यासमयी त्रिमूर्ती प्रांगणातले सगळे वातावरण तिरंगामय झाले होते. वंदे मातरम, भारत माता की जय आणि जय हिंद अशा घोषणांनी संपूर्ण मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis देखील उपस्थित होते.
घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालो. तिरंग्यासह सेल्फी काढून घेण्यासाठी मंत्रालयातील सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी उसळली होती.
#HarGharTiranga
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृती करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक #लोकशाहीर#अण्णाभाऊ_साठे यांना जयंतीनिमित्त तसेच भारतीय असंतोषाचे जनक,महान स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार व थोर समाजसुधारक #लोकमान्य#बाळ_गंगाधर_टिळक यांच्या स्मृतिदिनी विनम्रतापूर्वक अभिवादन केले.
#रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तसेच मंडणगड नगरपंचायतीतील शहर विकास आघाडीतील १२ नगरसेवकांनी आज आमदार @iYogeshRKadam यांच्या पुढाकाराने युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
#realshivsena
संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात संभाजीनगर हून मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी जयघोषात समर्थन देत उदंड प्रतिसाद दिला.
#realshivsena