महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – ४००० ३२.
विषय : ७ हजार लिपिक - टंकलेखक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्याबाबत.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@mpsc_office@VarshaEGaikwad
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks@mieknathshinde सरकारला विनंती आहे की लिपिक व टंकलेखक 2023 भरती प्रक्रियेतील निवडलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत.मराठवाड्यातील मुले सुद्धा या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दिलासा द्यावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७००६ लिपिक - टंकलेखक पदांसाठी २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम निवड यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड यादीतील महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हे संभ्रमावस्थेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील काही विद्यार्थी याच संदर्भात येऊन भेटले होते. या विषयासंदर्भात आज विधानपरिषद विरोधी पक्ष नेते मा. अंबादासदादा दानवे यांची भेट घेतली. यावेळी सोबत विद्यार्थीही उपस्थित होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही अंतिम निवड यादी जाहीर होईल असे आयोगाने कळविले आहे. आता पुन्हा पुढची तारीख न मिळता अंतिम निवड यादी जाहीर व्हावी अशा सूचना मा. विरोधी पक्षनेते यांनी संबंधित विभागाला दिल्या!
#FightForRight
#MPSCStudents #लिपिक_टंकलेखक_भर्ती #विद्यार्थ्यांचा_हक्क #Transparency #JusticeForAspirants #ClerkRecruitmentDelay
प्रति,
मा. रजनीश शेठ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर
नवी मुंबई.
विषय: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 – निकालातील अस्वीकार्य विलंबाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत निषेध आणि तात्काळ अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी.
महोदय,
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि 17 डिसेंबर 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा पार पडली. परंतु, आज 06 जून 2025 पर्यंत, म्हणजे पूर्व परीक्षेनंतर 25 महिन्यांहून अधिक आणि मुख्य परीक्षेनंतर 18 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष, मानसिक ताण आणि निराशा निर्माण झाली आहे.
आज 6 जून 2025 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र केवळ औपचारिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात ना ठोस तारीख आहे, ना जबाबदारी स्वीकारली आहे, ना पारदर्शकता दिसते. हे विद्यार्थ्यांच्या भावनांचा अवमान करणारे आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख व्यथा:
1प्रदीर्घ प्रतीक्षा: अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ अद्याप मिळालेले नाही.
2मानसिक अस्थिरता: निश्चित तारीख नसल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांच्या तयारीत लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
3वयोमर्यादेचा अन्याय: विलंबामुळे काही विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका आहे.
4विश्वासघात: सरकार आणि आयोगाची ही ढिलाई विद्यार्थ्यांशी विश्वासघातासारखी आहे.
काँग्रेस पक्षाच्या ठाम मागण्या:
1लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
2या विलंबाची स्पष्ट आणि पारदर्शक कारणे जनतेसमोर मांडावीत.
3या विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
4विद्यार्थ्यांच्या मानसिक आधारासाठी समुपदेशन केंद्रे आणि सहाय्यता यंत्रणा त्वरित सुरू करावीत.
जर 10 दिवसांत अंतिम निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. विद्यार्थ्यांचा संयम आता संपुष्टात येत आहे. सरकारने त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळणे त्वरित थांबवावे.
“तरुणांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!”
“निकाल तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!”
आपला नम्र, धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office@INCHarshsapkal
जाहिरात क्रमांक:- 001/2023 व 111/2023 ,
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023.
लिपिक टंकलेखक संवर्गाच्या निकालाबाबत माननीय आपणच 13 मे 2025 रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला होतात की , प्रस्तुत संवर्गाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल आज या आठवड्यातील शेवटचा दिवस आहे.
तुमच्या प्रसिद्धी पत्रकानुसार तुम्ही आज निकाल लावायला हवा तुमच्या नियमाचे तुम्ही पालन कराल हीच अपेक्षा.
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office@Drsuvarnas
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
मा. रजनीश सेठ
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर, नवी मुंबई.
विषय: लिपिक-टंकलेखक भरती 2023 च्या अंतिम निवड यादी जाहीर करण्याबाबत विनंती
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली लिपिक-टंकलेखक भरती 2023 ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. आयोगानेच जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल, असे जाहीर केले होते. परंतु आजपर्यंत ती यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
या भरती प्रक्रियेसाठी हजारो विद्यार्थी गेली अनेक महिने प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर मानसिक, आर्थिक व सामाजिक तणाव वाढत आहे. भरतीची प्रक्रिया विलंबाने होत असल्यामुळे अनेक उमेदवारांचे पुढील शैक्षणिक, कौटुंबिक व नोकरीसंदर्भातील निर्णय रखडले आहेत.
आपल्याकडे नम्र मागणी आहे की:
1. लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी तात्काळ जाहीर करण्यात यावी.
2. निकाल प्रक्रियेमध्ये आणखी विलंब होणार असल्यास, त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण व निश्चित तारीख जाहीर करण्यात यावी.
3. आयोगाने भविष्यात अशा भरती प्रक्रियांबाबत वेळापत्रकांचे काटेकोर पालन करावे, ही नम्र अपेक्षा आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही बाब गांभीर्याने घेऊन त्वरित निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (रोजगार विभाग) करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
प्रत: मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिती
@mpsc_office@INCHarshsapkal
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 अंतिम यादी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल असे आपल्याकडून जाहीर करण्यात आले होते.
#आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. ओपन च्या #393 जागा ऍड करून आज निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी जाहीर करावी.
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असे आयोगाने जाहीर केले होते. परंतु उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनपर्यंत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
आयोगाला विनंती आहे, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपवावी. निकालासाठी पुन्हा मुदतवाढ देऊ नये, अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा ही विनंती.
@mpsc_office@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AUThackeray@PatilKailasB@RRPSpeaks@Drsuvarnas .
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP