मा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Drsuvarnas@mpsc_office
पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात
माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील
मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदारक करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते.
1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली.
राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली.
सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC
Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी.
2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी?
3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का?
4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले
असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी.
5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही.
6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवार भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD@maha_dma@CMOMaharashtra@VijayWadettiwar@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा असल्याने राज्यसेवा परीक्षेसाठी जागावाढ तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, Dysp यासारख्या पदांचा समावेश करण्यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसोबत सामान्य प्रशासन विभागाचे अवर मुख्य सचिव नितीन गद्रे साहेबांची भेट घेतली. शासनाच्या सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन #MPSC कडे त्वरित पाठपुरावा करण्यासंबंधी त्यांना विनंती केली. जागावाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासित केलं.
तसंच केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने शासकीय पदभरतीच्या जाहिराती काढण्यास तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात मागणीपत्रे देऊन भरती प्रक्रियेला गती देण्याची विनंतीही यावेळी केली.
साहेबांनी 2018 ला सांगितल 72000 मेगाभरती करू, 2022 ला सांगितल 75000 भरती करू. एकही आश्वासन पूर्ण झालं नाही.
आज राज्यात परिस्थीती अशी आहे की प्रत्येक विभागात 40% पदे रिक्त आहेत.
तब्बल 3 लाखापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
साहेब सर्व विभागात जागावाढ करा व प्रशासनात आलेली मरगळ काढा.
प्रिय राज्य सरकार,
आजवर हजारो पदे आपण भरली आहेत. किमान 1.50 लाख पदे आपण भरल्याचे सांगितले. आम्ही तर केवळ त्यापैकी किमान 1% पदे मागत आहोत.
मागील वेळी अचानक वर्णनात्मक पॅटर्न लागू झाला. मात्र आमची मागणी आपण मोठ्या मनाने मान्य केली आणि आम्हाला दोन वर्षे मुदतवाढ दिलीत. त्याबद्दल आपले मानावे तितके आभार कमीच आहेत.
पण त्याच सोबत गेल्या वेळी (2023 ) केवळ 303 च जागा आल्याने मनाचा हिरमोड झाला.
पण मनात कुठेतरी आशा होती की आमच मायबाप सरकार 2024 जास्तीतजास्त जागा काढून आम्हाला अधिक संधी देऊन उत्कर्ष साधण्यास हातभार लावेल. मात्र 205 जागांची जाहिरात पाहून तर अक्षरशः नैराश्य आले. त्यात 35 पैकी चक्क 23 संवर्ग गायब.
मंत्रालयात आमच्या सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधी असताना असा आमच्यावर असा अन्याय का?
कृपया सर्व 35 संवर्गातील 1500 जागांचा समावेश 2024 च्या जाहिरातीमध्ये करून आमच्या वरील अन्याय दूर करावा, ही नम्र विनंती.
अन्यथा यावेळी आंदोलना शिवाय काहीच पर्याय आमच्या हाती नसेल
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
@adgarkal04 महाराष्ट्रासारख्या सशक्त राज्यात केवळ 274 जागांसाठी नागरी सेवा & त्यातही 205 जागांसाठी राज्यसेवा जाहिरात निघते हे विद्यार्थ्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. तातडीने सरकारने यात लक्ष घालून सर्व संवर्ग, उपसंवर्ग यांच्या मिळून 1500+ जागांची राज्यसेवा जाहिरात काढावी #राज्यसेवा_जागावाढ