📍 प्रभाग क्र. ५, कल्याणीनगर – वडगावशेरी
सततच्या पावसामुळे या परिसरात पावसाचे पाणी साचल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तात्काळ चर मारून पाण्याचा निचरा करण्यात आला.
संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देत, अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
गेल्या ५ वर्षात NAFED च्या सदस्य संस्थांची संख्या ८४८ वरून १,०५७ पर्यंत वाढली असून, सहकार क्षेत्रावरील वाढता विश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळालेले नवे बळ याचे हे द्योतक आहे.
#SahkarSeSamriddhiKe5Saal@narendramodi@AmitShah@BJP4India
सहकारातून नव्या भारताची विक्रमी घोडदौड!
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांच्या नेतृत्वाखाली NAFED संस्था अधिक सक्षम होत आहे.
Delighted to inaugurate the New Terminal Building at Jodhpur Airport.
In addition to providing passengers with better amenities, it will also strengthen tourism, trade and economic opportunities across Rajasthan.
India’s aviation sector continues to soar, powered by next-generation infrastructure and our commitment to connecting every part of our nation.
🗳️ मतदार यादी SIR पडताळणी सुरू आहे!
BLO आपल्या घरी भेट देणार आहेत. कृपया आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करा आणि आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करा.
आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेत पडताळणी करा.
#SIR#मतदारयादी#VoterVerification#WadgaonSheri
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात SIR अभियानाच्या अनुषंगाने महाबैठक!
📍चंदननगर
संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या SIR (Special Intensive Revision) अर्थात विशेष मतदारयादी पुनरावलोकन अभियानाच्या अनुषंगाने वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आयोजित महाबैठकीस उपस्थित राहिलो.
वडगावशेरी येथील श्रम साफल्य सोसायटीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून समस्येची माहिती घेतली.
सनातन आस्था के महापर्व श्री अमरनाथ यात्रा का शुभारंभ आज से हो रहा है। इस पुण्य यात्रा पर जाने वाले समस्त शिवभक्तों को हृदय से बधाई।
बाबा बर्फानी के दिव्य दर्शन हों, सभी का जीवन सुख, शांति और कल्याण से परिपूर्ण हो, यही प्रार्थना है।
जय बाबा अमरनाथ।
Tomorrow, 4th July, is a very special day for the people of Jodhpur. The New Terminal Building of Jodhpur Airport will be inaugurated. Jodhpur has a very important place as far as tourism in India is concerned. This upgraded infrastructure will encourage more tourists to come to Jodhpur. It will boost commerce as well.
SIR संदर्भात वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांसोबत सविस्तर चर्चा!
📍 वडगावशेरी
मा.आमदार मा.जगदीशभाऊ मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली SIR संदर्भात वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांसोबत बैठक झाली.
पुणे विमानतळ मेट्रो मार्गाला मंजुरी; कल्याणीनगर ते विमानतळ मेट्रोमार्ग होणार साकार !
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला बळ देणारा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यनगरीचे खासदार तथा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कल्याणीनगर ते पुणे विमानतळ मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पामुळे पुणे विमानतळाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो नेटवर्कची थेट जोडणी मिळणार असून, प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या आधुनिक, शाश्वत आणि सक्षम वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
#PuneAirport #PuneMetro #पुणे_विमानतळ #PuneCity #BJP4Pune
@narendramodi@Dev_Fadnavis@mohol_murlidhar
SIR संदर्भात वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांसोबत सविस्तर चर्चा!
📍 वडगाव शेरी
SIR संदर्भात वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांसोबत बैठक झाली. या बैठकीत SIR प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन, समन्वय आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा केली.
मतदारसंघातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत आवश्यक माहिती प्रभावीपणे पोहोचावी, तसेच प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
#SIR #वडगाव_शेरी #Pune #Maharashtra
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@BJP4India@BJP4Maharashtra
विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे महान विचारवंत, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनी कोटी-कोटी प्रणाम !
स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्माला समाजसेवेची जोड देत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला, जो आजही रामकृष्ण मिशनच्या कार्यातून जिवंत आहे. अनाथ, गरीब आणि गरजूंची सेवा हेच आपले परम कर्तव्य मानत त्यांनी आयुष्यभर निष्ठेने कार्य केले. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाकार्याने लाखो लोकांच्या जीवनात आशा, आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण केले.
#स्वामी_विवेकानंद #Swami_Vivekananda #स्वामी #विवेकानंद
पुणे-शिरूर दुमजली उड्डाणपूल प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी!
📍विधानभवन, मुंबई
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, नागरिकांचा प्रवासातील वाढता वेळ आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची विधानभवन येथे भेट घेत पुणे-शिरूर दुमजली उड्डाणपूल (Double Decker Flyover) प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यासंदर्भातील सविस्तर निवेदनही त्यांना सादर केले.
पुणे, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर ते शिरूर या संपूर्ण पट्ट्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान व्हावा, इंधनाची बचत होऊन प्रदूषणात घट यावी तसेच औद्योगिक, व्यापारी, कृषी आणि निवासी विकासाला गती मिळावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे.
याबाबत मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निश्चितच गती घेईल, असा विश्वास आहे.
#DevendraFadnavis #Pune #Double_Decker_Flyover #PuneNagarHighway #Infrastructure #Maharashtra #शिरूर
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपल्याला उत्तम आरोग्य आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#Birthday#वाढदिवस#MLA#VikramPachpute#BJP@VikramPachpute_
वडगावशेरी येथील लोणकर माध्यमिक विद्यालय येथे श्री ज्ञानेश्वर शिंदे यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.