ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘प्रहार’, ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांपर्यंत पोहोचला. प्रत्येक भूमिकेत नानांनी केवळ अभिनय केला नाही, तर आपल्या विलक्षण आवाजाने, देहबोलीने आणि अस्सल अभिनयाने व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केली.
मराठी मातीतून उभा राहिलेला हा असामान्य अभिनेता आपल्या प्रतिभेच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर अमीट ठसा उमटवून गेला. त्यांचे जाणे म्हणजे एका प्रभावशाली अभिनय पर्वाचा अंत आहे.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#NanaPatekar #Actor #Shradhhanjali
Heartiest congratulations to Karan Darda on being elected president of the Indian Newspaper Society, the apex body representing all newspapers, magazines and periodicals in India.
I am very glad that he is following in the footsteps of @vijayjdarda Bhaiyya who was the president of the INS in 1997-98.
This is a proud and significant moment, not just for Karan, but for the entire Lokmat family. His experience of serving as deputy president and vice-president of INS will be beneficial as he takes the reins of this prestigious body.
At Lokmat, Karan’s innovative initiatives across editorial, operations, circulation and marketing have made a significant impact. I am sure his vision, energy and forward-looking approach will bring the same dynamism to the INS and contribute to the growth and progress of the newspaper industry.
Wishing Karan great success in this new responsibility. I am confident that he will lead the INS with vision, conviction and distinction.
@devendarda@rishidarda@karandarda@lokmat
सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
"सुंदर ते ध्या�� उभे विटेवरी..."
विटेवर उभा असलेला विठ्ठल हा केवळ देव नाही; तो महाराष्ट्राच्या भक्ती, समता, श्रमसंस्कृती आणि माणुसकीचा शाश्वत आधार आहे. लाखो वारकऱ्यांच्या पावलांतून आजही संतांची भक्ती परंपरा जिवंत आहे.
राज्यात भरपूर पाऊस होवो, सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती नांदो, ही देवाचरणी प्रार्थना
#AshadhiEkadashi #Vitthal #Pandharpur
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या पहिल्या डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्काराने रविवारी नांदेड येथे झालेल्या एका समारंभात मला सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ विधिज्ञ खा. उज्��ल निकमजी यांच्या हस्ते,आणि खा. अशोकरावजी चव्हाण, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरजी, आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.
दूरदृष्टी, शिस्तप्रियता, कर्तव्यदक्षता आणि निष्कलंक सार्वजनिक जीवन यांचे प्रतीक असलेल्या तसेच मराठवाड्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या थोर नेत्याच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मी अत्यंत नम्रतेने स्वीकारला.
नांदेडकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड गर्दी केली होती. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह खचाखच भरले होते. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर खा. अशोकरावजी चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन आणि बारकाईने केलेली व्यवस्था प्रकर्षाने जाणवत होती.
खरे तर जीवनगौरव पुरस्कार हा आयुष्यभर केलेल्या कार्याचा सन्मान असतो. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण आणि उद्योग या विविध क्षेत्रांत मी माझ्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अजूनही बरेच काही करायचे आहे, अशीच माझी भावना आहे. हा सन्मान पुढील वाटचालीसाठी मला निश्चितच नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल.
या गौरवाबद्दल अशोकरावजी चव्हाण आणि दैनिक सत्यप्रभा परिवाराचे आभार.
#Nanded #ShankarraoChavan
#award
@AshokChavan1958
आजचा दिवस लोकमत परिवार आणि दर्डा कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा, अभिमानास्पद आणि भावनाविवश करणारा आहे. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोरील ‘जवाहरलाल दर्डा चौक’ येथे त्यांच्य��� अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, जलसंधारण मंत्री संजय राठोड, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच माझे ज्येष्ठ बंधू डॉ. विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री म्हणून बाबूजींनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आणि अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या. राज्याच्या राजधानीत त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणे हा आमच्या परिवारासाठी आनंद, अभिमान आणि कृतज्ञतेचा अविस्मरणीय क्षण आहे.
बाबूजींनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि मार्गदर्शन हाच आमच्या वाटचालीचा आधार आहे. जयंतीदिनी बाबूजींना विनम्र अभिवादन.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @rahulnarwekar @girishdmahajan @SanjayDRathods
@ShelarAshish @MPLodha
@vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda
'लोकमत'ची विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात घोडदौड सुरू असताना मुंबईत लोकमत न्यायचा ही संस्थापक बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांची इच्छा होती. बघता बघता या आवृत्तीला आज २५ वर्षे पूर्ण झाली. आनंद आणि कृतकृत्य झाल्याची भावना मनात आहे. लोकमत टीमच्या अथक परिश्रमाचे हे फलित आहे. मुंबईच्या चोखंदळ वाचकांनी 'लोकमत'ला आपल्या हृदयात स्था��� दिले त्याबद्दल आभार.
@vijayjdarda @rishidarda @karandarda @kkatul @ashish_jadhao
मुंबईतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळा भव्य दिव्य ठरला. विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती, आपल्या कामाने राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार, अतिशय सुंदर मुलाखती... खरेच ती एक शानदार संध्याकाळ होती. महाराष्ट्र म्हणजे रत्नांची खाण आहे याची प्रचिती आली. Congratulations RISHI and team Lokmat.
@lokmat@JM_Scindia@mangalam99@RajThackeray@Riteishd@Varun_dvn@vijayjdarda@devendarda@rishidarda@karandarda
#Mumbai #LokmatMaharashtrianOfTheYear2023