@mybmc ने कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता या पदांची परीक्षा ही अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्रावरच घ्यावी.
१००० फी भरून अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्राची मागणी करणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे.
#BMC_at_tcs_ion_centre
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ मध्ये महाघोटाळ्याची शक्यता?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “कनिष्ठ अभियंता” पदाची परीक्षा खाजगी केंद्राच्या ऐवजी फक्त IBPS या सरकारमान्य संस्थेच्या स्वतःच्या परीक्षा केंद्रावर होणे गरजेचे आहे. या विषयावर आम्ही ६ महिन्यांपूर्वी महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य खबरदारी घेण्याची विनंती केली होती.
खाजगी परीक्षा केंद्रे घोटाळ्याचे अड्डे बनल्याचे गेल्या अनेक परीक्षा घोटाळ्यांवरून सिद्ध झाले आहे. तलाठी घोटाळ्याच्या विरोधात आम्ही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसोबत मा. मुम्बई उच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित आहे.
खाजगी केंद्रावर परीक्षेचे नियोजन झाल्यामुळे लाखो तरुणांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना असून आयुक्त मा. भूषण गगराणी यांनी यात स्वतः लक्ष घालून तरुणांना “न्याय” द्यायला हवा.
मुंबई महानगर पालिकेने याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर हजारो तरुण तरुणींना घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल!
@AUThackeray@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan@AAPMaharashtra
#BMC_JE #BMC_SE
#TCS_ION_Digital #IO
♦️BMC ची सरळसेवा भरती 2024 केवळ TCS iON केंद्रावरच झाली पाहिजे.
♦️TCS iON शिवाय इतर परीक्षा केंद्र गैरप्रकार रोखण्यात अपयशी ठरल्याचे वारंवार दिसुन आलेले आहे. तरीही @mybmc चा अश्या केंद्रांवरच भरोसा कसा काय?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती 2024
कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा फक्तं ION डिजीटल केंद्रावर आयोजीत करावी.
खाजगी केंद्रावर मोठ्या प्रमाणात डिजिटल कॉपी झाल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत.
@mybmc@CMOMaharashtra
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis तुमच्या ऊर्जा विभागात काय घोटाळा चालू आहे याकडे लक्ष द्या. जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे तो विश्वास जपा. 🙏🙏🙏.
1. Recruitment जेव्हा आली तेव्हा त्यात खूप सार्या त्रुटी होत्या, त्या आम्ही ch निदर्शनास आणून दिल्या.
"विविध पदांच्या भरती प्रक्रियेत महावितरणचा
महा घोटाळा...."
महावितरण प्रशासनामार्फत सन 2023 मध्ये अकाउंटंट व इंजिनिअर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांबाबतची परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये आयबीपीएस मार्फत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती. मात्र दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांची कुठलीही मार्कलिस्ट जाहिर न करता महावितरण मार्फत सदर भरती प्रक्रिया बाबत डायरेक्ट निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर निवड याद्या मध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसत नाही अक्षरशः निकालातील पारदर्शकतेला काळ फासण्यात आलेल आहे. विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच परीक्षेत मिळालेले विद्यार्थ्यांचे गुण मात्र कुठे देण्यात आलेले नाही. तसेच नॉर्मलायझेशन कसे झाले व नॉर्मलायझेशन नंतर किती गुण वाढले व कमी झाले याबाबत कुठलीही पारदर्शकता नाही. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली अक्षरशः काही विद्यार्थ्यांना 10% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आलेली आहे याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही व सदर गुण कोणत्या कोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही.वेटिंग लिस्ट ही देण्यात आली नाही.महावितरण प्रशासनाने निकालातील पारदर्शला काळाफासून मोठ्या प्रमाणावर हव्या त्या उमेदवारांची घुसखोरी महावितरण प्रशासनाने केल्याचे शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. निकालाच्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात निकालाच्या पारदर्शकतेवर बोंब उठल्यानंतर महावितरण प्रशासनामार्फत सदर निकाल वेबसाईटवरून काढण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच शंका निर्माण झाल्या . याची जाणीव झाल्याने महावितरण प्रशासनाने परत दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला त्याच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
विशेष बाब म्हणजे निकालातील कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसतानाही तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, निवड यादी नंतर प्रतीक्षा यादी, आयबीपीएस चा मूळ फॉर्मेट मधील निकाल व नॉर्मलायझेशन चे गुण कुठेही जाहीर न करता दिनांक 21 जानेवारी पासून यांच्याकडून कागद पडताळणी चा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन चा) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे. विशेष बाब म्हणजे ऊर्जा विभाग हा महाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत असलेल्या मंत्रालयाचा भरती प्रक्रियेचा "पद्धतशीर कार्यक्रम" असा चालत असेल तर बाकीच्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं...
यापूर्वीच्या
भरती प्रक्रियेमध्ये त्याच महावितरण मार्फत मुलांचे सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट व त्यांचे मार्क हे आयबीपीएस च्या फॉरमॅटमध्ये व डिजिटल सही सोबत प्रसिद्ध करण्यात येत होते.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Awhadspeaks@MSEDCL@CMDMSEDCL@AjitPawarSpeaks@ibps_official@IBPSupdates@CMOMaharashtra@VijayWadettiwar @degree_holders
वीज महावितरण कंपनीने सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) या पदांसाठी काढलेल्या जाहिरातीतील त्रुटी व राज्यातील विद्यार्थ्यांच्या मागण्या या संदर्भात आज वीज महावितरण कंपनी चे संचालक मा. विश्वास पाठक यांची भेट घेतली. पेपरफुटी ला आळा बसण्यासाठी परीक्षा IBPS च्या ऐवजी @mpsc_office मार्फत घ्यावी अशी विनंती देखील केली.
अत्यंत जिव्हाळ्याच्या चर्चेत मा. पाठक यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या व भूमिका ऐकून घेतली, आणि अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
आपल्या मागण्यांचा विचार करून महावितरण कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक मा. अरविंद भादीकर यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असे त्यांनी आश्वासन देखील दिले.
धन्यवाद मा. विश्वास पाठक जी.
बेरोजगार युवक व युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने सर्व प्रयत्न करू.
@CMDMSEDCL@connectMSPGCL@MSEDCL@vishwasvpathak