आदरणीय देवेंद्रजी,
पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची शेवटची संधी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे हुकत आहे.
संयुक्त गट ब ची जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा आल्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे नुकसान झालेले आहे.
आपण ज्याप्रमाणे इतर परीक्षे��ाठी वय सवलत देऊन विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुन दिलेली होती, त्याच धर्तीवर आता PSI पदासाठी 1 वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्याचे आदेश देऊन आपणच या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा🙏
प्रिय देवेन जी, ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरांची असंख्य पोरं पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्याकडं एक आशेचा किरण म्हणून पाहताहेत. आपल्या हा निर्णय नक्कीच मान्य कराल ही मनोमन प्रार्थना करत आहेत. सर्वांना न���याय देण्याची आपली भूमिका नक्कीच या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवेल ही खात्री मला आहे , आपण नक्कीच संधी उपलब्ध करून द्याल याची वाट पाहत आहे.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
कायम कृतीतून उत्तर दिले जाईल..!
विद्यार्थ्यांनी केलेल्या जागावाढीच्या मागणीसाठी मी सातत्याने माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच��याकडे पाठपुरावा करत आहेच. विद्यार्थ्यांना दिलेला शब्द सरकार पूर्ण करत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालानुसार तातडीच्या मुद्द्यांवर लवकरच निर्णय घेतले जाणार आहेत. गट-क परीक्षेतील जागावाढीची मागणी आम्ही विद्यार्थी-शिक्षक शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द आज पूर्ण होताने दिसत आहे.
उर्��रित मागण्या, विशेषतः राज्यसेवा परीक्षेचा Objective पॅटर्न आणि इतर विद्यार्थीहिताच्या विषयांवरही सकारात्मक निर्णय होतील, असा मला विश्वास आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील.
इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबवली जात असताना परीक्षा केंद्रांची संख्याही साहजिकच वाढणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरासोबतच काही ठिकाणी तालुकास्तरावरही परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्याची आवश्यकत�� निर्माण हो�� शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक परीक्षा केंद्र सुरक्षित, सुव्यवस्थित आणि गैरप्रकारांना आळा घालणारे असावे, यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावावी, अशी विनंतीही मी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
यासोबतच, गट-क परीक्षेची पूर्व परीक्षा देखील पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
वि��्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, हीच आमची ठाम भूमिका आहे.
तुमचाच,
निखिल पाटील
@Dev_Fadnavis @mpsc_office
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, या प्रकरणात कोणतेही राजकीय गणित न मांडता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सखोल चौकशीची भूमिका घेतली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे.
याच भूमिकेतून विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ दोन वेळा मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी, परीक्षेचा पॅटर्न, कॉमर्स कॅडरबाबतच्या शंका-अडचणी यांसोबतच आगामी ३ जानेवारीच्या परीक्षेत इंजिनिअरिंग व इतर तांत्रिक संवर्गातील तसेच नर्सिंग सह पदांचा समावेश व्हावा आणि किमान १२ हजारांहून अधिक पदांची जाहिरात यावी, ही आग्रही मागणीही मांडली.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात पदभरतीचा मार्ग मोकळा होईल,असा विश्वास मला देवेन जींवर आहेच पण त्यासोबतच आयोगाची जबाबदारी देखील परीक्षा पारदर्शक आणि वेळेवरच होण्यासाठीची असावी अशी मागणी देखील देवेनजींकडे केली आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलनात, सोशल मीडियात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, तुमच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू..! काळजी नसावी.
तुमचाच,
निखिल पाटील
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra
माझे मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत संभाजीनगर येथे आयोजित ‘प्रौढ-प्रताप-पुरंद��’ या भव्य महानाट्याच्या शिवसोहळ्यास उपस्थित राहिलो.
देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या संयोजनातून आणि राजेंद्र साबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला लाखो शिवभक्तांची उपस्थिती लाभली. छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर घडवणारा हा सोहळा अनुभवण्याची संधी मिळाली.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी १,००० पाण्याच्या टाक्यांचे, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी संत-महंत, मंत्रीमहोदय, आमदार, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित ह��ते.
@Dev_Fadnavis
@sable_rajendra
काल पुन्हा एक��ा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी राज्यव्यापी शिष्टमंडळाच्या माध्यमातून ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतानाच विद्यार्थ्यांच्या नव्याने समोर येणाऱ्या अडचणी आणि प्रश्नही साहेबांसमोर मांडले. यामध्ये Descriptive, Objective आणि Hybrid या तिन्ही परीक्षा पद्धतींचे पर्याय, तसेच Commerce Cadre आणि Engineering Cadre मधील प्रश्नांवरही चर्चा झाली.
या भेटीदरम्यान एक गोष्ट विशेष भावली. साहेबांनी स्वतःहून हाक मारत विचारलं, "ये निखिल, काय म्हणतोस? काय समस्या घेऊन आला आहेस?" मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आस्थेने विचारपूस करणं, ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. आगामी काळात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्���ी केंद्रस्थानी ठेवूनच शासन निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी दिला.
माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण वर्षानुवर्षे मेहनत घेत आहेत. घरच्या परिस्थिती��ी संघर्ष करत, अनेक अपयश पचवत केवळ एका संधीच्या आशेने अभ्यास करत आहेत. तुमच्या या मेहनतीची आणि स्वप्नांची जाणीव ठेवूनच मी सातत्याने तुमचे प्रश्न शासनदरबारी मांडत आलो आहे. तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणं असो किंवा त्यावर निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करणं असो, मी तुमच्यासोबत होतो, आहे आणि राहणार आहे.
माझ्याबद्दल वेगवेगळे फेक नॅरेटिव्ह पसरवून संभ्रम निर्माण करण्याच�� आणि प्रत्यक्ष कामापेक्षा श्रेय घेण्याचे प्रयत्न होत आहेत. पण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सुज्ञ आहेत. कोण प्रत्यक्ष मैदानात उतरून लढतंय आणि कोण केवळ श्रेयासाठी पुढे येतंय, हे त्यांना चांगलंच कळतं. त्यामुळे अशा प्रयत्नांना विद्यार्थी कधीही थारा देणार नाहीत, हा माझा विश्वास आहे.
मला कोणत्याही कामाचं वैयक्तिक श्रेय नको; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि त्यांच्या ���युष्यात सकारात्मक बदल घडावा, एवढीच अपेक्षा आहे.
तुमचा विश्वास हीच माझी ताकद आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा हीच माझी जबाबदारी आहे.!
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mpsc_office
एमपीएससीच्या सुज्ञ विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासापास��न तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका..!
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळीत काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. इतर प्रश्नांपेक्षा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना अधिक संवेदनशीलता आणि जबाबदारीची गरज असते. कारण आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्याचा एक मिनिटही वाया जाता कामा नये ; म्हणूनच विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलन, मोर्चे आणि राजकीय संघर्षात गुंतवण्यापेक्षा सरकारशी समन्वय साधून त्यांच्या प्रश्नां��र मार्ग काढणे, हीच खरी विद्यार्थी चळवळ आहे,असे मला वाटतं.
आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असताना, काही राजकीय मंडळी विविध दावे, फेक नॅरेटिव्ह आणि आमिषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणी शिष्टमंडळाच्या नावाने चर्चा घडवून आणण्याचे दावे करेल, कुणी मोठमोठी आश्वासने देईल, तर कुणी जेवणाव��ींची आमंत्रणे देईल. पण विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांमध्ये तुमचा अभ्यास मात्र बाजूला पडता कामा नये.!
मला मुख्यमंत्री साहेबांचा प्रतिनिधी किंवा त्यांचा ‘चेला’ म्हणून टीका केली जाते. पण मुख्यमंत्र्यांसोबत बसून राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणे आणि त्यातून निर्णयाच्या दिशेने मार्ग काढणे, हे गावच्या पारावर गप्पा मारण्याइतके सोपे नसते. त्यासाठी अभ्यास, सातत्य, विश���वास आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते.
मी स्पष्टपणे सांगतो, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मूलभूत सुधारणा झाल्या पाहिजेत, परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम झाली पाहिजे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक दरात आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे सकारात्मक पाठबळ लाभत आहे, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.
३ जानेवारीच्या परीक्षेबाबत असो, गट-कच्या जागावाढीचा प्रश्न असो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बद्दलचे किंवा इतर परीक्षा व भरती प्रक्रियेतील अडचणी असोत; प्रत्येक प्रश्नावर अधिकृत निर्णय आणि ठोस कार्यवाहीला महत्त्व द्या. केवळ राजकीय विधानांवरून निष्कर्ष काढू नका.
माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे; राजकारणाचे विश्लेषण जरूर करा, पण अभ्यासापासून तसूभरही विचलित होऊ नका.!
पुढील वर्षभरात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ठोस आणि दूरगामी सुधारणा घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सकारात्मक प्रयत्न करतील, हा माझा विश्वास आहे. विद्यार्थ्यांचे हित हाच आपल्या प्रत्येक प्रयत्नांचा केंद्रबिंदू असला पाहिजे.
तुमचा संघर्ष अभ्यासासाठी असू द्या, तुमची ऊर्जा ध्येयासाठी असू द्या आणि तुमचे यश तुमच्या मेहनतीच्या जोरावर मिळू द्या.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mpsc_office
#MPSC #MPSCUpdates #JusticeForStudents
आजच्या बातमीने तथाकथित विद्यार्थ्यांच्या राजकीय नेत्याच्या आरोपांना चोख उत्तर मिळालंय..!
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात SIT स्थापन झाली, तपास सुरू झाला आणि आता कारवाईही समोर येतेय. मग शासनाच्या भूमिकेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी आता तरी आत्मपरीक्षण करावं!
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कुठल्याही चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालत नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. दोषींवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच सरकारची भूमिका आहे.
ज्यांच्या सत्ताकाळात आरोग्य भरती घोटाळा, TET परीक्षा घोटाळा असे गंभीर प्रश्न समोर आले, त्यांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्यापेक्षा आधी स्वतःच्या कारभाराचं आत्मपरीक्षण करावं. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेण्याची धडपड करण्यापेक्षा जबाबदारी पार पाडण्यावर भर द्यावा.
सरकारला पारदर्शक कारभार करायचा असेल, तर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक निर्णया��र राजकारण करायचं, स्वतःच किती शहाणे आहोत हे दाखवायचं आणि प्रत्यक्ष कामापेक्षा प्रसिद्धीवर भर द्यायचा, हा बालिशपणा आता थांबवा..!
आरोप करणं सोपं असतं; पण जबाबदारीने वागून प्रत्यक्ष काम करणं महत्त्वाचं असतं.
आजची ही बातमी म्हणजे निराधार आरोप करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चपराक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची पाठराखण नाही, तर दोषींवर कठोर कारवाई आणि व��द्यार्थ्यांना न्याय; हीच आमची भूमिका!
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
#MPSCUpdates #JusticeForStudents #देवेंद्रजीफडणवीस
MPSC च्या भोंगळ कारभारावर मु���्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित..!
आयोगाच्या जुन्या कागदपत्रांच्या विल्हेवाटीचा विषय काल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या तात्काळ निदर्शनास आणून दिला. यावेळी त्यांनीही आयोगाच्या या कारभाराबाबत चिंता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
मुळात, चौकशीच्या पार्श्वभूमीवर जुन्या कागदपत्रांच्या विल्हेवाटीचा निर्णय घेतलाच का गेला? GR मागे घेतला म्हणजे जब���बदारी संपत नाही. या ��िर्णयामागील कारणं स्पष्ट झाली पाहिजेत आणि संबंधित कागदपत्रे सुरक्षित राहिली पाहिजेत.
MPSC हा अधिकाऱ्यांचा कारभार नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला विषय आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे; आता गरज आहे ठोस कार्यवाहीची आणि जबाबदारी निश्चित करण्याची.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे तर तो न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील..!
- निखिल पाटील
#MPSC #विद्��ार्थीहित #देवेंद्रफडणवीस
नक्कीच! विद्यार्थ्यांच्या हिताचा जो कोणताही निर्णय असेल, त्याबाबत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब नेहमीच सकारात्मक आहेत.
पण पुन्हा एकदा तुम्हा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, आंदोलनापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आधारित एक व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या दरबारात पोटतिडकीने मांडणे, शासन आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून त्यावर सकारात्मक मार्ग काढणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे, हेच मी माझे कर्तव्य समजतो.
यापुढेही विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हेच कर्तव्य पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध असेल, हा विश्वास तुम्हा सर्वांना देतो!
@Dev_Fadnavis
निखिल पाटील सर, आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. आमच्यासाठी तुम्ही ९९ टक्के विद्यार्थ्यांची मागणी असलेला OBJECTIVE (MCQ) पॅटर्न पुन्हा आणा आणि या दुष्काळासारख्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधून आमची सुटका करा. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी वर्ग तुम्हाला कधीच विसरणा�� नाही.
@Nikhil_A_Patil @yogsara @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @GaneshBidkarBJP
नमस्कार विद्यार्थ्यांचे 'स्वयंघोषित नेते' रोहित पवार..!
पवार घराणं अनेक वर्षं सत्तेत राहिलंय, त्यामुळे अध्यक्षांचा राजीनामा मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला घेता येतो की नाही, ��े तुम्हाला चांगलंच माहीत होतं. तरीही, फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही ११ दिवस निष्पाप विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसवून त्यांचा विश्वासघात केला!
विद्यार्थ्यांच्या खऱ्या आणि ज्वलंत मागण्या मांडण्याऐवजी तुम्ही फक्त राजकीय स्टंटबाजी केली. तुमच्याआधी गेलेल्या शिक्षक शिष्टमंडळाला आणि विद्यार्थीना तुम्ही खूप नावे ठेवली, पण किमान त्यांनी विद्यार्थ्यांचा असा वापर कधीच केल�� नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि आधीच्या शिष्टमंडळाने आधीच मार्गी लावलेल्या घोषणांचे श्रेय स्वतःकडे ओढून घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणजे निव्वळ राजकीय ढोंग आहे!
सत्तेसाठी विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचे तुमचे हे राजकारण आता महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलंच समजलंय. विद्यार्थ्यांच्या पाठीत असा खंजीर खुपसून किती दिवस राजकारण करणार.?
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@TV9Marathi @abpmajhatv
@zee24taasnews @saamTVnews
@News18_marathi
@SakalMediaNews @LoksattaLive
@lokmat @mataonline
@aajtak @mumbaitak
@pudharionline @LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii @RRPSpeaks
धूळफेक करणारा रोहित पवार१
आज 10 ऑक्टोबर आहे.. 11 वाजलेत दिनांक 11 येण्यास फक्त 1 तास शिल्लक आहे. आधी 24 सप्टेंबरला मफलर वाला कोण? हे सांगणार होते, 24 सप्टेंबरला म्हणाले 10 ऑक्टोबरला मफलर वाला कोण? हे सांगणार होते.
हा व्यक्ती चुलत्याच्या अपघाताचा एवढा भांडवल करत, अजितदादा पवार यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या ��्रयत्न केला. दादांच्या चिंतेची राख देखील थंड झाली नव्हती तेंव्हा हा " इतिहास साक्षी आहे, काकाच्या नंतर पुतण्या असतो" अश्या प्रकारचा प्रचार करत होता फॅन पेज वरून..
त्यामुळे रोहित पवारच हा धंदा आहे जनतेला मूर्खात काढून आपली राजकीय पोळी भाजुन घेण्याचा...
आता सुद्धा सेम पिचवर रोहित पवार खेळत आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने वि���्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.. पण, त्याला त्याच श्रेय घेता आला नाही म्हणून बाहेरून कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
परत सांगतोय.. MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या असताना रोहित पवार आंदोलन करतोय. MPSC अध्यक्षाचा राजीनामा जोपर्यंत चौकशी होऊन पूर्ण होत नाही, तोपर्यंत राष्ट्रपती राजीनामा घेऊ शकत नाही. ही कायदेशीर घटनात्मक प्रक्रिया पूर्ण न होऊ देताच राजीनामा मागत आहे.
MPSC विद्यार्थ्यांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न करू नका रोहित पवार..
#WATCH | Maharashtra: Last rites of veteran actor Nana Patekar performed with state honours at his native village, Donje village in Pune Rural. He passed away in Goa today.
रोहित पवार, राजकारण करा; पण हातात घेतलेलं संविधान तरी वाचा..!
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत माध्यमांसमोर मोठमोठे दावे करण्याआधी भारतीय संविधानाचं अनुच्छेद 316(2)(a), 317 एकदा वाचून घ्या.
संविधान अगदी स्पष्ट आहे;राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्याने राजीनामा द्यायचा असेल, तर तो राजीनामा राज्यपालांना उद्देशून लेखी स्वरूपात द्यावा लागतो.
म्हणजेच,हा संविधानाने सांगितलेला मार्ग आहे.
मुख्यमंत���र्यांकडे राजीनामा देणे ही संविधानात सांगितलेली प्रक्रिया नाही.आणि राजीनामा देणे आणि पदावरून हटवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हेही समजून घ्या.
अनुच्छेद 317 नुसार, अध्यक्षाला पदावरून हटवण्याची बाब आली तर ती राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री यांच्या हातात नाही. संबंधित घटनात्मक प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींची भूमिका येते आणि गैरवर्तनाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची चौकशी आवश्यक असते.
म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना संविधानाच्या कलमांचा अभ्यास करून बोला.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ��ंबंधित विषय आहे; इथे राजकीय स्टंटपेक्षा संविधान महत्त्वाचं आहे..!
रोहित पवार,
MPSC वर राजकारण करण्यापेक्षा आधी MPSC अध्यक्षांचा राजीनामा नेमका कुठे आणि कोणाला द्यायचा, एवढं तरी संविधानातून शिकून घ्या..!
चुकीची माहिती देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका.
विद्यार्थी आता फक्त घोषणा ऐकणार नाहीत; संविधानही वाचणार आहेत.
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@mpsc_office
#MPSC #MPSCStudents #Article316 #Article317 #विद्यार्थ्यांचाप्रश्न
“पुणं बंद पडलं पाहिजे!”…
“कुठं जायचंय ते रोहित सर सांगतील!” - दीपके
एक म्हणतो, “उद्या हातात बंदुका घेऊ…”
दुसरा म्हणतो, “पुणं बंद पाडा.!”
मग सवाल एवढाच,रोहित पवार विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडतायत की आंदोलनाच्या नावाखाली अराजकतेची भाषा करणारी टोळी उभी करतायत का.?
समोर बसलेले व���द्यार्थी हे उद्याचे अधिकारी आहेत. त्यांना भडकावून, त्यांच्या भविष्याशी खेळून कुणाचं राजकारण साध्य होणार नाही. हा डाव भविष्यातील अधिकारीच हाणून पाडतील.!
विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकारशी चर्चा करा, तथ्य मांडून लढा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरा.
पण “पुणं बंद”, “��ंदुका” अशा धमकीच्या भाषेतून विद्यार्थी चळवळ चालत नाही.
हे नेमकं विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय स्टंट?
विद्यार्थी हितासाठी काम कसं करायचं,
हे खऱ्या विद्यार्थी चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांना चांगलंच माहीत आहे.!
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
मा. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब हे कायम विद्यार्थ्यांसोबत आहेत. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
पण राजकीय लोकांनी विद्यार्थ्यांना राजकीय मागण्यात अडकवून ठेऊ नये.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra