पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार!
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे होणार लोकार्पण.
Under the Pradhan Mantri Awas Yojana, the dreams of Shramik (workers) are becoming a reality!
Hon. Prime Minister Shri Narendra Modiji is set to inaugurate the nation's largest housing project!
#solapur #PMModi
@PMOIndia@BJP4India@narendramodi@JPNadda@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@save_atul
राज्यसेवा २०२२ च्या साधारण गुणवत्ता यादीमध्ये अपेक्षित रँक मिळवण्यात यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही सर्वांनी स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची स्वप्नं मोठ्या कष्टानं पूर्ण केली आहेत, आता प्रशिक्षणानंतर अधिकारी म्हणून उत्कृष्ट, प्रामाणिक आणि कार्यक्षम कारभार करून महाराष्ट्रातील गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करा, त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
राज्यसेवा २०२२ ची मूळ जाहिरात १६१ पदांची होती, त्यात वाढ व्हावी यासाठी मी तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी झालो आणि मंत्रालयात पाठपुरावाही केला. त्यामुळे तुम्हा सर्वांसासोबत एक भावनिक नाते निर्माण झालेले असून तुमच्या सर्वांच्या यशाचा मला व्यक्तिगत पातळीवर मनस्वी आनंद झाला आहे. यानिमित्ताने मी मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो, कारण या दोघांनी २ वेळा जागावाढ करण्याची संवेदनशीलता दाखविल्यामुळेच अतिरिक्त ४६२ सामान्य कुटुंबातील लेकरांचे अधिकारी बनण्याचे स्वप्नं पूर्ण झाले आहे.
ज्या उमेदवारांचा निकाल अपेक्षेप्रमाणे आलेला नाही त्यांनीही निराश होऊ नये, राज्यसेवा २०२४ परीक्षेच्या जागवाढीसाठी मी निकराचे प्रयत्न करणार असून तुम्ही अधिक जोमाने अभ्यास करा. यश नक्की मिळेल.
#mpsc #राज्यसेवा