No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.
I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेस��युक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या सत्याग्रहाला आज विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील ८० वर्षांच्या ध्येयवादी आजी 'मालन फासे' यांचं बळ मिळालं. या त्याच आजी आहेत, ज्यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर युवा शक्ती आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या शिक्षणमंत्��्यांची ‘विकेट’ घेतली, त्या ऐतिहासिक आंदोलनात तब्बल १८ दिवस रस्त्यावर ठाण मांडलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून आजी चारधाम यात्रेला गेल्या होत्या. त्यांनी द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथ पुरी या तीन पवित्र धामांचं दर्शन पूर्ण केलं होतं आणि शेवटचं धाम असलेल्या के��ारनाथकडे निघाल्या होत्या. मात्र, पुण्यात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांच्या आंदोलनाची बातमी कळताच आजींनी आपला आध्यात्मिक प्रवास सोडून द्वारकेहून थेट पुण्यातील आंदोलनस्थळ गाठलं.
योगायोग बघा, आज नवरात्रोत्सवाचा, अर्थात नारीशक्ती आणि आदिशक्तीच्या पूजेचा पहिला दिवस. याच दिवशी पुण्यात रस्त्यावर लढणाऱ्या विद्यार्थ्यांना ताकद देण्यासाठी ही 'नारीशक्ती' स्वतः चालत आली. ���ालन आजींच्या रूपाने या लढ्याला साक्षात आदिशक्तीचाच आशीर्वाद लाभलाय. आता या लढ्याला यश आल्याशिवाय राहणार नाही.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष��ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्याव��� अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद���द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकरे ।
‘ॲग्रोवन’च्या शाश्वत शेती परिषदेत सहभागी…
📍यशदा, पुणे
गेली दोन दशके शेतकऱ्यांचा मार्गदर्शक राहिलेल्या, सकाळ माझ्या समूहाच्या ‘ॲग्रोवन’ या कृषी दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘शाश्वत शेती परिषदे’त सहभाग घेत उद्घा���न सत्राला संबोधित केले. राज्याचे कृषिमंत्री मा.श्री. माणिकरावजी कोकाटे, सकाळ समूहाचे अध्यक्ष मा.श्री. प्रतापराव पवार सर, संपादक श्री. आदिनाथजी चव्हाण आदी यावेळेस व्यासपीठावर होते. यावेळी शेती क्षेत्रातील प्रयोगांबद्दल पद्मश्रीने सन्मान झालेले श्री. सुभाष शर्मा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाश्वत शेती संदर्भात शेतकऱ्यांना योग्य दिशा मिळावी आणि मार्गदर्शन व्हावं, या उद्देशाने ‘ॲ��्रोवन’च्या वतीने हे अतिश�� स्तुत्य असे आयोजन करण्यात आले होते.
भारत हा कृषिप्रधान देश असताना २०१४ सालापर्यंत कृषी खात्याचे बजेट केवळ २१ हजार कोटींच्या आसपास होते. मात्र मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर हेच बजेट आता १ लाख ३७ हजार कोटींहून अधिक आहे. म्हणजेच यात तब्बल सहा पट वाढ करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या माध्यमातून २०१८ साली सुरू झालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आज द��शातील शेतकऱ्यांना मोठा आधार देत आहे. शिवाय यात १३ कोटी शेतकरी जोडले गेले असून ३ लाख ६५ हजार कोटींहून अधिक निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आहे. शिवाय पिक विमा योजनेअंतर्गतही सरकारने मंजूर केलेली रक्कम पावणेदोन लाख कोटीपर्यंत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना आधार देत असताना दुसरीकडे कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आ���े आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवून सरकारचा अ��ेंडा शेतकरी केंद्रस्थानी असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
देशाचे गृह आणि सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांच्या नेतृत्वात सहकार विभागाच्या माध्यमातूनही क्रांतिकारी बदल घडवण्यात येत असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि एकूणच कृषी क्षेत्राला होत आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून सेवा संस्थांना मजबूत करण्याची मोहीम देशभर हाती घेतल्यामुळे त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
वाढते शहरीकरण आणि जागतिक हवामान बदलांमुळे शेतीवर होणारा परिणाम, तसेच शेतीमधील वाढत्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे माती, पाणी, मानवी आरोग्यासह पशुधनाचे आरोग्य धोक्यात आहे. यामुळे आता हवामान बदलाला सामोरे जाताना रासायनिक कीटकनाशकांचा बेसुमार वापर टाळत, शाश्वत शेतीकडे वळावे लागणार आहे. यासाठी केंद्र सरकार विशेष मोहिमा राबवत असून देशी बियाणांचे संवर्धन, सेंद्रिय शेतमाला प्रोत्साहन, रसायनमुक्त शेतीसाठीच्या विविध योजनांवर भर दिला जात आहे.
#ॲग्रोवन #Agrowon #शाश्वत #शेती #परिषद #पुणे #सहकार
नामदेव शास्त्री यांच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाबद्दल आदर आहे.
भगवान गडाचा राजकीय वापर होऊ नये ही काही वर्षांपूर्वी त्यांची भूमिका होती. आज याच भगवानगडावरून त्यांनी राजकीय भूमिका घेतलेली आहे.
बरं नुसतं काठावरचे बोलले नाहीयत.. तर अगदी आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा, त्यांनाही ���ारहाण झाली होती असं म्हणत एक प्रकारे हत्येच्या समर्थनाची भाषा जी महंत लोकांच्या तोंडी अजिबात शोभून दिसत नाही.
आमच्या क्षेत्रात कोणाला इतका त्रास झाला असता तर तो संत झाला असता इतका त्रास धनंजयला झाला आहे. त्याच्या हाताला सलाईन लावली आहे.इतके कनवाळू उद्गार काढले आहेत त्यांनी. समाजावर प्रभाव ठेवण्यासाठी त्यांची विद्वत्ता, ज्ञान पुरेसं आहे. त्यासाठी धनंजय मुंडेंची काय गरज लागत असावी त��यांना?
मी गेल्या २१-२२ वर्षांपासून बातमीदार-पत्रकार म्हणून बहुतेक समाजांच्या आरक्षणाच्या मागणीच्या बातम्या-वार्तांकन-विश्लेषण करत आलोय. मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जीआरची २००४-०५ ची लोकसत्तातली बातमी मीच बायलाईनसह दिली होती. सुरुवातीचे १४ मराठा क्रांती मोर्चे कव्हर केले. प्रत्येक समिती/आयोगाच्या बैठका अटेंड केल्या. राज्यातल्या बहुतेक सर्व समाजांच्या आरक्षण आंदोलकांची दखल बातम्या-शोच्या माध्यमातून घेतली. पण मनोज जरांगे-पाटलांइतका एखाद्या समाजावर इम्पॅक्ट पाडणारा चिकाटीबहाद्दर नेता बघितला नाही. जो मराठा समाज सर्वच राजकीय पक्षांत आणि स्तरांत विभागालेला आहे, त्या ��माजावर गारूड करण्यासाठीचं लागणारं पराकोटीचं कनव्हिक्शन जरांगे-पाटलांइतकं क्वचित बघायला मिळालं. त्यामुळं जरांगे फॅक्टर हा जरांगे फिनॅामिनॅा(phenomenon) झालाय! 🗞️
उत्तम जानकर यांच्याविषयी मला फारशी माहिती नव्हती. पण मागच्या आठवड्यात अचानक वीज चमकल्यासारखे ते नांव झळकले. थोडा चकीत झालो. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गटारघाण करणार्या एका अत्यंत ��िषारी वृत्तीच्या नेत्याने जानकरांसाठी स्पेशल विमान पाठवून निमंत्रण दिलेली बातमी वाचली. हा नेता म्हणजे सत्तेच्या जोरावर - सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून बेडकाचा बैल झालेला. त्यामुळे कपट हा त्याचा स्थायीभाव. मुलाखतीतही 'मी असे कारस्थान केले' हे निर्लज्ज गर्वाने सांगतो. आता हे जे कुणी जानकर आहेत, त्यांचाही तो दादा-मिंधे करणार... म्हणजेच तात्पुरती मोठी लालूच दाखवून, वापरून फेकून देणार असे वाटले.
अचानक उत्तम जानकरांनी आणि पवारसाहेबांनी मिळुन अशी चाल खेळली, जी भारतभरातल्या भल्याभल्यांना जमली नाही ! त्या विखारी, कटकारस्थानी लोकांनी टाकलेले जाळे फाडून उत्तम जानकर नांवाचा वाघ निसटला. छत्रपती शिवरायांच्या भुमीचा वारसा जपत अक्राळविक्राळ महाशक्तीला चॅलेंज देणार्या लढवय्यांमध्ये सामील झाला !
पवारसाहेब जी खेळतात ना, ती खरीखुरी राज'नीती' ! हातात सत्ता नसतानाही, केवळ बुद्धीच्या बळावर ही कमाल करणे सोपे नाही. त्यांनी सत्ता असतानाही कधी इडी, सीबीआयसारख्या सरकारी संस्थांचा गैरवापर केला नाही. त्यांनी ज्यांना मोठे केले, ते गद्दारी करून निघून गेले. तरीही या वयात पवारसाहेब ज्या कौशल्यानं स्वबळावर बडे-बडे नेते आपलेसे करताहेत... खरे 'राजकारण' काय असते, ते दाखवून देताहेत... ते या भाकडकाळात एक आदर्श उदाहरण ठरतेय.
उत्तम जानकरसाहेब, पुर्वी राजकारणात तुमची काही पावलं चुकलीही असतील. पण चूक सुधारणे हा प्रक���र महाकठीण असतो. तुम्हाला त्या लांडग्यांनी जे आमिष दाखवले असणार ते नक्कीच छोटे नसणार हे आम्ही जाणतो... तुम्ही ते लाथाडून आज 'न्यायाची' कास पकडत आहात याची नोंद इतिहासात होईल. हा देश, या देशाची लोकशाही सुरक्षित रहाणार आहे, ती तुमच्यासारख्या नेत्यामुळेच !
तुमच्या राजकीय वाटचालीसाठी मनापासुन सदिच्छा.❤️
- किरण माने.
एक दिवस पोशिंद्यासाठी!
देशातील शेतकरी एकटा नाही, तर आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभं आहोत, हा विश्वास देण्यासाठी आजच्या बंदमध्ये सहभागी व्हा!!!
#महाराष्ट्र_बंद
याला नेमकं कसलं लॉजिक म्हणतात?
योगी सरकार म्हणतंय कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांना घटनास्थळी जाऊ देत नाही
अरे बाबांनो,कायदा सुव्यवस्थेचा पत्ता नव्हता म्हणून तर लखीमपूर घडलं ना. शेतकऱ्यांवर गाड्या घातल्या निर्दयीपणे
तेव्हा कुठे होती कायद��-सुव्यवस्था?
महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 55 लाख 94 हजार 640 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.28 एप्रिल 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 2,37,700 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
#MahaVaccination
आखिर तानाशाही खुल कर सामने आने लगी, गणतंत्र दिवस पर देश के किसानों पर आंसू गैस के गोले छोड़े जा रहे हैं।
ये आपातकाल है, यहा�� सरकार के खिलाफ बोलना जुर्म है।
सेना और संस्कृति का राजनीतिकरण और सरकारी संस्थाओं सहित मीडिया पर क़ब्ज़ा कर मनमानी की जा रही है।