@Pankajamunde
महोदया,
आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी.
यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
विषय - कृषीसेवा/वनसेवा/स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायाबाबत
MPSC चा कृषीसेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या परीक्षा रेटून नेण्याचा अट्टाहास का?
1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.
2) SEBC विद्यार्थ्यांनी EWS मधून SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील त्यांना EWS मध्येच दाखवत आहे.
3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे core EWS विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे. आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.
4) आयोगाने कृषी /वन / अभियांत्रिकी या निकालामध्ये कोणत्या नियमानुसार फक्त EWS विद्यार्थ्यांचा रेशो वाढवला
भविष्यातील न्यायालयीन लढाईमध्ये अडकणारी जाहिरात वेळीच दुरुस्त करून या शेतकऱ्यांच्या लेकरांना न्याय द्यावा मगच मुख्य परीक्षा घ्यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
संयुक्त गट ब 2024 जाहिरात:-
गृह विभागाने PSI चे 441 जागांची मागणीपत्रक पाठवलेले.
जाहिरात सुधारित झाल्यावर 441 मधील जागा कमी करून 216 जागांची जाहिरात काढली गेली
@Dev_Fadnavis साहेब, ह्या कमी झालेल्या जागांचे मागणीपत्रक पुन्हा पाठवावे.
#संयुक्त_2024_जागावाढ#combine_2024_जागावाढ
हॅलो कामचुकार आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
निकाल काय आता चंद्रावर जाऊन लावणार आहात का ?
10 महिने झाले पेपर तपासात आहात की अक्षर मोजत बसलात?
#FSOCIVILMAINSRESULT23
या आठवड्यात तरी FSO आणि अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर होणार काय?
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024
FSO मुख्य परीक्षा 2023
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 10 फेब्रुवारी 2024
मुख्य परीक्षा होऊन 10 महिने झालेत अजूनही निकाल नाही.
लेखी परीक्षांच्या निकलांना होणारा विलंब उमेदवारांना अस्वस्थ करीत आहे.
@mpsc_office@Drsuvarnas
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024
मुख्य परीक्षा होऊन 10 महिने झालेत अजूनही निकाल नाही.
FSO मुख्य परीक्षा निकालाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
@mpsc_office
राज्यातील तरूणाईला सरकारी नोकरी करायची आहे आणि सरकारी पदेही रिक्त आहेत, तरिही भ्रष्टयुतीतर्फे कंत्राटी पद्धत अवलंबून कंत्राटदारांकडून टक्केवारी खाण्याचे धंदे सुरू आहेत. भाजपने देश विकायला काढला आहे. याविरोधात रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीविषयी अलीकडील परीक्षांमध्ये दिसून येत असलेल्या विलंबावर सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेषतः FSO (फूड सेफ्टी ऑफिसर) मुख्य परीक्षा निकाल जाहीर करण्यास 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
MPSC ने 2024 पासून राज्यसेवा परीक्षा descriptive पद्धतीने घेण्याची घोषणा केली होती . जेव्हा FSO सारख्या छोट्या परीक्षांमध्येच एवढा विलंब होतो, तेव्हा संपूर्ण राज्यसेवा लेखी परीक्षा कशी प्रभावीपणे पार पाडणार हा एक मोठा प्रश्न आहे.
FSO परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार संपर्क साधूनही आयोगाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. साधी दोन ओळींची सूचना किंवा अपडेट देणेही गरजेचे वाटले नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या प्रकारामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यामुळे MPSC ला परीक्षेची प्रक्रियेतील कार्यक्षमतेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. परीक्षांचे वेळापत्रक, निकाल प्रक्रिया या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवता येईल आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान होईल.
सरतेशेवटी, आयोगाने आपली जबाबदारी ओळखून तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी आणि निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अन्यथा विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान अक्षम्य ठरू शकते.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@ajitpawarspeaks@PawarSpeaks@NANA_PATOLE@VijayWadettiwar@Jayant_R_Patil@RealBacchuKadu@AbhiPawarBJP@BaliramDoleyINC@mpsc_office@Drsuvarnas@TV9Marathi@abpmajhatv@ibnlokmattv1@LoksattaLive@SakalMediaNews
मा.@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा खेळखंडोबा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,तहसीलदार,मुख्याधिकारी
होण्याचा अधिकार नाही काय?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केले.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D
व इतर category साठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट- ब व गट -क जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे चक्क 9 महिने जाहिरात
उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले.परिणामी त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
@Dev_Fadnavis महोदय ,
ह्या age bar candidates च काय करणार आहात ? त्यांच्या नुकसानीस
फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून
काय साध्य केले ?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 209 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क
शून्य जागा ????
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात
हरवल्या की काय ????
👉 1000 रुपये फीस च्या नावाखाली लुटले,form भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
माहित होते ना आचारसंहिता लागणार आहे.
मग ह्यांचा विचार का केला नाही ?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर नाहीत.
👉ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांना नियुक्त्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासनांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही ?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय
काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता,आहे व असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
मा. धनंजय मुंडे जी,
आपण जबाबदार मंत्री आहात.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे.
आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे.
कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती !
#कृषी_सेवा_भरती
@dhananjay_munde@mieknathshinde
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
यंदाची राज्यसेवा परीक्षा #objective पद्धतीची शेवटची परीक्षा असल्याने यंदाच्या परीक्षेत सर्वच ३५ संवार्गांचा समावेश करून dysp, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच #combine परीक्षेची जाहिरात भरघोस पदांसह लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर काढावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
विद्यार्थी सरकारकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत असताना देखील सरकार मात्र हा विषय SERIOUS पणे घेत नाही, सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #Rajyaseva |
#StudentsRights |
अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने सुधारीत आकृतीबंध मंजूर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणं बंद करावे.
FDA मध्ये हजारो कर्मचाऱ्यांची गरज असून सरकारने याकडे लक्ष द्यावे.
@mieknathshinde