विजय विद्यार्थी एकजुटीचा…
विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा…
विजय विद्यार्थ्यांच्या चिकाटीचा…
महात्मा गांधी यांच्या सत���याग्रहाच्या मार्गाने गेल्या अकरा दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्याग्रहाला भेट देऊन आंदोलकांशी यशस्वी चर्��ा केली आणि २०२१ पासूनच्या सगळ्या पेपरफुटीच्या चौकशीसाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ च्या चौकशी कायद्यानुसार न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली. विशेष म्हणजे आयोगाच्या सचिवपदी स्वच्छ प्रतिमेचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी मा. तुकाराम मुंडे साहेब यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये न्या. पी. डी. नाईक, पोलीस अधिकारी लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचाही समावेश आहे. ही चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या दबावामुळं MPSC अध्यक्ष भिमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं येत्या दोन महिन्यात चौकशीच्या माध्यमातून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होऊन आयोगातील सर्��च आजी-माजी भ्रष्ट अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी या सर्वांचाच खरा चेहरा पुढं येईल.
महत्त्वाचं म्हणजे यापुढील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा, राजस्थानच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घेण्याचा, वेळेत निकाल, प्रतिक्षा यादी लावणं, रिक्त जागा भरणं, जागांमध्ये वाढ यासह विद्यार्थ्यांच्या इतर १४ मागण्याही सरकारने मान्य केल्या. तसंच विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आणि विद्यार्थी, क्लासचालक व टेलिग्राम चॅनल चालक यांना दिलेल्या नोटीसाही मागे घेण्याचं सरकारने मान्य केलं. हा विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक एकजुटीचा विजय आहे. याबाबत सत्याग्रह सुरु असताना उपोषणाला बसलेले आणि गेली अकरा दिवस रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन! विद्यार्थी सत्याग्रहाची सांगता अशा प्रकारे गोड होताच पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरील ��ंदोलनस्थळी असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला… हा जल्लोष आणि हा आनंद शब्दांच्या पलिकडे होता, यातूनच विद्यार्थी या भ्रष्ट व्यवस्थेला किती वैतागले आहेत, हेच स्पष्ट होतं.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेले सर्वपक्षीय नेते मंडळी, आदरणीय पवार साहेब, खा. सुप्रियाताई, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर, माध्यमांचे प्रतिनिधी, सोशल मिडियात व्यक्त होणारी मंडळी यांच्यासह या आंदोलनातील सर्व संयोजक, त्यांचे सर्व सहकारी, क्लास चालक या सर्वांनी दिलेल्या पाठबळाचं हे यश आहे. याबाबत या सर्वांचे आभार! सरकारचा दबाव असतानाही सहकार्याची भूमिका घेतलेले पोलिस प्रशासन तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनातून यशस्वी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणारे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांचेही आभार! आंदोलनादरम्यान, सामाजिक दा��ित्त्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या जेवणाची काळजी घेणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींचेही मनापासून आभार..!
आता सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चौकशी आयोगाकडून वेळेत निष्पक्ष पद्धतीने चौकशी होईल आणि MPSC सारख्या महत्त्वाच्या संस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मुळासकट काढून या संस्थेला पुन्हा पुनर्वेभव प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्याला गुणवत्ता असलेले प्रा���ाणिक अधिकारी मिळतील, असा विश्वास आहे.
या आंदोलनाचा एक भाग होण्याची संधी विद्यार्थ्यांनी विश्वासाने दिली याबाबत त्यांचे मनापासून आभार..!
#MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSCProtest
#विद्यार्थी_एकजूट #सत्याग्रहाचा_विजय
#विद्यार्थ्यांचा_विजय
भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला एक स्थिर सरकार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. - शरद पवार
https://t.co/86dYKEv9lg < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews#SharadPawar#bjp#politics@PawarSpeaks
हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या @RRPSpeaks ह्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा पुन्हा एकदा गैरवापर! ही लढाई आता सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते अशी आहे! अंतिम विजय सत्याचाच असणार!
आज वसुबारस कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा आजचा दिवस. कृषिप्रधान भारताचे महत्व सांगणाऱ्या या मंगलमय दिवशी बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच प्रार्थना व वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#राष्ट्री��_एकता_दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
स्वतंत्र भारताच्या अखंडतेकरिता अविश्रांत प्रयत्न करणारे भारतरत्न लोहपुरुष #सरदार_वल्लभभाई_पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
आज #दसरा..!
आपल्या संस्कृतीतील एक शुभ मुहूर्त आणि महत्त्वाचा सण म्हणजे #विजयादशमी..!
आपल्या सर्वांचे सर्व शुभ संकल्प पूर्ण होऊन सर्वांना सुख,समृद्धी आणि आनंद लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..!
#HappyDusshera#VijayaDashami2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय ��ासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, खासदार फौजिया खान यांच्या मान्यतेने सौ. रोहिणीताई खडसे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष, माननीय आ. जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय आ. जितेंद्र आव्हाड, माजी आमदार व कोषाध्यक्ष हेमंत टकले, माजी मंत्री, आ. अनिल देशमुख, आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री, आ. राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, आ. विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नगरालकर, मुंबई कार्याध्यक्षा राखीताई जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर व अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्य���सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.