माझ्या लाडक्या 'डिस्क्रिप्टिव्ह' क्लासेसवाल्यांनो आणि EX-UPSC उमेदवारांनो...
९९ टक्के विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचीच मागणी करत आहेत! तरीही तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी त्याला विरोध करत असाल, तर तुम्ही फार मोठं पाप करत आहात. आम्हाला 'ऑब्जेक्टिव्ह' पॅटर्न पारदर्शकतेसाठी आणि सर्वांना समान संधी (Level Playing Field) मिळण्यासाठी हवा आहे.
बाकी तुम्हाला वाटतं ना, की फक्त या डिस्क्रिप्टिव्हवाल्यांच्याच खिशात 'ॲनालिटिकल ॲबिलिटी' नावाची कोणतीतरी दैवी शक्ती असते? तर जरा काळजी करणं थांबवा! निवड झाल्यानंतर जेव्हा 'यशदा' (YASHADA) मध्ये दोन वर्षांचं ट्रेनिंग होतं, तिथे (M.A. in Development Administration) 'मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन'ची ४ सेमिस्टरची पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाच घेतली जाते. इतकंच काय, महाराष्ट्र पोलीस अकादमीत (MPA) DySP अधिकाऱ्यांना लॉ, फॉरेन्सिक सायन्स, बेअर ॲक्ट्स आणि सायबर सिक्युरिटी हे सगळे विषय ६०% पेक्षा जास्त गुण पाडून डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच पास करावे लागतात!
त्यामुळे ती 'ॲनालिटिकल ॲबिलिटी' नावाची ताकद दोन वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये आमच्याही खिशात आपोआप येऊन जाईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका! एमपीएससी राज्यसेवा ही निवड प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी ती आता 'ऑब्जेक्टिव्ह'च झाली पाहिजे, हेच आज ९९ टक्के विद्यार्थ्यांचं स्पष्ट मत आहे!
@GaneshgSpeaks@Nikhil_A_Patil@BaliramDoleyINC
आम्हाला कोणालाही मनाला वाटेल तसे मार्क देणाराpatternनकोच आहे अशा अन्यायकारक पॅटर्न पेक्षा आमच्या एकाप्रश्नाला fix 2किंवा- 0.5सगळ्याना सरसकट देणारा आणि खरा न्याय करणारा,आमच्या हक्काचा आमच्या काळजाचा विषय म्हणजे आमच पहिलं प्रेम म्हणजे आमचा Objective patternओ, तो आम्हाला परत द्या 😍
असे तर नाही न मॅडम 19-20 च्या age चे मुले ज्या class ला लाखाच्या आसपास फीज भरून UPSC ची foundation बॅच करत आहेत. त्यांना , तुम्ही जर upsc मध्ये नाहीच पास झालात तर तुम्हाला दूसरा बॅकअप नको का ? असे सांगून क्लास वालेच त्यांना घेऊन आले होते.😅
त्यामुळे तुम्ही official voting घ्या💯
दळवी समिती आल्यापासून MPSC मध्ये घोटाळे सुरू झाले..ह्या समितीचे पुण्यात स्वागत सोहळे अभिनंदन सोहळे खाजगी क्लासवाल्यांनी केले...
काँग्रेस सरकार असो वा भाजप.सरकार आम्हाला काय घेण देणं नाही. ज्यांनी घाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे. दळवी समितीची पण चौकशी झाली पाहिजे. 🙏
मुंबई मध्ये आलेले एकूणcandidatesआणिDescriptive मागणी वाले70%candidateजे पण होते त्यांनी आता पर्यंत कितीmpsc examदिल्या आहेत मॅडम .असा हवेत गोळीबार करण्या पेक्षाofficially mpscच्याloginमधेvotingघ्या किंवा official telegram channelवरvoting घ्या, हऊन जाउद्या दूध का दूध पानी का पानी
आदरणीय मुख्यमंत्री महोदय
श्री देवेंद्रजी फडणवीस,
२०१२ च्या पूर्वी महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील मुलगा MPSC च्या राज्यसेवा परीक्षेचे नाव घ्यायलाही घाबरायचा. इतर राज्यात मुले आयएएस, उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहायची, पण आपल्याकडे परिस्थिती इतकी वाईट होती की मुले फक्त PSI किंवा STI सारख्या क्लास-२ च्या पदांपर्यंतच विचार करायची. मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) असायची, पेपर तपासायला आणि निकाल लागायला तब्बल २ ते ३ वर्षे निघून जायचे. तरुणांचे आयुष्य आणि स्वप्ने या अनिश्चिततेच्या अंधारात करपून जायची.
पण २०१२ मध्ये ग्रामीण विकास विभागाचे सचिव आदरणीय सुधीर ठाकरे सर यांची MPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे चित्रच बदलून गेले. त्यांनी परिस्थितीचा सखोल अभ्यास करून एक अत्यंत परिपूर्ण आणि ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) पॅटर्न आणला. त्यात इतिहास, भूगोल, मानव संसाधन, कृषी, माहिती तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा इतका सुरेख समावेश होता की, महाराष्ट्रातील तरुणांना राज्यसेवेची भुरळ पडली.
२०१२ ते २०२४ या काळात या पॅटर्नने चमत्कार घडवला. कोणत्याही महागड्या क्लासेसशिवाय, खेड्यापाड्यातील मुलांनी फक्त स्वतः अभ्यास (Self-study) करून उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) आणि DYSP सारखी पदे मिळवली. एक वर्षाच्या आत संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पडायची. कधीही गोंधळ नाही, कसलाही अडथळा नाही. या पॅटर्नमधून घडलेले अधिकारी आज राज्यभरात उत्तम काम करत आहेत; कित्येक DYSP तरुणांना देशपातळीवरचे मानाचे 'राष्ट्रपती पदक' सुद्धा मिळाले आहे. MPSC च्या इतिहासात सुधीर ठाकरे सरांचे नाव विद्यार्थ्यांनी आज सुवर्णअक्षरांनी कोरून ठेवले आहे.
पण २०२५ मध्ये आयोगाने अचानक हा सुंदर पॅटर्न बदलला आणि वर्णनात्मक (Descriptive) पद्धत लादली. स्वतःचा वेगळा विचार न करता, २०१३ चा UPSC चा जुनाच पॅटर्न जसाच्या तसा कॉपी-पेस्ट केला गेला. यामुळे लाखो विद्यार्थी प्रचंड नैराश्यात गेले.
हा नवीन पॅटर्न आल्यावर २०२५ ची मुख्य परीक्षा २०२६ मध्ये झाली. आणि सप्टेंबर २०२६ मध्ये जेव्हा निकाल आला, तर विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली! पेपर तपासणीत एवढे भयानक घोळ झाले की, हुशार आणि रात्रंदिवस एक करणाऱ्या विद्यार्थ्यांना २५० पैकी २ किंवा ३ गुण देण्यात आले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, आयोगाने मुलाखतीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी रद्द करून पुन्हा पेपर फेरतपासणीचे नोटिफिकेशन काढले. वर्णनात्मक पॅटर्न हाताळणे आयोगाला जमत नाही म्हणूनच त्यांनी जून २०२६ मध्ये अचानक दोन पेपर्सचा 'Optional Subject' (पर्यायी विषय) रद्द केला.
२०१२ ते २०२४ या १२ वर्षांत कधीही असा गोंधळ किंवा अनागोंदी झाली नव्हती. आज या सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे महाराष्ट्रातील ९९ टक्के विद्यार्थी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. जे १ टक्का लोक या बदलाला पाठिंबा देत आहेत, ते फक्त व्यावसायिक क्लासेसवाले आणि UPSC चे सर्व अटेम्प्ट संपलेले माजी विद्यार्थी आहेत.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी,
कृपया यात लक्ष घाला आणि तोच जुना, पारदर्शक आणि यशस्वी 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा आना.
MPSC च्या इतिहासात सुधीर ठाकरे सरांसोबत तुमचेही नाव सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Nikhil_A_Patil@GaneshgSpeaks@MeshramDayanand
आपली पोरं शेवटपर्यंत Objective साठी लढणार
अजून थोडंसं काम होईपर्यंत मागणी लावून धरा 👍
मा. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की,
V . राधा समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल
@CMOMaharashtra@MahaDGIPR
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच वस्तुनिष्ठ (Bahuparyayi / MCQ) स्वरूपाची व्हावी, ही महाराष्ट्रातील तमाम MPSC विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे. २०१२ ते २०२४ या काळात राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने सुरळीत पार पडली आणि त्यात कोणतीही अडचण आली नव्हती. मात्र, २०२५ पासून ही परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्यात आली. या नव्या पद्धतीमुळे पहिल्याच मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५० टक्के विद्यार्थीच मुख्य परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहिले. जर निम्म्याहून अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत असतील, तर शासन ही परीक्षा नक्की कोणासाठी आणि का घेत आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
तसेच, २०२५ च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही तो रद्द करून उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. यामुळे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि मानसिक आरोग्य विचारात घेता, २०२७ पासून MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्ववत वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीनेच आयोजित करण्यात यावी, ही महाराष्ट्रातील सर्व परीक्षार्थींची आग्रही आणि आदरपूर्वक विनंती आहे.@CMOMaharashtra@Nikhil_A_Patil@Dev_Fadnavis