लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात यासाठी
वर्धा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर नंतर #लातूर येथे विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरले आहेत. आयोगाने लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती @bhimanwar@RRPSpeaks@satejp@mpsc_office
तलाठी भरती परीक्षेला राज्यातील १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही.
तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष, सखोल आणि वेळबद्ध चौकशी झालीच पाहिजे.
TCS कंपनीला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच चौकशीत जे कोणी दोषी आढळतील, ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना संरक्षण नव्हे, तर शिक्षा मिळाली पाहिजे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. आवश्यकता भासल्यास पुढील आंदोलन TCS कंपनीच्या कार्यालयासमोर करण्यात येईल.
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@INCMaharashtra@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@TCS@TCS_iON
#TalathiBharti #JusticeForStudents #MPSC #offlineexam
लातूरमध्ये उद्या होणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या विराट आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा जाहीर पाठिंबा!
MPSC च्या CBT (ऑनलाइन परीक्षा) व Normalization विरोधातील विद्यार्थ्यांचा लढा आता राज्यव्यापी जनआंदोलन बनला आहे.
यवतमाळ, अमरावती, वर्धा, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता लातूरमध्ये उद्या होणारे विराट विद्यार्थी आंदोलन ही विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची बुलंद हाक आहे.
मुंबईतील बेलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे MPSC मुख्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाने आज दुसऱ्या दिवसात प्रवेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर MPSC कडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे.
आमची ठाम मागणी आहे:
✅ MPSC च्या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीने घ्याव्यात.
✅ CBT व Normalization चा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
✅ विद्यार्थी प्रतिनिधींशी तातडीने चर्चा करून न्याय्य तोडगा काढावा.
लातूरमधील उद्याच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. हा लढा केवळ परीक्षा पद्धतीचा नाही, तर लाखो तरुणांच्या भविष्याचा, पारदर्शक भरतीचा आणि न्यायाचा आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@mpsc_office@bhimanwar
#MPSC #OfflineExam #RejectCBT #RejectNormalization #JusticeForStudents #MaharashtraCongress #DhananjayShinde
काही परीक्षा ऑनलाईन काही परीक्षा ऑफलाईन असा जर तुम्ही घाट घातला तर आम्ही ते होऊन देणार नाही. आम्ही मागचे 5 वर्ष्यापासून सरकारकडे पाठवपुरावा करून MPSC मार्फत ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी कशाला एवढे प्रयत्न केले. आणि तुम्ही येता एक कागद काढता आमची मेहनत वाया घालवता.
@bhimanwar
मायबाप सरकार व प्रिय मीडिया
आपण सर्वांनी 'विकसित महाराष्ट्र 2047' चे स्वप्न पाहिले आहे.
पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी #CBT च्या माध्यमातून आपण गतिमान मात्र 'निकृष्ट' प्रशासन तयार करत आहात का?
आमची मागणी: ऑफलाईन परीक्षा, पारदर्शक प्रशासन! @CMOMaharashtra@RRPSpeaks#Mpsc@satejp
गट-क परीक्षा MPSC कडे हस्तांतरित!
विद्यार्थ्यांच्या ३ वर्षांच्या संघर्ष
आता मागणी एकच परीक्षा ऑनलाइन नव्हे, तर ऑफलाइन व पारदर्शक पद्धतीने घ्या!
मागणी मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करू
तुषार देशमुख
अध्यक्ष,युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य
#MPSC
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही, तर त्यांच्या विश्वासावर घाला घालणारा आहे!
CBT म्हणजे पारदर्शकता, असा दावा केला जातो. पण महाराष्ट्रातील भरती प्रक्रियांमधील पेपरफुटी, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवस्था आणि खासगी एजन्सींवरील गंभीर प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. अशा परिस्थितीत CBT लादण्याचा हट्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.
आयोगाने विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध, हजारोंचे आंदोलन आणि सातत्याने मांडल्या जाणाऱ्या न्याय्य मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. संवादाऐवजी निर्णय लादण्याची ही भूमिका निषेधार्ह आणि लोकशाहीविरोधी आहे.
आमची मागणी स्पष्ट आणि ठाम आहे — MPSC च्या सर्व १००% उमेदवारांच्या सर्व पूर्व परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घेण्यात याव्यात. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही तांत्रिक त्रुटी, खासगी एजन्सी किंवा डिजिटल जोखमीच्या भरोशावर सोडता येणार नाही.
विद्यार्थ्यांच्या विश्वासाशिवाय कोणतीही परीक्षा प्रणाली यशस्वी होऊ शकत नाही. हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचा लोकशाही मार्गाने होणारा संघर्ष अधिक तीव्र होईल.
“विद्यार्थ्यांचा आवाज दाबून निर्णय चालत नाहीत; न्याय देऊनच विश्वास मिळतो!”
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar@mpsc_office
#MPSC #CBT #OfflineExams #OMR #JusticeForAspirants
MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर येथे सुरु असलेल्या “MPSC च्या परीक्षा ऑफलाईन व्हाव्यात” या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस.
आंदोलन स्थळावरून लाईव्ह!
मा. लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात यासाठी वर्धा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर नंतर लातूर येथे विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरले आहेत. आयोगाने आता तरी झोपेतून जागे होऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती @bhimanwar
ही फक्त गर्दी नाही ह्या आहेत विद्यार्थ्यांच्या भावना
लातूर येथे MPSC ऑनलाईन वर्गात झालेल्या भव्य आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
विद्यार्थ्यांचा रोष सरकारने गर्दीवरून समजून घ्यावा. हे तर लातूर आहे पुणे व संपूर्ण महाराष्ट्र अजून बाकी आहे
https://t.co/GH9u0bFTPu
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनाद्वारे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि तांत्रिक अडचणींमुळे होणारा विद्यार्थ्यांचा त्रास टाळण्यासाठी ऑफलाइन परीक्षा हा अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या आंदोलनात धम्मगुरु भदंत राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोधर, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, तालुका महासचिव बाळू मोरे, तालुका सचिव बंडू इंगळे, शहराध्यक्ष आकाश सरदार, प्रशिक उमाळे, माजी शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे, शाश्वत अकॅडमीचे संस्थापक सागर वाकोडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे, गौतम सुरवाडे, रामेश्वर तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
#MPSC #MPSCExam #OfflineExam #OfflineMPSC #CompetitiveExams #StudentsFirst #Education #StudentRights #EqualOpportunity #ExamReforms #Maharashtra #MaharashtraNews #Khamgaon #Buldhana #VanchitBahujanAghadi
MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर : विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशी!
MPSC परीक्षा CBT (Computer-Based Test) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी MPSC मुख्यालय, CBD बेलापूर येथे सलग तिसऱ्या दिवशी शांततापूर्ण धरणे आंदोलन करत आहेत.
तीन दिवस उलटूनही MPSC प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक संवाद साधलेला नाही. विद्यार्थ्यांच्या भावना, शंका आणि भविष्यासंदर्भातील गंभीर चिंतांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. ही भूमिका अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे.
आज लातूरमध्येही हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला सक्रिय पाठिंबा देत असून, त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील.
आजच्या आंदोलनात MPSC प्रशासनाच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्ते काळ्या फिती बांधून आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आंदोलन करणार आहेत.
दुर्दैवाने, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाची जागा रिकामी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवाद साधण्याऐवजी आंदोलनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न लोकशाहीला शोभणारा नाही. सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करावी.
महाराष्ट्रातील सर्व MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आमचे आवाहन आहे—
🖤 आज आपल्या WhatsApp Status वर काळा रंग (Black Status) ठेवा किंवा काळ्या पार्श्वभूमीवर “MPSC परीक्षा ऑफलाइन घ्या”, #OfflineMPSC, #JusticeForMPSCAspirants हा संदेश पोस्ट करून या न्याय्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शवा.
हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही; हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, पारदर्शकतेचा आणि परीक्षेवरील विश्वासाचा प्रश्न आहे.
चला, लोकशाही मार्गाने एकजुटीने विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवूया.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यास काँग्रेसचा ठाम पाठिंबा आहे. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील!
जय महाराष्ट्र!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@satejp@VijayWadettiwar@DGPMaharashtra@bhimanwar@MahaChiefSec
#OfflineMPSC #JusticeForMPSCAspirants #MPSC #StudentsFirst #Maharashtra
'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (#MPSC) परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईन हवी' या मुख्य मागणीसाठी लातुरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे.
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादली जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लातुरसह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ऑफलाइन परीक्षेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
.
.
#OfflineExam #Latur #maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@LaturDm@INCMaharashtra
🚨 आज दुपारी २:०० वाजता X (Twitter) Live 🚨
📍 MPSC मुख्यालय, बेलापूर आंदोलनस्थळावरून थेट
मुख्य विषय:
✅ MPSC परीक्षा ऑफलाईनच का झाल्या पाहिजेत?
✅ तलाठी भरती परीक्षा घोटाळा आणि TCS ची भूमिका
✅ लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ
✅ पुढील आंदोलनाची दिशा
तलाठी भरती घोटाळ्याबाबत समोर आलेल्या गंभीर बाबी, MPSC परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आणि न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आज आंदोलनस्थळावरून थेट संवाद साधणार आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने या Live मध्ये सहभागी व्हावे.
🕑 आज दुपारी २:०० वाजता
📍 X (Twitter) Live
🔗 @Dhananjay4INC
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा लढा आहे. आपल्या प्रश्नांसह नक्की सहभागी व्हा!
@INCMaharashtra@Mpsc_Andolan@degree_holders@aspirantspeaks1@VastavKatta@MPSCstudsRight@PunyachiMPSC@Yesjassociation
#MPSCExamOffline #TalathiBharti #TCS #JusticeForStudents