MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच वस्तुनिष्ठ (Bahuparyayi / MCQ) स्वरूपाची व्हावी, ही महाराष्ट्रातील तमाम MPSC विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे. २०१२ ते २०२४ या काळात राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने सुरळीत पार पडली आणि त्यात कोणतीही अडचण आली नव्हती. मात्र, २०२५ पासून ही परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्यात आली. या नव्या पद्धतीमुळे पहिल्याच मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५० टक्के विद्यार्थीच मुख्य परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहिले. जर निम्म्याहून अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत असतील, तर शासन ही परीक्षा नक्की कोणासाठी आणि का घेत आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
तसेच, २०२५ च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही तो रद्द करून उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. यामुळे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि मानसिक आरोग्य विचारात घेता, २०२७ पासून MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्ववत वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीनेच आयोजित करण्यात यावी, ही महाराष्ट्रातील सर्व परीक्षार्थींची आग्रही आणि आदरपूर्वक विनंती आहे.@CMOMaharashtra @Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis
राज्यात विविध भागात झालेला पाऊस, पूरस्थिती आणि येत्या 2-3 दिवसांत आणखी पावसाचा हवामान खात्याचा इशारा पाहता, येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे एक पत्र राज्य सरकारने एमपीएससीला पाठविले आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे. राज्यातील विविध भागातील परीक्षार्थींनी अशाप्रकारची मागणी आमच्याकडे केली होती.
#MPSC #Maharashtra
अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. तसेच हवामान विभागातर्फे पुढील काही दिवसात विदर्भातदेखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याने शेतकरी, सामान्य नागरिक आणि हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. येत्या 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होत असून पूरपरिस्थिती आणि रेड अलर्टमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे.
@mpsc_office यांनी या परिस्थितीची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलावी, तसेच सारथी, महाज्योती आणि बार्टी च्या CET परिक्षाही 29 सप्टेंबरला आहेत त्यासुद्धा पुढे ढकलाव्यात. जेणेकरून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सावरण्याची आणि योग्य तयारीची संधी मिळेल.
@CMOMaharashtra
🔴लक्षवेधी...
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
👉28 सप्टेंबरच्या राज्यसेवा परीक्षेचे परीक्षार्थी राज्यातील नैसर्गिक आपत्तीची आणि पाऊसाची परिस्तिथी बघता परीक्षा खरंच होईल का नाही याबाबत खूप संभ्रमात आहेत तरी तात्काळ नोटिफिकेशन प्रसिद्ध करून संभ्रम दूर करावा ही विनंती.
@BaliramDoleyINC@mpsc_office पूर परिस्थिती, भयाण अवस्ता, बंद रोड , तसेच हवामान खात्याने दिलेला ४ दिवसांचा पाऊसचा अलर्ट याचा विचार करून कृपया २८ ला होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी ही विनंती…
@BaliramDoleyINC@mpsc_office CM Devendra Fadanavis yanna ky mahit asnar pur ani apatti tyanni na kadhi sheti madhe pay thevla asel na kadhi tyanch ghar purachya panyat budhalel asel. Ha pn ek matr nakki ahe ki CM padavr astana tyanni 5 star Helicopter madhun purachya panyache darshan ghenyasathi daure kelet.
@BaliramDoleyINC कधी लढणार..... आज शुक्रवार.... आमच परीक्षा केंद्र 150 किमी लांब आहे.... उद्या परीक्षेसाठी निघाव लागेल... उद्या आंदोलन करायचं का पेपर ला जायचं....
@BaliramDoleyINC@mpsc_office उद्यापरवा थोडा जरी पाऊस आला तरी गावतील मुलींना येणे शक्य नाही घरी वापस जाण्याची पण चिंता आहे,रस्ते बंद झाले तर मुलींचा प्रश्न गंभीर बनतो.पुण्यात वातावरण ठीक आहे म्हणजे आख्खा महाराष्ट्र वातावरण ठिक आहे असा मुळीच नाही गरिब विद्यार्थी च्या पण विचार करा घरून अभ्यास करणारेचा तोटा होईल
@BaliramDoleyINC@mpsc_office आयोगाने सर्व विचार करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा व राज्यसेवा परीक्षेची तारीख पुढे ढकलावी.. पंजाब लोकसेवा आयोगाने परीक्षेला १ महिना बाकी असतानाच परीक्षा पुढे ढकलली आहे..
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात आणि माझ्या मतदारसंघात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यासाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. याखेरीज वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी वाहने देखील पोहचू शकत नाहीत अशी स्थिती आहे. याच परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा ही 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. परंतु अद्यापही मराठवाड्यातील विध्यार्थांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ती घेण्यात यावी अशी विध्यार्थांची मागणी आहे. माझी मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला अशी विनंती आहे कि, कृपया आपण या गंभीर परिस्थितीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा...
@CMOMaharastra @Dev_fadanvis
मराठवाडा, सोलापूर,अहिल्यानगर येथे आलेल्या पुरामुळे विद्यार्थ्यांचे साहित्य वाहून गेले, वाचनालये बंद व वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत २८ सप्टेंबरची MPSC राज्यसेवा परीक्षा अनेक विद्यार्थ्यांसाठी अशक्यप्राय आहे हि परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.@CMOMaharashtra@mpsc_office
मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर येथे आलेल्या पुरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास साहित्य वाहून गेले, वाचनालये बंद आहेत व वाहतूक विस्कळीत झाली आहे. या सर्व परिस्थितीत २८ सप्टेंबर रोजीची MPSC राज्यसेवा परीक्षा देणे अनेक विद्यार्थ्यांसाठी अशक्यप्राय आहे. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी. विद्यार्थांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने याची योग्य ती दखल घेऊन निर्णय घ्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks