आपल्या खास 'वपुर्झा' शैलीत 'रंग मनाचे' उलगडत रसिक वाचकांच्या मनात विचारांचा 'प्लेजर बॉक्स' फुलवणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वसंत पुरुषोत्तम तथा व. पु. काळे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#VaPuKale#Vapurvai#MarathiLiterature#MarathiSahitya
हिंदवी स्वराज्य संकल्पक, महाबली शहाजीराजे भोसले यांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! शहाजीराजे यांनीच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सर्वप्रथम पाहिले, हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अथक संघर्ष केला, तसेच स्वराज्यस्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले
@संगमेश्वर तालुक्यातील शिमगोत्सवा निमित्ताने विविध ग्रामदेवतांचे दर्शन घेतले यापैकी क्षेत्रपाल धामणी येथे श्री. बाजीबावा, वरदान, जुगाई पालखीचे दर्शन घेताना.
@संगमेश्वर तालुक्यातील प्रवासा दरम्यान आणि सध्या सुरू असलेल्या शिमगोत्सवाचे औचित्य साधून धामणी गावची ग्रामदेवता श्री. वाघजाई ,नवलाई देवीच्या शिगोत्सवाला उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतले.
@गुहागर तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात राज्यस्तरीय भगवान परशुराम चषक 2025 ओव्हर क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.Meta
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक आणि आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. शंकरराव तत्ववादी यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे.
त्यांच्या निधनाने संघ विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले आहे.
!आमचे दाराशी हाय शिमगा!!
यंदाचे धूलिवंदन तुम्हा सर्वांच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधानाचे रंग घेऊन येवो ! नैसर्गिक रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक धूळवड साजरी करूया. संस्कृती अन परंपरेचे रंग जपूया. सर्वांना धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#Dhulivandn#Holi2025#Shimga
@Meta यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
आपली भारतीय संस्कृती ही आपल्याला स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देते, हा संस्कार जपण्याचा संकल्प करूया.
@Meta अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन करणारे आदर्श मार्गदर्शक आणि महान योद्धे दादोजी कोंडदेव यांस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#दादोजी_कोंडदेव#DadojiKonddev#ChhatrapatiShivajiMaharaj