🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
@MeshramDayanand आदरणीय सर, ऑनलाइन परीक्षांमध्ये 'Multiple Shiftwise वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका देऊन नंतर नॉर्मलायझेशन करणे' ही पद्धती पुरेशा प्रमाणात level playing field प्रदान करीत नाही. त्यामुळे UPSC, MPSC च्या पारंपरिक ऑफलाईन परीक्षा हा ऑनलाईन परीक्षांपेक्षा नक्कीच सरस पर्याय आहे.
फडणवीसांच्या सत्ता काळात राज्यभरात नोकरभरतीचा महाघोटाळा सुरू आहे.
#नवी_मुंबई महापालिका भरतीचा पेपर फुटला असण्याची शक्यता आहे.
महापरिक्षा पोर्टल घोटाळा पार्ट - 02 सुरू असून, मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यांना लाजवेल असे घोटाळे महाराष्ट्रात सुरू आहेत, यावर विरोधक सुद्धा गप्प आहेत.
परीक्षा घेणाऱ्या TCS ION कंपनीच्या पर्यवेक्षकानेच काही ठराविक उमेदवारांना उत्तरे सांगितले असल्याचा प्रकार कोल्हापुरातील परीक्षा केंद्रावर घडला आहे. याची रीतसर तक्रार परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी केली आहे.
राज्यातील सरळसेवा नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, राज्य सरकारने तत्काळ TCS आणि IBPS कंपन्यांचे काम बरखास्त करून सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्याची व्यवस्था करावी.
नवी मुंबई महापालिकेने दवंडी पेटवून सांगितले होते की किती अधिकारी कोण कोणत्या परीक्षा केंद्रावर तैनात केले आहेत परंतु, नवी मुंबई महापालकेची तयारी अपुरी पडली आहे. पर्यवेक्षक उमेदवारांना उत्तरे सांगत असतानाही, महापालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्याला याची माहिती नव्हती किंवा यात महापालिकेचे अधिकारी सुद्धा सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे प्रकार नक्की किती परीक्षा केंद्रावर झाले आहेत याची पूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. झालेल्या घोटाळ्यामुळे बोगस उमेदवारांना नोकरी मिळण्याची शक्यता लक्षात घेता आज झालेली परीक्षा महापालिकेने रद्द करावी आणि येणाऱ्या सर्व परीक्षा बरखास्त कराव्यात.
घडलेल्या प्रकाराची महापालिकेने रीतसर पोलिस तक्रार देऊन गुन्हा नोंदवावा अशी आमची मागणी आहे, गुन्हा नोंदविला गेला नाही तर समन्वय समिती मार्फत पोलिस तक्रार देण्याचा विचार करण्यात येईल.
राज्य सरकार आणि नवी मुंबई महापालिकेला आम्ही विविध मागण्या केल्या आहेत, त्यांनी त्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्हाला इतर संविधानिक मार्ग अवलंबावे लागतील.
@NMMConline@Dev_Fadnavis@AUThackeray@Awhadspeaks@mnsadhikrut@MeGajananKale@RajThackeray@INCHarshsapkal@RRPSpeaks@supriya_sule@ShelarAshish@mieknathshinde@DrSEShinde@ShivSenaUBT_@Prksh_Ambedkar@rautsanjay61@satejp@Jayant_R_Patil@CMOMaharashtra@PatilKailasB@advanilparab@AbhiPawarBJP@Dhananjay4INC .
🔅वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी MPSC आग्रही होती.
🔅आता उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.
🔸पण MPSC चे तज्ञ तयार आहेत का❓
👉MES 2023 मुख्य परीक्षेबाबत ज्या बातम्या येत आहेत, त्यावर @mpsc_officeने काहीतरी स्पष्टीकरण द्यायला हवे.
जाहिरात क्रमांक:- 001/2023 व 111/2023 ,
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023.
लिपिक टंकलेखक संवर्गाच्या निकालाबाबत माननीय आपणच 13 मे 2025 रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला होतात की , प्रस्तुत संवर्गाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल आज या आठवड्यातील शेवटचा दिवस आहे.
तुमच्या प्रसिद्धी पत्रकानुसार तुम्ही आज निकाल लावायला हवा तुमच्या नियमाचे तुम्ही पालन कराल हीच अपेक्षा.
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office@Drsuvarnas
जाहिरात क्रमांक:– 414/2023
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 या परीक्षेला SEBC आरक्षण का लागू होत नाही...?
SEBC आरक्षण अधिनियम क्रमांक 18 स्वतः म्हणतं की ,
हे अधिनियम 26 फेब्रुवारी 2024 च्या आधी जी भरती प्रक्रिया चालू झाली असेल अशा भरतींना हे अधिनियम पूर्वलक्षी ( Retrospective ) प्रभावाने लागू होणार नाही. तसेच महाराष्ट्र सरकारकारच्या शासन निर्णय क्रमांक नंबर 5 नुसार हे आरक्षण 27 फेब्रुवारी 2024 नंतरच्या भरती प्रक्रियेंना लागू होते.
शासन निर्णय सुद्धा म्हणतो की हे आरक्षण पूर्वलक्षी(Retrospective) प्रभावाने लागू होत नाही.
तरी पण मागील सरकारने निवडणुकांमुळे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी या लोकांनी या अधिनियमांमध्ये एक पळवाट काढली आहे ती अशी की भरती प्रक्रिया कधी सुरू होते त्याचे स्पष्टीकरण त्यांनी असं दिलं आहे की , "भरती प्रक्रिया ही लेखी परीक्षा पासून सुरू होते'. म्हणजेच आपल्या भाषेत पूर्व परीक्षा पासून...
(या अशा कार्यकारी मंडळांनी तयार केलेले अधिनियम , कायदा हे बरोबर आहे का नाही व ते संविधानानुसार योग्य आहे का नाही ते ठरवण्याचा अंतिम अधिकार हे न्यायव्यवस्थेला आहे.)
याबाबतीत न्यायव्यवस्थेने आधीच निर्णय दिला असून सुद्धा या सरकारने ते न जुमानता न्याय व्यवस्थेच्या निर्णयाला धाब्यावर बसून हे अधिनियम तयार केले गेले.
भरती प्रक्रिया कधी सुरुवात होते याचं स्पष्टीकरण पूर्वीच तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाने "के मंजुश्री विरुद्ध आंध्र प्रदेश" राज्य या खटल्यात दिलेलं होतं तरीसुद्धा न्यायालयाच्या खटल्याला न जुमानता हे अधिनियम तयार करण्यात आले त्यानंतर 7 नोव्हेंबर 2024 मध्ये पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने "तेज प्रकाश पाठक विरुद्ध राजस्थान उच्च न्यायालय" या खटल्यामध्ये वरील तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. यांनी भरती प्रक्रिया कधी सुरू होते याचे स्पष्टीकरण असे दिले आहे की ,
"भरती प्रक्रियेची सुरुवात त्याच वेळी होते जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होते".
म्हणजेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 याची जाहिरात, 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाली . याचा अर्थ भरती प्रक्रिया या दिवसापासून सुरु झाली.
मग प्रश्न असा आहे की भरती प्रक्रिया सुरू झालेल्या परीक्षांना SEBC आरक्षण लागू नाहीच हे स्वतः अधिनियम आणि शासन निर्णय सांगत असताना या सरकारने हे आरक्षण लागू का केलं...?
स्वतःच्या स्वार्थापोटी इतक्या मोठ्या पदांच्या होणाऱ्या भरती प्रक्रिया मध्ये स्वतःचा स्वार्थ साधून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासाठी हे सर्व सुरू आहे.
ही सर्व भरती प्रक्रिया नियमबाह्य होत आहे याला सर्वस्वी सरकार आणि स्वतः आयोग सुद्धा जबाबदार आहे. सरकारने याच्यावरती काही पावले उचलणार का...?
का हे सरकार असंविधानिक नियमबाह्य कार्यपद्धतीच या पुरोगामी महाराष्ट्रात राबवणार.
सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा डोळे बंद करून हे असे प्रकार घडत असतील तर यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना खूप मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे याची जबाबदारी कोण घेणार...? सरकार का आयोग...
1) SEBC आरक्षण अधिनियम.
2) SEBC आरक्षण शासन निर्णय.
3) तेज प्रकाश पाठक विरुद्ध राजस्थान उच्च न्यायालय
@mpsc_office@Drsuvarnas@MahaChiefSec@Maha_GoodGovern@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@cbawankule@Pankajamunde@AjitPawarSpeaks@ChhaganCBhujbal@mieknathshinde@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Shivsenaofc@OfficeofUT@AUThackeray@rautsanjay61@iambadasdanve@OmRajenimbalkr@PatilKailasB@ShivSenaUBT_@PawarSpeaks@supriya_sule@kolhe_amol@Jayant_R_Patil@RRPSpeaks@Awhadspeaks@NCPspeaks@mnsadhikrut@RajThackeray@INCMaharashtra@INCHarshsapkal@NANA_PATOLE@satejp@AmitV_Deshmukh@bb_thorat@prithvrj@Dhananjay4INC@RealBacchuKadu@rajushetti@Ravikanttupkar1@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@SakalMediaNews@lokmat@LoksattaLive
@JayMaharashtrN
#Mpsc
#SEBC_Reservation_issue
#मराठा_आरक्षण
#नियमबाह्य_पदभरती
#बेजबाबदार_सरकार
#मनमान_कारभार
#supreme_court_judgement
@Kishorp76854559 @Bhagwatjspeaks कट ऑफ कमी लागतो म्हणून इतर उमेदवारांनी त्या प्रवर्गातून जाणून-बुजून अर्ज सादर करणे हे योग्य आहे का ? यावर आयोगाने दक्ष असणे आणि त्यानुसार कार्यपद्धतीमध्ये बदल करणे अपेक्षित नाहीये का???
@Kishorp76854559 @Bhagwatjspeaks या मध्ये आयोगाची अशी चूक आहे की "अगोदर कागदपत्र बघितले जाणार नाही" ही आयोगाची कार्यपद्धती चुकीच्या गोष्टी रोखण्यात अक्षम ठरत आहे. दिव्यांग प्रवर्गाचा मोठा घोटाळा समोर आल्यानंतर आयोग दिव्यांग उमेदवारांचे कागदपत्र तपासायला लागला आहे. इतर प्रवर्गांना सुद्धा ही बाब लागू केली पाहिजे.
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला पण ,
वरील परीक्षेमध्ये सुद्धा EWS -SEBC आरक्षणाचा घोळ झाला आहे.
कारण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 या जाहिरातीला SEBC आरक्षण लागू केल्यानंतर SEBC विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गात जाण्यासाठी वेब लिंक ओपन करून देण्यात आले होते.
यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या प्रोफाईल मध्ये सुद्धा बदल झाला आहे असे गृहीत धरून ते विद्यार्थी गट ब परीक्षेचा फॉर्म जैसे ते परिस्थिती नुसार भरले यामुळे ते विद्यार्थी SEBC असून सुद्धा अनेक विद्यार्थी EWS मधूनच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
या कारणे या परीक्षेच्या निकालामध्ये मूळ EWS विद्यार्थ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे.
जे SEBC विद्यार्थी EWS मधून पास झाले आहेत त्यांना आयोगानुसार शेवटच्या टप्प्यात बाद करण्यात येईल असे सांगण्यात येते पण मूळ EWS विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा हक्क येथे डावळला जात आहे .
खरं तर 103 वी घटना दुरुस्ती नुसार मिळालेल्या आरक्षणाचा हेतू सुद्धा येथे साध्य होताना दिसत नाही , त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 , 15 आणि 16 यांचे उल्लंघन होत आहे.
या परीक्षेमध्ये वरील समस्यांमुळे मुळ EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सुद्धा दुसऱ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणे एवढे भरत नाही.
वरील सर्व समस्यांसाठी माननीय आयोग जबाबदार नसून सर्वस्वी स्वतः विद्यार्थी जबाबदार आहेत.
याच्यावरती काही तोडगा निघेल का...?
ही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकून राहील का...?
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office@Drsuvarnas@MeshramDayanand@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@OfficeofUT@PatilKailasB@OmRajenimbalkr@INCMaharashtra@INCHarshsapkal@NCPspeaks@RRPSpeaks@kolhe_amol@Ravikanttupkar1@abpmajhatv@TV9Marathi@SakalMediaNews@zee24taasnews
#MPSC
#EWS_Reservation
#EqualityforAll
#SEBC_Reservation
Akash sewakram Patle यांना 200 मार्क पडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
कारण त्यांनी खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यांना या आधीच्या अकाऊंट या पदासाठी फक्त 12 मार्क पडले होते. खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे आणि आम्हाला TCS/ IBPS वरचा विश्वास अजून दृढ झाला आहे. खरंच खूप पारदर्शक परीक्षा होत आहेत. आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि आकाश सारखे मुले जिद्द चिकाटी आणि एका महिन्यात झीरो चे हिरो होऊन जातात कमाल आहे.
माय बाप सरकार बघा किती पारदर्शक परीक्षा होत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांनी जीव द्यावा का? हे फक्त एक उदाहरण आहे.
आम्ही कितीही पुरावे दिले कितीही गुन्हे नोंद केले तरी आपली पोलीस यंत्रणा मॅनेज होतेच कारण धाराशिव मध्ये तलाठी पेपर फुटीच्या केस मध्ये आम्ही अनुभवला आहेच. पोलीस कसे मॅनेज होतात ते एक उत्तम उदाहरण आहे. कारण तिथे जवळपास 200 बोगस विद्यार्थी सापडले असते तिथे यांनी तपासच केला नाहीये.
राज्याचे ग्रहमंत्रीच @Dev_Fadnavis असे आहेत तर पोलीस तरी काय करणार ना. अजून वेळ गेली नाहीये बघा यावर काय करता येते का?
@DGPMaharashtra @OsmanabadPolice
@OmRajenimbalkr@PatilKailasB
@AbhiPawarBJP आदरणीय @AbhiPawarBJP साहेब, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 निकालामध्ये शेवटी original EWS लोकांना न्याय मिळालाच नाही. एकदा निकाल revise केला आणि 318 नवे उमेदवार EWS कोट्यातून मुख्य परीक्षेसाठी पात्र केले. परंतू या 318 मध्ये बरेचसे मराठा SEBC उमेदवार EWS च्या कोट्यातून पास झाले आहेत
Sunday Wisdom!सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांनी #UPSC परीक्षेत मोठ्या कष्टाने यश संपादन केले ही बाब अत्यंंत अभिमानाची व गौरवास्पदही.यश डोक्यात न जाता त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी झाला तरच हे कौतुक चिरकालीन.अन्यथा ये रे माझ्या मागल्यांत एकाची भर!
'मेंढ्या चारणारा टॉपर' अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळतो, पण त्यामागचं वास्तव जनतेपासून लपवतो. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही—तर कोचिंग घेतलं, पुणे-दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता.
यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही; ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे दाखवणं गरजेचं आहे.
पण हेही तेवढंच खरं आहे की अशा कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी होतात, पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय, याचा विचार करणारं कोणी आहे का?
म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं महत्त्वाचं आहे.
#UPSCReality #CareerAwareness #TrueStruggle #MediaResponsibility #YouthGuidance
OBC , SC, ST सहित सर्व जातींना कौटुंबिक उत्पन्नावर NCL बंधनकारक करणे आवश्यक आहे.
शिवाय ही NCL मर्यादा आर्थिक दारिद्र्यावर निश्चित करायला हवी.
तरच खरोखर गरजू लोकांना न्याय मिळेल. सध्या UPSC, MPSC पास होणाऱ्यांमध्ये खोटे उत्पन्न, खोटे अपंग, खोटे खेळाडू यांचा भरमार आहे !
माननीय सचिव ,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
महोदय/महोदया ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेत सुद्धा आरक्षण संबंधित "EWS-SEBC" समस्या आहे.
आपणास विनंती आहे की वरील परीक्षेतील सर्व समस्येची सोडवणूक करूनच निकाल जाहीर करावे.
🙏🌱
@mpsc_office@Drsuvarnas