“विविधते मधे एकता” हे रक्तात आसण्यासाठीचा पायाभूत नियम,
जाती आणि धर्मां मधल्या विविधतेचा आदर राखणं हा आहे.
‘समता आणि बंधुता’ मनाशी खोलवर मान्य करणं आणि काटेकोरपणे व्यवहारात बाणवणं ही त्या नियमाची अंमलबजावणी आहे.
ऐकल्या सारखं वाटतंय?
गांधी,आंबेडकर,नेहरू,पटेल सगळे हेच म्हणायचे.
“If Hindus migrate to other regions on earth, Indian caste will become a world problem.”
- Dr B. R. Ambedkar
in his paper he read on 9th May 1916, at the Colombia University
The journey from Abdul’s village to Jantar Mantar is a long and arduous one. There is no road for the last mile, although govt records say that the road has been made multiple times. Abdul had to take a rickshaw, then walk, then get on a truck and finally a train to get there.
Yet when he decided, his father, Mafiq ji, told him - Ja beta, desh mein kuch accha ho raha hai.
When Abdul came back and expressed his willingness to go and check govt schools, Mafiq ji only said - I am proud of you.
Mafiq ji was murdered by the BJP goons, right under the nose of @WBPolice. He was brutally beaten up first in his home and then in the hospital. Succumbed to injuries.
And yet, all that Abdul had to ask for from the govt was a world class school in the name of Mafiq ji.
All that Mafiq ji’s mom and Abdul grandmother had to say was - Abdul is your responsibility. Inquilab Zindabad. Go fight the good fight.
What a family! Patriots of the highest order.
BJP should know that these are the kind of people who make @Cockroachisback.
Nothing. Literally nothing can stop us from getting the govt schools fixed.
Do whatever the hell you can.
@abhijeet_dipke@VijayMallangi@Ankitrevolution@SangwanSudhir
मा. देवेंद्रजींनी घेतलेल्या अर्धवट आणि संदिग्ध निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबियांची दिशाभूल झाली असून हा विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा विश्वासघात आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे, ऑगस्ट २०२७ पर्यंत नव्हे, तर कायमस्वरूपी MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच झाल्या पाहिजेत.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड मान्य नाही. पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी भरती प्रक्रिया हीच महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची न्याय्य अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “२०२६ हे मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे आणि नियुक्तीचे वर्ष असणार आहे” अशी जाहीर घोषणा केली होती.
आता प्रश्न एवढाच आहे, ती घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार? बेरोजगार तरुणांना केवळ शब्दांच्या खेळात अडकवून ठेवू नका. लाखो युवक-युवती विविध सरकारी भरतीच्या जाहिरातींची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जर २०२६ हे खरोखरच “मेगाभरतीचे वर्ष” असेल, तर तात्काळ विविध विभागांतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून नियुक्ती प्रक्रिया सुरू करा.
अन्यथा, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी आणि रोजगाराच्या मागणीसाठी आम्हाला पुन्हा एकदा हजारो विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागेल.
घोषणा नव्हे, जाहिराती द्या.
आश्वासने नव्हे, नियुक्त्या द्या.
लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष संविधानिक आणि लोकशाही मार्गाने शेवटपर्यंत लढा देण्यास कटिबद्ध आहे.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar @CongressRojgar @mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
सर्व विद्यार्थ्यांचा विरोध असताना कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाइन परीक्षेचा इतका अट्टाहास?
सर्व व्यवस्था ही नागरिकांसाठी असते ना की स्वतःच्या फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही. 😡
मा. मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis जी, ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आमची सर्वांचीच आपणास नम्र विनंती आहे की, MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास, पारदर्शकता आणि समान संधी यासाठी ऑफलाइन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वांच्या वतीने या निर्णय बद्दल आपले खुप खुप आभार.. 🙏🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mpsc_office
मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून संगणकाधारित (CBT) परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगित करण्याची सूचना दिली, हा महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, विविध विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण लढ्याचा, राज्यभर उभारलेल्या आंदोलनांचा आणि काँग्रेस पक्षाने MPSC मुख्यालय, सीबीडी बेलापूर येथे सलग ९ दिवस चालविलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा पहिला मोठा विजय आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, विधान परिषद सदस्य सतेज (बंटी) पाटील यांनी हा विषय सातत्याने शासन, मुख्यमंत्री, MPSC आणि विधिमंडळात प्रभावीपणे मांडत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या या नेतृत्वाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी संपूर्ण अधिवेशनभर भक्कम साथ देत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
या लढ्याचे सर्वात मोठे श्रेय महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना, विविध विद्यार्थी संघटनांना आणि मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वर्धा यांसह राज्यभर आंदोलन उभारणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाते. या सामूहिक संघर्षामुळेच शासनाला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकावा लागला.
हा केवळ परीक्षा पद्धतीचा प्रश्न नाही, तर लाखो मेहनती विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा लढा आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी आवाज उठवत आहेत. त्याच विद्यार्थी न्यायाच्या भूमिकेला बळ देणारा हा संघर्ष आहे.
मात्र ही बाब राज्यसेवा परीक्षा पद्धतीतील पूर्वीच्या अनुभवाचीही आठवण करून देते. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर Objective परीक्षेचे दोन प्रयत्न वाढवून देण्यात आले; पण नंतर Descriptive पद्धत लागू करण्यात आली. आयोगाकडे पेपर तपासणीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पुढे Optional विषयही काढून टाकावे लागले.
त्यामुळे केवळ मुदतवाढ हा कायमस्वरूपी तोडगा नाही. आज २०२७ पर्यंत स्थगिती आणि उद्या पुन्हा ऑनलाइन परीक्षा रेटून नेण्याचा प्रयत्न होणार नाही, याची स्पष्ट हमी आवश्यक आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे. MPSCच्या सर्व भरती परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच व्हाव्यात. पारदर्शकता, वेळेत निकाल आणि पेपरफुटीमुक्त भरती प्रक्रिया हीच विद्यार्थ्यांवरील खरी न्यायाची भूमिका आहे.
आता MPSC ने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करून ऑफलाइन (OMR) परीक्षा पद्धतीबाबत अधिकृत आणि कायमस्वरूपी निर्णय जाहीर करावा. अंतिम निर्णय होईपर्यंत काँग्रेसचा आणि विद्यार्थ्यांचा हा लढा सुरूच राहील.
लडेंगे, जितेंगे..... !
@RahulGandhi@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@DalviAaba@INCMaharashtra@bhimanwar@mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan@VastavKatta
#MPSC #OfflineExam #StudentJustice #RahulGandhi #Congress
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
“२०२६ हे मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे आणि नियुक्तीचे वर्ष असणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे म्हटले होते.
आता प्रश्न एवढाच आहे, ही घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार? बेरोजगार तरुणांना केवळ शब्दांच्या खेळात अडकवून ठेवू नका. लाखो युवक - युवती सरकारी भरतीच्या जाहिरातींची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जर २०२६ हे खरोखरच “मेगाभरतीचे वर्ष” असेल, तर तात्काळ मोठ्या प्रमाणात विविध विभागांच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून नियुक्ती प्रक्रिया सुरू करा.
अन्यथा, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि रोजगाराच्या मागणीसाठी आम्हाला पुन्हा एकदा हजारो विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागेल.
घोषणा नव्हे, जाहिराती द्या. आश्वासने नव्हे, नियुक्त्या द्या.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
MPSC ने स्वतः ३० एप्रिल २०२३ रोजी जाहीर केलेल्या माहितीनुसार, गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी ४,६७,०८५ उमेदवारांनी अर्ज केला होता. या सर्व उमेदवारांसाठी आयोगाने राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर १,४७५ परीक्षा उपकेंद्रांची यशस्वी व्यवस्था केली होती.
आता गट ब आणि गट क या परीक्षा स्वतंत्रपणे होणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी मिळून उमेदवारांची संख्या २०२३ च्या संयुक्त परीक्षेपेक्षा लक्षणीय वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. जरी अर्जांची संख्या वाढली तरी ती ५ लाखांच्या आसपासच राहील. एवढ्या उमेदवारांची व्यवस्था MPSC सहज करू शकते, हे आयोगाने २०२३ मध्येच सिद्ध केले आहे. म्हणून CBT (Online) परीक्षेचा आग्रह धरण्याचे कोणतेही व्यवहार्य कारण उरत नाही.
विद्यार्थ्यांचा एकच आग्रह आहे की,
१. सर्व MPSC परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीने घ्याव्यात.
२. ऑनलाइन CBT व नॉर्मलायझेशन पद्धत तातडीने रद्द करावी.
३. पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी परीक्षा प्रणाली कायम ठेवावी.
आयोगाकडे क्षमता आहे, मग विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा देणारी ऑनलाइन परीक्षा पद्धत का?
@INCHarshsapkal@bhimanwar
@CongressRojgar
#OfflineMPSC #OMR #MPSC #JusticeForAspirants #NoToCBT #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
🚨 आज दुपारी २:०० वाजता X (Twitter) Live 🚨
📍 MPSC मुख्यालय, बेलापूर आंदोलनस्थळावरून थेट
मुख्य विषय:
✅ MPSC परीक्षा ऑफलाईनच का झाल्या पाहिजेत?
✅ तलाठी भरती परीक्षा घोटाळा आणि TCS ची भूमिका
✅ लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ
✅ पुढील आंदोलनाची दिशा
तलाठी भरती घोटाळ्याबाबत समोर आलेल्या गंभीर बाबी, MPSC परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आणि न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आज आंदोलनस्थळावरून थेट संवाद साधणार आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने या Live मध्ये सहभागी व्हावे.
🕑 आज दुपारी २:०० वाजता
📍 X (Twitter) Live
🔗 @Dhananjay4INC
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा लढा आहे. आपल्या प्रश्नांसह नक्की सहभागी व्हा!
@INCMaharashtra@Mpsc_Andolan @degree_holders @aspirantspeaks1@VastavKatta@MPSCstudsRight@PunyachiMPSC@Yesjassociation
#MPSCExamOffline #TalathiBharti #TCS #JusticeForStudents
🛑 तलाठी भरती प्रकरणातील MAT च्या आदेशानंतर MPSC ने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी!
तलाठी भरती प्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (MAT) फॉरेन्सिक व महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या मदतीने सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर उपस्थित झालेले गंभीर प्रश्न पुन्हा अधोरेखित झाले आहेत.
अशा परिस्थितीत, ज्या TCS iON कंपनीमार्फत परीक्षा प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याच कंपनीमार्फत MPSC च्या CBT (ऑनलाईन) परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या मनातील अविश्वास अधिक वाढवणारा आहे.
याच कारणासाठी आम्ही कालपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे—
✅ MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाईन (Pen & Paper) पद्धतीनेच घ्याव्यात.
✅ CBT आणि Normalisation पद्धतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
✅ लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही प्रयोग करू नये.
✅ परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करावा.
MAT च्या आदेशानंतर आयोगाने आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत तातडीने निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेसचा लढा सुरू आहे आणि तो यशस्वी होईपर्यंत सुरूच राहील.
विद्यार्थ्यांचा विश्वास जपा… भविष्याशी तडजोड थांबवा!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@bhimanwar@mpsc_office@Mpsc_Andolan
@degree_holders
#MPSC #OfflineExam #NoToCBT #NoToNormalisation #StudentsFirst #Congress
Sunday Wisdom!मुख्यपरीक्षा एक मात्र पात्रता निश्चितीस्तव ऑनलाईन पूर्व परीक्षा दोन/तीन?गुणवर्धनास्तव अतिरिक्त पूर्व परीक्षांंमधे कालापव्यय,जास्तीच्या परिक्षेमुळे गुुण समानीकरणात वाढीव क्लिष्टता,यामुळे उमेेदवारांंत वाढणारी अस्वस्थता टाळण्यासाठी एकच #MPSC पूर्वपरीक्षा पुरेशी!
MPSC ने आजपर्यंत ऑफलाईन परीक्षा घेतल्या. उत्तम अधिकारी महाराष्ट्राला दिले. पण TCS आणि IPPS यांच्याकडून अनेक घोटाळे झाले.
मा. श्री. सतेज पाटील
आमदार, विधानपरिषद
@satejp
दि. २८ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षातर्फे स्पष्ट इशारा दिला होता : "पुढील १० दिवसांत CBT अर्थात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय MPSC ने रद्द केला नाही, तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल."
गेल्या १० - १२ दिवसांत महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांनी, विविध विद्यार्थी संघटनांनी, महाविकास आघाडीच्या घटक पक्ष, लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस पक्षाने सातत्याने आंदोलने केली. मोर्चे, निदर्शने, निवेदने, धरणे अशा लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. तरीही राज्य सरकार आणि MPSC प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नावर तोडगा निघावा, विद्यार्थ्यांची बाजू थेट MPSC समोर मांडता यावी आणि संवादातून मार्ग काढता यावा यासाठी आम्ही MPSC चे अध्यक्ष मा. विवेक भिमनवार यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून काँग्रेसचे प्रतिनिधी, विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली. मात्र, आजपर्यंत अशा बैठकीसाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
MPSC च्या भरती प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य आणि सर्वसमावेशक असाव्यात, ही लाखो विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, डिजिटल सुविधांचा अभाव, तांत्रिक अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील समान संधीचा प्रश्न आणि स्पर्धा परीक्षांवरील विश्वास या सर्व गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून CBT पद्धती लादण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा आहे.
त्यामुळे आता संघर्ष अधिक तीव्र करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बुधवार, दि. ८ जुलै २०२६ पासून नवी मुंबई येथील MPSC मुख्यालय, बेलापूर येथे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू करणार आहोत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस व सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील.
ही लढाई कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही; ती महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची, न्यायाची आणि समान संधीची आहे. राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना आणि न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या आंदोलनाला नैतिक पाठिंबा द्यावा तसेच शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही.
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@DalviAaba@bhimanwar@mpsc_office
#MPSC #CBT #JusticeForStudents #StudentsFirst #Congress #Maharashtra