे का ? कधी हे 2 मिनिटे संपतील ? अशी दोलायमान अवस्था असते.
⁃एकुणच या पुर्ण 2 मिनिटात ( किंवा 10-15 मिनिटे केल्यास त्या वेळेत ) अशा निराशा, आनंद दुःख, भीती चिंता उल्हास, उत्साह हतोत्साह अश्या भावभावनात मन अस्थिरपणे अविरत दोलायमान असते.
⁃हिच अवस्था आपली आयुष्यात प्रत्येक क्षणी असते, आपल्या ते लक्षात येत नाही पण न कळत प्रत्येक क्षणी ते होत असते.
⁃लक्षात येण्यासाठी एक उदाहरण आहे. एक वेडा खुप दिवसांपासुन उपाशी असतो, एकाला त्याची दया येते आणि त्याला तो पंचपक्वानांनी भरलेलं ताट जेवायला देतो. अत्यंत सुरेख पदार्थ वाढलेले आहेत त्यांचा सुगंध दरवळतो आहे, आधीच कडकडीत भुक त्यात ते दृश्य, सुवास याने तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तो भातात आमट��� कालवून घास तोंडात घेणार तेव्हढ्यात त्याला बासुंदीची ताटली दिसते, तिच्या हावेपोटी हातातला आमटी भाताचा घास तसाच असताना तो बेभानपणे बासुंदीचा भुरका मारण्यासाठी अधाशीपणे त्यात हात घालतो आणि सर्व बासुंदी आमटी भाताने खराब होऊन जाते, तिचा नाद सोडुन तो खाण्यासाठी लाडु हातात घेतो तो आपले आमटी बासुंदी प्रकरण पाहुन समोर कोणी आपल्यावर हसते आहे अश्या भासाने चिडुन तो हातातला लाडु समोरच्याला फ��कुन मारतो आणि मग जेवण बाजुलाच राहते आणि वेगळाच तमाशा सुरु होते.
⁃आपलंही तसंच होत असतं. आपलं चंचल, भुतकाळबाधित अस्थिर व्याकुळ असमाधानी मन त्या वेड्यासारखंच वागत राहतं.
⁃तुलना, आसक्ती, राग, लोभ, द्वेष, आशा निराशा, आनंद दुःख या स्वनिर्मित भावनांवर हेलकावे खात कायम अस्थिर राहते.
⁃परिणामी व्याकुळता, असमाधान, मनःशांतीचा अभाव, सध्या जे आहे त्यात समाधान/ आनंद न घेता भलत्याच आभासाच्या अपे��्षेने असमाधानी/ व्याकुळ राहणे हे सातत्याने नकळत सुरु असते.
⁃या अवस्थेचे अनेक मनोकायिक परिणाम होतंच असतात.
⁃त्यावर माइंडफुलनेस हा एक अत्यंत उत्तम उपाय आहे. भगवान गौतम बुद्धांनी सुमारे 2400 वर्षांपुर्वी जगाला दिलेली अदभुत देणगी विपश्यना हा त्यातला एक सर्वोत्तम मार्ग समजला जातो !
⁃मग आता कोणी म्हणेल कि या सर्वांचा त्याग करून काय सन्यास घ्यायचा आहे काय ?
⁃तर ते तसे नाहीये, आपल्या व्यावह���रिक / व्यावसायिक जीवनात सर्व अशा आकांशा या ऐहिकच राहणार आणि त्यात गैर काहीही नाहीये. उलट माइंडफुलनेस/ विपश्यना केल्याने आपल्याला जे साध्य करायचं आहे ते अधिक प्रभावीपणे, तणावरहित आणि परिणामकारकरित्या साध्य करण्यास आपले मन आणि आपण सक्षम होऊ.
⁃कुऱ्हाडीला धार केल्याने लाकुड तोडणाऱ्याला जो फायदा होतो तसाच फायदा विपश्यना करणाऱ्याला त्याच्या उद्योग, व्यवसाय अथवा कोणत्याही ध्येय सिद्धी�� होते.
⁃तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर तुम्हाला अनेक संशोधन अहवाल सापडतील ज्यात शास्त्रीय संशोधनांती सिद्ध झाले आहे कि विपश्यना/ माइंडफुलनेस नियमित करणाऱ्यांना कार्यक्षमतावृद्धी, अँक्झायटी कमी कमी होत जाणे, एकाग्रतेत वाढ, समाधान/ आनंदी वृत्तीत वाढ, सामाजिक संबंधात सुधारणा असे फायदे झाल्याचे सिद्ध झाले आहे.
- मनशांती, समाधानवृत्ती, एकाग्रता, परिणामकारकतेत वाढ, निखळ आनंद, भीती चिंता काळजी यापासुन मुक्ती, ता��तणाव अधिक सक्षमपणे आणि हसतखेळत हाताळण्याची क्षमता, तुलना/ आसक्ती, द्वेषभाव, न्युनगंड यापासुन मुक्तता असे अगणित फायदे करून देणारे माइंडफुलनेस/ विपश्यना दररोज नक्की करावेच अशी शिफारस आहे !
डॉ प्रशांत भामरे
#RSI is the best tool to identify trend Reversal & Trend Weakness
This learning thread would be on
"MASTER THE RSI DIVERGENCE"
Like👍 & Retweet🔄 for wider reach and for more such thread
Intraday "RSI DIVERGENCE STRATEGY" With Chartink Screener
आषाढी एकादशी आणि त्या अगोदरची वारी म्हणजे ”महाराष्ट्रधर्माचा” उत्सव.
विविध जातीसमूहांमध्ये विखुरलेल्या आणि बाहेरील जुलमी आक्रमणामुळे गर्तेत सापडलेल्या मराठी समाजाला भक्ती-संप्रदायानं दिशा दाखवली.
संतांनी त्यांच्या प्रबोधनातून मराठी समाजाचा व्यापक, बहुपेडी, बहुआयामी, विवेकी असा सांस्कृतिक स्वभाव तयार केला. मराठी साम्राज्य स्थापन होण्याआधी तीन च��रशे वर्ष ही घुसळण महाराष्ट्रात चालू होती. ह्या घुसळणीतूनच महाराष्ट्रानं स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं.
आजच्या आषाढी एकादशीला, महाराष्ट्राला पडलेल्या त्या स्वप्नाची आणि महाराष्ट्रधर्माची आठवण आवर्जून आली.. #आषाढीएकादशी #आषाढी_एकादशी