कोणाला वाटतं असेल होणार नाय तर त्यांनी इतिहास बघावा.
"OFFLINE EXAM" ✍️
सर्व MPSC शिक्षक वृंद, पुणे
मागणी न्याय्य आहे
भूमिका ठाम आहे आणि
मार्ग संविधानिक आहे.
यामध्ये पोरांच्या जीवावर मोठा झालेला शाश्वत वाला "महेश पाटील" कुठं दिसला नाय.... काय विषय
#MPSC#स्पर्धा_परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मा. विवेक भीमनवार यांना अभियांत्रिकी विभागातील सर्व भरती परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाईन (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी करणारे निवेदन आज सादर केले.
ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक अडचणी, नॉर्मलायझेशनबाबतचा संभ्रम आणि पारदर्शकतेवरील प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी @mpsc_office ने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.
@bhimanwar@INCHarshsapkal@satejp
#MPSC #Engineering #Students #OMR #CBT #Maharashtra #DhananjayShinde
MPSC परीक्षा संगणकाधारित (CBT) आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात आज #वर्धामध्ये स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
हा केवळ एका जिल्ह्याचा आवाज नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याची सुरुवात आहे.
MPSC ने तात्काळ CBT आणि नॉर्मलायझेशनचा निर्णय स्थगित करून पारंपरिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह ऑफलाइन OMR पद्धत कायम ठेवावी.
विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. त्यांच्या भविष्याशी प्रयोग थांबवा!
#OfflineOMR #NoToCBT #NoToNormalization #MPSC #Wardha
वर्धा 🔥
लाखो विद्यार्थ्यांचा विरोध असतानाही सरकारने आधी संवाद न साधता निर्णय घेतला, ही खेदाची बाब आहे. आता तरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सन्मान करून #MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करून ऑफलाईन परीक्षा कायम ठेवावी.
@mpsc_office#Mpsc_Offline
MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन ऑफलाईन परीक्षा घेण्याची मा. आमदार रोहित दादा पवार साहेब आणि विद्यार्थी शिष्टमंडळ आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
@RRPSpeaks@satejp#Mpsc
दि. २८ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षातर्फे स्पष्ट इशारा दिला होता : "पुढील १० दिवसांत CBT अर्थात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय MPSC ने रद्द केला नाही, तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल."
गेल्या १० - १२ दिवसांत महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांनी, विविध विद्यार्थी संघटनांनी, महाविकास आघाडीच्या घटक पक्ष, लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस पक्षाने सातत्याने आंदोलने केली. मोर्चे, निदर्शने, निवेदने, धरणे अशा लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. तरीही राज्य सरकार आणि MPSC प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नावर तोडगा निघावा, विद्यार्थ्यांची बाजू थेट MPSC समोर मांडता यावी आणि संवादातून मार्ग काढता यावा यासाठी आम्ही MPSC चे अध्यक्ष मा. विवेक भिमनवार यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून काँग्रेसचे प्रतिनिधी, विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली. मात्र, आजपर्यंत अशा बैठकीसाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
MPSC च्या भरती प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य आणि सर्वसमावेशक असाव्यात, ही लाखो विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, डिजिटल सुविधांचा अभाव, तांत्रिक अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील समान संधीचा प्रश्न आणि स्पर्धा परीक्षांवरील विश्वास या सर्व गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून CBT पद्धती लादण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा आहे.
त्यामुळे आता संघर्ष अधिक तीव्र करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बुधवार, दि. ८ जुलै २०२६ पासून नवी मुंबई येथील MPSC मुख्यालय, बेलापूर येथे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू करणार आहोत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस व सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील.
ही लढाई कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही; ती महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची, न्यायाची आणि समान संधीची आहे. राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना आणि न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या आंदोलनाला नैतिक पाठिंबा द्यावा तसेच शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही.
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@DalviAaba@bhimanwar@mpsc_office
#MPSC #CBT #JusticeForStudents #StudentsFirst #Congress #Maharashtra
#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची मागणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी या सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन परीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC #ऑनलाईन_परीक्षा_रद्द_करा
हीच या विश्वासघातकी आणि महाराष्ट्रद्रोही "फडणवीस - पवार - शिंदे" सरकारची सर्वात मोठी "लबाडी" आहे.
स्पर्धा परीक्षार्थी आधी भरतीच्या जाहिरातीतील रिक्त पदे वाढविण्याची मागणी करत होते. आता त्यांना परीक्षेच्या पद्धतीवरच लढा द्यावा लागत आहे. म्हणजेच सरकारने स्वतःची जबाबदारी पूर्णपणे झटकून विद्यार्थ्यांना थेट MPSC समोर उभे केले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि विद्यार्थीहिताची असणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण महायुती सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे.
विद्यार्थ्यांना आश्वासने नकोत, त्यांना न्याय हवा आहे, रिक्त पदे वाढवा, भरती प्रक्रिया वेगवान करा आणि परीक्षांबाबत सातत्यपूर्ण, विश्वासार्ह धोरण जाहीर करा.
@mpsc_office@CMOMaharashtra
#MPSC #Students #Maharashtra #YouthRights
कलम १९ (१)(ए) नुसार सरकारी धोरणांचा निषेध करणं आणि सरकारविरोधात बोलणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. लोकांनी सरकारविरुद्ध आवाज उठवला तर त्यांना गप्प बसवता येणार नाही. निषेध करणं हा गुलामीचा नाही, तर नागरिकत्वाचा पुरावा आहे..!!
- मा. उच्च न्यायालय.
अमरावतीने भाजप सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचारांची भूमी आजही अन्यायाविरुद्ध झुकत नाही. विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे की, भविष्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट आणि अपारदर्शक परीक्षा व्यवस्थेविरुद्ध महाराष्ट्र एकवटला आहे.
#Online परीक्षा म्हणजे घोटाळे, पेपरफुटी, कॉपी माफिया आणि खासगी कंपन्यांच्या नफ्याचे मॉडेल!
#Offline परीक्षा म्हणजे पारदर्शकता, समान संधी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचा सन्मान!
सत्ताधाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेणे थांबवावे. प्रत्येक भरती घोटाळ्यानंतर दिलेली आश्वासने आता कुणी मानत नाही. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आता फक्त मागणी करत नाहीत—ते हिशेब मागत आहेत.
आज अमरावती बोलली आहे; उद्या संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल.
#Offline✅
#Online❌
MPSC परीक्षा CBT व नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभर विद्यार्थ्यांचा संताप उसळला आहे. आज वर्ध्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसचा ठाम पाठिंबा आहे. या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदार-आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आणि सभागृहातही सरकारला जाब विचारला. मात्र, सरकारकडून मिळालेली उत्तरे ही संदिग्ध, टाळाटाळ करणारी आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली.
विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सरकारने तात्काळ CBT व नॉर्मलायझेशनचा निर्णय स्थगित करून पारंपरिक OMR पद्धत कायम ठेवावी.
महाराष्ट्र काँग्रेस विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य लढ्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे कटिबद्ध आहे.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar
#MPSC #OMR #JusticeForStudents #Maharashtra
CBT रद्द करा.
Mpsc ने आपल्या मनमानी कारभारखाली आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेतलेला घातक निर्णय लवकरच मागे घ्यावा.
काल अमरावती...आज वर्ध्यात...६ जुलै ला संभाजीनगर ला...१२ जुलै नंतर पुण्यात आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात राजव्यापी आंदोलनाची तयारी आहे.
#MPSC@RRPSpeaks@satejp