MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
मा. देवेंद्रजी,
ऑनलाईन परीक्षा म्हणजे पारदर्शकता नव्हे, तर घोटाळ्यांना निमंत्रण! २०१८-१९ मध्ये UST Global च्या महापरीक्षा पोर्टलमधील गैरव्यवहार महाराष्ट्राने पाहिले. त्यावेळी आपण माहिती तंत्रज्ञान मंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री होता. त्या काळात हजारो उमेदवारांची भरती झाली. या प्रकरणातील दोषींवर नेमकी काय कारवाई झाली? जनतेला उत्तर मिळायला नको का?
पकडली जाते ती फक्त चोरी…
न पकडलेले घोटाळे किती असतील?
म्हाडा, वनविभाग, पोलीस भरती, मृद व जलसंधारण विभाग आणि तलाठी भरती परीक्षांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. यापैकी अनेक परीक्षांचे कंत्राट TCS iON कडे होते. तरीही सरकार ऑनलाइन परीक्षा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करत आहे.
आम्ही तुम्हाला खुल्या चर्चेचे आव्हान देतो. ऑनलाइन परीक्षा पद्धतीतील त्रुटी, सुरक्षेतील उणिवा आणि आमच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे आम्ही तुमच्यासमोर मांडण्यास तयार आहोत.
सोबतचे तक्ते पाहा
• एका परीक्षेत १२ गुण, तर दुसऱ्याच परीक्षेत २०० पैकी २०० गुण!
• एका भरतीत ४६ गुण, तर दुसऱ्याच भरतीत राज्यात अव्वल!
या आकडेवारीमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतात. या फरकांचे स्पष्टीकरण काय? प्रणालीतील त्रुटी आहेत की त्यामागे काही वेगळे कारण आहे?
पोरांना वेड्यात काढू नका!
आमची ठाम मागणी आहे, MPSC आणि सर्व सरकारी भरती परीक्षा Offline (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रयोग थांबवा. पारदर्शक भरती द्या, ऑनलाइन घोटाळे नको!
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@CMOMaharashtra ऑनलाईन परीक्षा म्हणजे पारदर्शकता नव्हे. तांत्रिक बिघाड, सर्व्हर क्रॅश, नॉर्मलायझेशन आणि गैरव्यवहारामुळे उमेदवारांचे नुकसान होते. 2026 नाही तर 2027 मध्येही MPSC परीक्षा ऑफलाईनच व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी प्रयोग नको. @mpsc_office
The biggest industry in India today isn't manufacturing, It's propaganda. Thousands defend every failure, attack every question, and call it patriotism. A strong nation welcomes scrutiny, not blind loyalty.
When propaganda becomes policy and criticism becomes a crime, democracy starts losing its soul. India needs governance, not branding. 🇮🇳 #India#Democracy
@IndianOilcl कम्युनिटी पोस्ट आधी नीट वाचा. सरकारं आणि मंत्रालयं काही वर्षांनी बदलतात, पण तथ्यं बदलत नाहीत. चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करू नका. तुमच्या ग्राहकांना फसवू नका.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
आदरणीय @mpsc_office
CBT व Normalization संदर्भातील स्पष्टीकरण वाचले. मात्र काही मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
1) उमेदवारांना Raw Marks, Normalized Marks, Response Sheet, Answer Key व Final Score उपलब्ध होणार का?
2) CBT पूर्वी Pilot Test/Mock Audit झाला होता का?
(1/3)
@mpsc_office असल्यास त्याचा अहवाल प्रसिद्ध कराल का?
3) प्रश्नपत्रिकांचा Difficulty Level समान राहील याची खात्री कशी करणार?
4) तांत्रिक बिघाड झाल्यास SOP काय असेल?
5) Score Verification व स्वतंत्र Normalization Audit होणार का?
(2/3)
@AbhiPawarBJP २-३ पूर्व परीक्षा आणि फक्त एकच मुख्य परीक्षा? ही कसली "पूर्व परीक्षा पास योजना" आहे का ?
स्पर्धा परीक्षांचा उद्देश गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करणे हा आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेऊन प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व निष्पक्ष करण्याची गरज आहे.
परीक्षा २ वेळा नाही, ४ वेळा घ्या; पण ऑफलाइनच घ्या.
२ ते ३ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. ऑनलाइन परीक्षांमधील गोंधळाचा इतिहास पाहता, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रयोग करणे योग्य नाही.
पारदर्शक आणि सुरळीत परीक्षा प्रक्रियेसाठी ऑफलाइन परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय आहे. #MPSC
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office