महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने वर्सोवा प्रवासी टर्मिनल, मांडवी गल्ली, विसावे गाव, वर्सोवा येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरण व आधुनिकीकरण कामांचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मा. श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
वर्सोवा प्रवासी टर्मिनल आणि जेट्टी परिसरातील अस्वच्छता व गैरसोयींमुळे प्रवासी, पर्यटक, मच्छीमार बांधव आणि स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुशोभीकरण व आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अवघ्या ४५ दिवसांत कामे पूर्ण करून आज या नव्याने विकसित करण्यात आलेल्या टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले.
महायुती सरकार राज्यातील जलवाहतूक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आधुनिक प्रवासी टर्मिनल्स, सुरक्षित व सुसज्ज जेट्ट्या, डिजिटल सुविधा, मुंबई वॉटर मेट्रो तसेच हरित तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक सेवांचा विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमास अभिनेत्री अर्चना पूरणसिंग, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. प्रदीप, अशासकीय सदस्य श्री. बाळासाहेब देसाई तसेच इतर मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MeNarayanRane@mahamaritime1
सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयातील माझ्या दालनात सविस्तर सादरीकरण पार पडले. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवत पर्यटन, सौंदर्यीकरणासह आकर्षणाचे केंद्र म्हणून त्याचा विकास करण्याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.
बैठकीस आमदार दीपक केसरकर जी, सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती श्रद्धा लखमराजे भोसले, श्री लखमराजे भोसले, वास्तुविषारद स्वरदा पोयरेकर, श्रद्धा कदम, अजय नायक उपस्थित होते.
@dvkesarkar #मोती_तलाव #पुनरुज्जीवन #सुशोभीकरण #सावंतवाडी #आढावा_बैठक #मंत्रालय #Mumbai
सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला.
सागरी किनारपट्टीवरील संभाव्य धोके रोखण्यासाठी सागरी सुरक्षा अधिक सक्षम व सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरही प्रभावी सागरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, तसेच बोटीवर कार्यरत असलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती व नोंदी प्रशासनाकडे अद्ययावत ठेवाव्यात, अशा कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप, पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mahamaritime1 #सागरी_सुरक्षा #coastalsecurity #mumbai #Maharashtra
मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत विविध महत्त्वाच्या विषयांवरील कार्यवाहीबाबत आज मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला.
यामध्ये प्रामुख्याने क्रियाशील मच्छीमार सभासदांना मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, राज्याच्या जलधी क्षेत्रातील पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढविणे, ‘फिश पाव’ उपक्रम राबविणे, पेनटाकळी जलाशय नाविन्यपूर्ण एकात्मिक पथदर्शक प्रकल्प कार्यान्वित करणे, ब्ल्यू इकॉनॉमी संदर्भात श्री.सुबोध कुमार(भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या अहवालानुसार करण्यात येणारी कार्यवाही, स्पर्म व्हेल माशाच्या उलटीपासून मिळणाऱ्या “अंबरग्रीस” संदर्भातील धोरण तयार करणे, तसेच मच्छीमार महिलांसाठी हॅन्ड ग्लोज व गमबूट उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
महाराष्ट्र मच्छीमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ स्थापनेनंतर झालेल्या कार्यवाहीबाबत आज मंत्रालयातील माझ्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
मच्छिमार आणि श्रमजीवी कामगारांचे जीवनमान उंचावणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. मंडळाच्या माध्यमातून कामगारांना अधिकाधिक लाभ मिळतील, यासाठी प्रशासनाने पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने काम करावे. प्रलंबित लेखापरीक्षण आणि न्यायालयीन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यावरही भर दिला जाईल. तसेच कामगार मंत्री यांच्याकडे याविषयी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
If no one has a problem with Muslims bringing goats into the Poonam Cluster Society in Mira Road during Bakra Eid, then why does the police administration object when the Sakal Hindu Samaj brings pigs? @MBVVPOLICE@CMOMaharashtra@NiteshNRane@DGPMaharashtra
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांत राष्ट्रनिर्मितीच्या तपपूर्तीचे पर्व यशस्वी करत हिंदू संस्कृतीचा सर्वोच्च सन्मान केला आहे.
#Glorious12Years#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी आदिवासी बांधवांच्या घरे, वसतिगृहे व मुलांच्या शिक्षण संबंधित अडचणींबाबत आदिवासी विकास मंत्री श्री.अशोक उईके यांच्या समवेत आज मंत्रालयात बैठक झाली. संबंधित विषयाची दखल घेत लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री उईके जी यांनी दिले.