आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) वतीने पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पर्यावरण आणि हवामान बदल विषयक विविध बाबींचे सादरीकरण करून त्यासंबंधित चर्चा करण्यात आली.
तसेच मंडळाबद्दलाची माहिती व राबविले जाणारे उपक्रम या संदर्भात माहिती दिली.
_____
A presentation introducing the Maharashtra Pollution Control Board (MPCB) and its various initiatives was conducted in the presence of Hon. Minister Smt. Pankaja Munde. The session focused on highlighting the board's role and its efforts toward environmental sustainability.
@Pankajamunde@mpcb_official
उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री श्री. उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@samant_uday
ऐतिहासिक क्षण!
भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश ने 18 व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला आहे. जगज्जेता डिंग लिरेनचा पराभव करून त्याने हा इतिहास घडवला. याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! संपूर्ण देशवासीयांना गुकेशचा अभिमान आहे.
कामाचा माणूस मंत्री झाला!
आज मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल @iYogeshRKadam यांचे खूप खूप अभिनंदन!
मुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. @mieknathshinde साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. @AjitPawarSpeaks यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात एका युवा चेहऱ्याची सार्थ निवड केलेली आहे. मला विश्वास आहे की योगेश कदम हे त्यांच्या पदाला योग्य तो न्याय देतील आणि महाराष्ट्रातील समस्त नागरिकांच्या सेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ शपथविधी पूर्वी शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आज नागपूर येथे स्वागत केले.
यावेळी मा.श्री.दादाजी भुसे, मा.श्री.भरतशेठ गोगावले, मा.श्री. शंभूराज देसाई साहेब, मा.श्री. उदयजी सामंत, मा.श्री. संजयजी शिरसाठ, मा.श्री. संजयजी राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने काल शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक मुंबईतील रामटेक बंगल्यावर संपन्न झाली.
याप्रसंगी शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम, श्री. आनंदराव अडसूळ, महिला नेत्या सौ. मीनाताई कांबळी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्री. नरेश म्हस्के, खासदार श्री. रवींद्र वायकर, खासदार श्री. मिलिंद देवरा, आमदार श्री. दीपक केसरकर, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, शिवसेना प्रवक्ते श्री. संजय निरूपम तसेच शिवसेनेचे सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
On the occasion of National Pollution Control Day, let’s pledge to protect our environment by adopting sustainable practices and reducing pollution for a healthier tomorrow. Together, we have to build a cleaner, greener Maharashtra!
Choose public transport whenever possible—it’s a small step that makes a big impact in reducing air pollution and conserving energy.
#NationalPollutionControlDay #CleanAir #MPCB
To tackle the rising air pollution levels, the Maharashtra Pollution Control Board has issued new guidelines for Ready Mix Concrete Plants in the Mumbai Metropolitan Region. All RMC Plants should be covered with Tin Shed from all sides and strict action will be taken against anyone violating the guidelines. This policy is a major action to curb air pollution.
#MPCB #RMCGuidelines #CombatingAirPollution
दापोली विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या विजयाच्या अनुषंगाने आज मंडणगड येथे भव्य विजयी रॅली काढण्यात आली.
या रॅलीदरम्यान शिवसेना आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अतिशय जल्लोषात विजयाच्या घोषणा दिल्या. तसेच ढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकल्याबद्दल आनंद साजरा केला.
आज महापे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसिबी) कार्यालयात सदिच्छा भेट दिली आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. तसेच या भेटीदरम्यान येथील अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेल्या सेंट्रल लॅबची पाहणी केली.
यावेळी लॅबमध्ये लागणाऱ्या नवनवीन उपकरणांच्या खरेदीबाबत आणि या संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण करून येथील काम अधिकाधिक सुरळीत व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत देखील संवाद साधला.
ना सत्तेची लालसा ना खुर्चीचा मोह..
तुमच्या त्यागाच्या भावनेने आज तुमच्या बद्दल आदर अजुन वाढला...
तुमची काम करण्याची जिद्द, निर्णय क्षमता, त्याग, समर्पण, सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न हे आम्हा युवकांना प्रेरणा देणारे..
माझा नेता, माझा अभिमान...
सदैव खंबीरपणे तुमच्या सोबतच...
@mieknathshinde
#EknathShinde #ShivSena
आज उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. @Dev_Fadnavis साहेब यांची सपत्नीक भेट घेतली आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या भेटी दरम्यान मा. फडणवीस साहेबांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील विजयाबद्दल माझा सत्कार केला आणि अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. @mieknathshinde साहेब यांची भेट घेतली आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
आज म हाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.