पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे #वाशिम जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, पिकांची स्थितीबाबत आढावा घेतला. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लसीकरण मोहिमेला गती द्यावी, साथीच्या आजारांवरील उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या.
#वाशिम जिल्ह्यात आणखी २९ कोरोना बाधित; २९ जणांना डिस्चार्ज,
दोन मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे
#कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१३४४
ऍक्टिव्ह – २८२
डिस्चार्ज – ४०४४४
मृत्यू – ६१७
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे.)
#सामाजिकन्यायदिन
छत्रपती #शाहूमहाराज यांनी सन १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला. मागासवर्गासाठी राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे #शाहूमहाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते होत.
#लोकराजाशाहू@MahaDGIPR
छत्रपती #शाहूमहाराज यांनी समाजातील दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. आपल्या संस्थानात सन १९१७ मध्ये सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. प्रत्येक गावात प्राथमिक शाळा सुरू केली.
#लोकराजाशाहू#सामाजिकन्यायदिन@MahaDGIPR
#कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत #वाशिम जिल्ह्यात देण्यात येत असलेल्या दोन्ही लसी सुरक्षित व परिणामकारक आहेत. त्यामुळे अफवांना बळी न पडता पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
#coronavaccination
आज ६ जून. सर्व धर्मांना समानतेने वागवणारे, प्रजेला न्याय व सुख देणारे #छत्रपती_शिवाजी_महाराज यांचा स्वराज्याची राजधानी रायगडावर सन १६७४ मध्ये याच दिवशी राज्याभिषेक झाला. या सालापासून महाराजांनी ‘राज्याभिषेक शक’ सुरु केला, ते ‘शककर्ते’ राजे बनले.
#शिवस्वराज्यदिन@MahaDGIPR
#छत्रपती_शिवाजी_महाराज यांनी राज्यकारभार चालविण्यासाठी अष्टप्रधानांची नियुक्ती केली. ‘राजव्यवहारकोश’ तयार करवून घेतला. पर्शियन भाषेचा प्रभाव झुगारून देवनागरी लिपीत स्वतंत्र नाणी पाडली, स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरु केले, ही एक क्रांतिकारी घटना होती.
#शिवस्वराज्यदिन
शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरु झाला तेव्हा शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. राज्याभिषेकानंतरही हीच मुद्रा कायम राहिली. ती मुद्रा अशी होती-
“प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”
#शिवस्वराज्यदिन
पर्यावरण रक्षणाचे महत्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील जंगले नष्ट होणार नाहीत, याकडे लक्ष दिले होते. आंबे, फणस इत्यादी झाडे वर्षा-दोन वर्षात तयार होत नाहीत, त्यामुळे अशी झाडे तोडू नयेत, असे हुकुम त्यांनी दिले होते.
#शिवस्वराज्यदिन#पर्यावरण_दिवस@MahaDGIPR
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री @SandipanBhumare यांनी आज #कारंजा तालुक्यातील जानोरी येथील कामांना भेट दिली. ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ई- क्लास जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामाची त्यांनी पाहणी केली.
(१/३)
#वाशिम येथे आ. लखन मलिक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका पूनम सराफ यांना लस देवून #कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची उपस्थिती.
#वाशिम जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेसाठी #कोविशील्ड या #कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीचे ६५०० डोस प्राप्त झाले. लसीची वाहतूक करणारे वाहन जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी नारळ फोडून स्वागत केले.
@MahaDGIPR
#कोरोना_अलर्ट#वाशिम जिल्ह्यात ४० कोरोना बाधित; ०६ जणांना डिस्चार्ज.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ६०२८
ऍक्टिव्ह – २०८
डिस्चार्ज – ५६७४
मृत्यू – १४५
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)
कोरोना विरुद्ध जनजागृती मोहिमे अंतर्गत #वाशिम जिल्हा माहिती अधिकार विवेक खडसे यांनी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona@InfoWashim
#वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत #कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागांविषयी घेण्यात आलेल्या #लॉकडाऊन निर्णयाची आणि #जिल्हाबंदी ची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
#Airpics सुनील कांबळे