महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी: रोजगार आणि स्वयं रोजगार विभाग, पदाधिकारी मासिक बैठक @टिळक भवन, दादर, मुंबई.
प्रमुख निर्णय:
१. मुंबई + पुणे येथे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रोजगार मेळावे
२. राज्यव्यापी रोजगार संवाद कार्यक्रम
३. रोजगार यात्रा, आंदोलन
@INCMahaSandesh
प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks@MahaDGIPR@INCMaharashtra@INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
PMC भरती परीक्षेतील गैरव्यवहाराची SIT मार्फत सखोल चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी आणि पुणे महानगरपालिकेने पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह पुनर्परीक्षा तातडीने घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. पारदर्शक भरती हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, उपकार नाही!
@INCHarshsapkal@PMCPune@Dev_Fadnavis@degree_holders@CongressRojgar
#PMC #Congress #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
कॉकरोच जनता पार्टीला बाहेरुन फंडिंग येतंय असा आरोप केला जातोय. पण मला वाटतं अमित शाह गृहमंत्री असताना हे शक्य कसं झालं? हे तर अमित शाहांचं, गृहमंत्र्यांचं अपयश आहे. तुम्ही चाणक्य कसले मग, तुम्ही असताना बाहेरुन फंडिंग येत असेल, बाहेरुन पार्टी चालवली जात असेल तर मग तुम्ही फेल झालात. त्यामुळे तुम्हीही राजीनामा दिला पाहिजे. - अभिजीत दीपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी
#AbhijeetDipke #AmitShah #BJP #CJP #LatestNews #Protest
(Abhijeet Dipke, Amit Shah, BJP, CJP, Protest)
मोशी येथील कचरा डेपो परिसरातील दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या घनकचरा, पर्यावरण आणि इतर संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता बडतर्फ करण्याची आणि त्यांच्यासह संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याशिवाय या कचरा डेपोतील रसायनमिश्रित घाण पाण्यामुळं या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असून याबाबतही आवश्यक ती कारवाई आणि तातडीच्या उपाययोजना करण्याचीही मागणी केली.
याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेतील ६० ते ७० टक्के कॅमेरे बंद असून हा जनतेच्या पैशांचा अपव्यय तर आहेच पण नागरिकांच्या सुरक्षेलाही हा गंभीर धोका आहे. त्यामुळं या संपूर्ण यंत्रणेचंही स्वतंत्र ऑडिट करून बंद असलेले सीसीटीव्ही पूर्ववत सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचीही मागणी केली.
अपेक्षा आहे की यासंदर्भात महापालिका योग्य निर्णय घेतील, त्यासाठी पुढील १० दिवस आम्ही वाट बघू अन्यथा सामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्यावतीने नाईलाजाने महापालिकेला ताला ठोको आंदोलन करावं लागेल..!
#मोशी_दुर्घटना #पिंपरी_चिंचवड #कचरा_डेपो #दोषींवर_कारवाई_झालीच_पाहिजे #पिंपरी_चिंचवड_महापालिका
आंदोलनावेळी मुलांवर जे फायरिंग झालं, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. -अभिजीत दीपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी
#AbhijeetDipke#AmitShah#BJP#CJP#LatestNews#Protest
(Abhijeet Dipke, Amit Shah, BJP, CJP, Protest)
पुरावेच लागतात ना?
अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..!
पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला?
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते.
उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…!
फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@ChitraKWagh
#सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठ #बोगस_डिग्री_प्रकरण
"दगडावरील फिंगरप्रिंट देखील पोलिसांनी घेतले आहेत. त्यानुसार तपास होईल," हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांचे फॉरेन्सिक तपासाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारे वक्तव्य ऐकले आणि उर भरून आला.
त्यांनी ही टेक्नॉलॉजी महाराष्ट्र पोलिसांना सांगावी, जेणेकरून त्यांच्याच खात्यातील बोगस डिग्री प्रकरण, MH-CET असेल किंवा MPSC ची फूड अँड ड्रग्स इन्स्पेक्टर भरती, NEET, तलाठी पेपरफुटी यांचा तपास योग्यपणे होईल.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील फॉरेन्सिक टीमसाठी दादांचे गेस्ट लेक्चर ठेवता येतील का? याचा विचार करावा आणि शक्य असल्यास निखळ मनोरंजन हे एक वेगळे खाते काढून त्याचा अतिरिक्त कारभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे द्यावा.
तसेच स्वामित्व (पेटंट) अधिकारांसाठी देखील अर्ज करून घेणे गरजेचे आहे. भारतावर दबाव टाकून हवे तसे करार करून घेणाऱ्या अमेरिकेला हे तंत्रज्ञान वापराच्या वाटाघाटीसाठी उपयोगी होऊ शकतो, याचा विचार देखील व्हायला हवा!
#ChandrakantdadaPatil #MPSC #NEET #पेपरफुटी #बोगस_डिग्री #महाराष्ट्र
GenZ का मतलब है 'गटर जेनरेशन'। वे बदसूरत और भ्रष्ट हैं। पढ़ाई-लिखाई में अच्छे नहीं हैं।" - कंगना रनौत, सांसद, बीजेपी।
यह विडियो किसी Gen-z की होगी शायद!
#NEET पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे..!
तपास यंत्रणानी यासंदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील रॅकेट उघडकीस आणावं, ही विनंती!
(या पेपरफुटीसंदर्भात पुढं आलेले स्किन शॉट, मेल, संभाषण हे सगळं सोबत दिलेल्या लिंकवर गेल्यास पहावयास मिळेल.)
Following the NEET re-examination that was conducted after the paper leak, new allegations have emerged claiming that the question paper for the re-exam was also leaked from Gujarat three days before the examination. If this is true, it is extremely alarming.
The investigating agencies must immediately clarify the facts. If the paper was indeed leaked, the entire racket must be exposed without yielding to any pressure, and those responsible must be brought to justice.
(The screenshots, emails, and conversations related to the alleged paper leak can be viewed through the link provided below.)
#PaperLeak #PaperLeakRacket #Justice #NEETReexamination #Gujrat
https://t.co/oR1Q4BAqIP