सत्तेत येण्यासाठी महायुतीने राज्यातील युवांना नोकरीचे आश्वासन दिले. राज्यातील युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सारखी कंत्राटी योजना आणली गेली. पण या योजनेतील युवांचा गेल्या ६ महिन्यांपासूनचा पगार देखील सरकारने केला नाही. सोबतच कार्यकाळ संपल्यावर युवांना काय करायचं याबाबतही सरकारने कसलीही स्पष्टता दिली नाही.
परिणामी राज्यभरातील युवांकडून आज नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. सदरील आंदोलक युवांच्या संतप्त भावना सरकारने समजून घेणे गरजेचे असताना सरकार मात्र 'गरज सरो वैद्य मरो' या प्रकारे निष्ठुरपणे वागत आहे. सरकारने तात्काळ आंदोलक युवांशी संवाद साधून काहीही विपरित घडणार नाही याची काळजी घेण्यासोबतच युवांचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, ही विनंती...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
राजकीय स्वार्थासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मु���्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करणाऱ्या सरकारने आता राज्यातल्या युवांना वाऱ्यावर सोडलं आहे. एकतर योजना कंत्राटी स्वरूपाची होती त्यात वेळेवर पगार देखील देण्यात आले नाहीत परिणामी योजनेतील युवांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने आपल्या न्याय्य मागण्यासाठी राज्यभरातील युवा मोठ्या संख्येनं नाशिकमध्ये आंदोलन करत आहेत.
सरकारने किमान आपले प्रतिनिधी पाठवून युवांच्या मागण्यांबाबत चर्चा करणं अपेक्षित होते परंतु दुर्दैवाने या सरकारला मात्र युवांचे काही घेणे देणे दिसत नाही. युवांना गृहीत धरणार असाल तर इतिहासातील सर्वात भ्रष्ट असलेल्या या सरकारला पायउतार करण्याशिवाय युवा स्वस्थ बसणार नाहीत, हे सरकारने लक्षात असू द्यावे.
@Dev_Fadnavis
इलेक्शनच्या आधी दिलेलं वचन पाळा!
मा. देवेंद्र फडणवीस, मा. एकनाथ शिंदे आणि मा.मंगलप्रभात लोढा साहेब मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना वाऱ्यावर सोडू नका 🚫💼 प्रश���क्षणार्थ्यांना योग्य रोजगार द्या,त्यांच्या मेहनतीचा आणि आशेचासन्मानकरा#YuvaHit#JusticeForTrainees# #ElectionPromise
इलेक्शनच्या आधी दिलेलं वचन पाळा! मा. देवेंद्र फडणवीस, मा. एकनाथ शिंदे आणि मा. मंगलप्रभा�� लोढा साहेब मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना वाऱ्यावर सोडू नका प्रशिक्षणार्थ्यांना योग्य रोजगार द्या, त्यांच्या मेहनतीचा आणि आशेचा सन्मान करा!#CMYKPY##JusticeForTrainee@CMOMaharashtra