📍कराड, सातारा
प्रीतीसंगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस्थळी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी नतमस्तक होत आदरांजली वाहिली.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेला अजितदादा पवार यांनी नेहमीच आपल्या कार्यातून पुढे नेले असून, त्याच परंपरेला अभिवादन करण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी प्रीतीसंगम येथे उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना व विचारांना वंदन केले.
Asia Cup Champions! 🇮🇳
Team India beats South Korea 4-1 to reclaim the Asia Cup after 8 years & books its spot in the Hockey World Cup!
#AsiaCup2025
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी सर्वपरिचित आहेत. नियमाच्या बाहेर जाणारं कोणतंही काम असेल तर आदरणीय दादा अशा कामाला कायम विरोध करतात. दादांचा हा स्वभाव महाराष्ट्रातील प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक नागरिकाला परिचित आहे.
परिविक्षाधीन कालावधीत कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या संदर्भात वायरल झालेला व्हिडिओ हा अर्धवट व दिशाभूल करणारा आहे. आदरणीय दादांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्रातील एकही नागरिक, एकही अधिकारी यावर विश्वास ठेवणार नाही.
@AjitPawarSpeaks@SunilTatkare@iAditiTatkare@mahancpspeaks
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझे मोठे बंधू, राज्याचे माजी मंत्री तथा विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आ.श्री. धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र उत्सव साजरा केला.
@dhananjay_munde
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@AjitPawarSpeaks
खेळांच्या माध्यमातून विविध देशांमध्ये बंध निर्माण करणारे, शारीरिक स्वास्थ्य व जागतिक शांतता यांचा संदेश देणारे माध्यम म्हणजे "ऑलिंपिक" !
२३ जून १८९४ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली होती. त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा करतो. यानिमित्त आपल्या देशातून, राज्यातून अधिकाधिक प्रतिभावाने खेळाडू घडवण्याचा, ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा आपण संकल्प करूया.
#InternationalOlympicDay
महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पावसाचे संकट घोंगावत आहे. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि पक्षाच्या सदस्यांना सूचना करतो आपल्या भागात जिथे नुकसान झाले आहे त्याचा आढावा घ्या आणि प्रशासनाशी समन्वय साधा आणि त्यांना मदत मिळवून द्या. तर काही लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत त्या लोकांचे जीवन पुर्वपदावर आणण्यासाठी सर्व मदत करा अशीदेखील मी सर्वांना सूचना करतो.
"ऑपरेशन सिंदूर"बद्दल जगाला ठणकावून सांगणारी भारताची नारी शक्ती !
भारताने केलेल्या ऐतिहासिक "ऑपरेशन सिंदूर"ची माहिती जगाला ठणकावून सांगण्याचे काम कर्नल सुफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केले. यावेळी या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला अभिमान व आत्मविश्वास भारताच्या नारीशक्तीचे दर्शन घडवणारा होता.
#OperationSindoor
@adgpi@IAF_MCC
माळशिरस तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये तलाठी आँफीस मध्ये खुलेआम सामान्य नागरीकांची लुट सुरू आहे नोंद धरण्यासाठी मनाला वाटले तेवढी रक्कम सामान्य नागरीकांन कडून घेतली जात आहे याबाबत @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde आपण लक्ष घालावे ही विनंती