Dear @Vivo_India,
I purchased a Vivo X100 around 1.5 years ago. After installing the recent software updates, the camera quality has deteriorated significantly. Photos are blurry, processing is poor, and the overall camera performance is much worse than before. Fix this. #vivo
🔅भगवंताने ऊसाला गोडवा दिला,पण त्याला फळ दिलं नाही.
🔅सोन्याला चमक दिली,पण त्याला सुगंध दिला नाही.
🔅चंदनाला सुगंध दिला,पण त्याला फुलं दिली नाहीत.
🔅समुद्राला विशालता दिली,पण त्याचं पाणी गोड केलं नाही.
🔅नदीला गोड पाणी दिलं,पण तिला स्थैर्य दिलं नाही.
🔅कमळाला पावित्र्य दिलं,पण ते चिखलात फुलवलं.
🔅भगवंताने स्वतःच्या अंशाला म्हणजेच
सूर्याला प्रकाश दिला,पण त्याला शीतलता दिली नाही.
🔅चंद्राला शीतलता दिली,पण त्याला स्वतःचा प्रकाश दिला नाही.
🔅विधात्याने हे सर्व काही जाणीवपूर्वक घडवून आणले.
विद्वानाला ज्ञान दिलं,पण संपत्ती दिली नाही.
🔅पराक्रमी राजाला सामर्थ्य दिलं,पण दीर्घायुष्य दिलं नाही.
हे सर्व यासाठी केलं,कारण...
अभावच माणसाला जमिनीशी जोडून ठेवतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻
#सुप्रभात
कित्येक लोकांना त्यांच्या आयुष्यातील माणसं, एकंदरीत आयुष्य हे जसं आहे त्यापेक्षा नेहमी थोडंफार better हवं असतं कदाचित इतरांशी नकळत झालेल्या तुलनेतून वाटतं असावं..पण त्यांच्याजवळ जे आहे ते best आहे.. आणि त्या best पेक्षा better काही नसतं हे खुप उशीरा कळतं..
-समाधान
-पैसा
-प्रसिद्धी
-आवड
या चार गोष्टींपैकी कोणती ना कोणती तरी किमान एक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात top priority वर असते मग तीच गोष्ट माणसाला नेहमी धावत ठेवते. काम करण्यासाठी प्रेरणा देत असते. कितीही मरगळ आली किंवा काहीही झालं तरी पुढं चालत राहण्यासाठी Priority वर काहीतरी चांगलं असणं अत्यंत आवश्यक असतं. ज्या गोष्टीची आवड आहे ती करत राहिलं की कधीनाकधी आनंद मिळून तृप्ती भेटतेच. आयुष्यात आनंद आणि समाधान या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. #गब्बर_बोले
Deadliest Combo
Middle Class
+ Average Student
+ General Category + Eldest Son
+ Introvert + Social Anxiety
+ Bad Communication Skills
= 💀The ultimate struggle combo 💀
#Life
उद्धव ठाकरेंनी निरोपाच्या भाषणाचा सुरेश भटांच्या कवितेनं शेवट केला.. ती कविता..
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
मी कुणाला कळलोच नाही…!
मी कुणाला कळलोच नाही…!
- सुरेश भट
विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभं राहिलं की प्रथमदर्शनी वाटतं—देवाने जणू डोळे मिटले आहेत. पण त्या शांत नेत्रांमध्ये एक गूढ रहस्य दडलेलं असतं. विठ्ठलाचे डोळे वरती नसून खाली वळलेले असतात, कारण तो आपल्या पायाशी असणाऱ्या भक्तांकडे प्रेमाने पाहत असतो. भक्तांच्या समर्पणातच त्याला दर्शन मिळतं, आणि म्हणूनच देवाचे डोळे मिटलेले नसून भक्तांच्या हृदयात उघडे असतात.
प्रि अँड्रॉइड रिव्होल्युशन काळात आपल्या दूरच्या ओळखीतलं कुणी वारला तरी लोक हळहळयाची.आत्ता शेजारचा मेला तरी लोक तासाभरात पुर्ववत होतात.आत्ता सगळं बॉइल्ड डाउन होऊन स्टेटस,स्ट्रोरिज वर येऊन ठेपलंय.माझ्या मृत्यूवेळी मी कोणालाच बोलावणार नाही. मी एकटा गाणी ऐकत यमाच्या रेड्यावर जाणार.
मागच्या महिन्यात मालवणला जाताना संध्याकाळी कोल्हापूर मधे थांबलो..
हॉटेल चेक इन करताना हॉटेलवाल्याने माझी बाईक पाहून तुम्हाला गाड्यांची आवड आहे का असे विचारले...
का? असे विचारताच त्याने सांगितले त्याकडे काही गाड्यांचे कलेक्शन आहे तुम्हाला दाखवतो सांगितले...चेक इन चे सोपस्कार पार पाडून....
त्याच्या हॉटेल पाठीमागील पार्किंग मधे घेऊन गेला..तेव्हा जे पाहिलं आणि अवाक झालो...
ज्या जुन्या गाड्या फक्त ऐकल्या आणि फोटो पहिल्या ...त्या पठ्ठ्याने वेल मेन्टेन्ड ठेवल्या होत्या...रनिंग कंडीशन मधे...
Lambretta ४८ ही गाडी तर इटालियन आहे..या साध्या दिसणाऱ्या माणसाकडे दोन दोन होत्या...
कोल्हापूरची माणसं चांगली आणि हौशी पण असतात..
एकदम फॅन झालो त्या गाड्यांचा...भरपूर फोटो काढले पण चारच दाखवता येतील..