एमएमआर परिसरात अदानी समूहाचा सुरु असलेला विस्तार जरूर पहा. मुंबई गुजरातला न मिळता महाराष्ट्राला मिळाली याचा अजून राग असलेल्या काही शक्ती आता या उद्योगसमूहाला हाताला धरून मुंबईवर आणि एमएमआरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत... अदानी समुहाचा एमएमआर परिसरातील विस्तार जरूर पहा...
२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
आज शिवतीर्थावर
‘शिवशक्ती’
एकवटली ती मुंबईसाठी लढण्याच्या निर्धारानेच!
मुंबईच्या लुटारुंच्या समोर ही ‘शिवशक्ती‘ आता नव्या ऊर्जेने उभी आहे, मुंबई आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी!
चला सज्ज होऊया...!
शेवटी पोटातलं ओठांवर आलंच... भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका... पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या... @annamalai_k@BJP4India शहरांची नावे फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात.
मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही! आणि
मुंबई महाराष्ट्राचीच !
जय महाराष्ट्र!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे ह्यांनी शिवशक्तीचा वचननामा शिवसेना भवनमधील भवानीमातेसमोर ठेवून दर्शन घेतले.
#मुंबई महाराष्ट्राची आहे आणि हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ आलीये. आमची पोरं उपाशी आणि परप्रांतीय तुपाशी हे धोरण आता महाराष्ट्रात चालणार नाही.
जय महाराष्ट्र 🚩
कोस्टल रोड म्हणजे मुंबईला वेग देणारं, मुंबईकरांची प्रवासात होणारी वाताहात थांबवणारं पक्षप्रमुख, मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या दूरदृष्टीमुळे साकार झालेलं स्वप्न!
कोण किती खोटारडं असू शकतं, हे ह्या निर्लज्जांना पाहून कळतं... कोस्टल रोडचं जसं हे क्रेडिट चोर श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत, तसंच आज होर्डिंग लावलं आहे की वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा पुतळाही ह्या खोटारड्यांनी बसवला.
पुतळ्याची जागा, पुतळ्याचं रुप हे उद्धवसाहेबांनी ठरवलं, तो बसवलाही उद्धवसाहेबांनी आणि फी पण उद्धवसाहेबांनीच दिली!
पण चोर ते चोरच... सरळ होऊच शकत नाहीत...मिंधेंच्या आरश्यात त्यांना चेहरा तरी स्वतःचा दिसतो की तोही चोरलेला?
#CreditChor