#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
पुण्यात MPSC उमेदवारांचे आंदोलन!
त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत.
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील तांत्रीक अडचणी दूर करून परीक्षा पुढे ढकलावी.
2. संयुक्त परीक्षा गट ब 2024 मध्ये PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढवाव्यात.
@mieknathshinde
combine जागवाढ तसेच राज्यसेवेतील विविध तांत्रिक त्रुटी, sebc आणि ews आरक्षणा संबधी बाबी साठी एमपीएससी मुलांचे आंदोलन चालू आहे......पोरांनी अभ्यास सोडून आंदोलनच करायचे का?
२ वर्षांनंतर आलेल्या add मधे तुटापुंज्या जागा काढून विद्यार्थ्यांवर अन्नाय होतोय...
#combine_जागावाढ
@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा.
https://t.co/sXc0yGbn8w
s
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
युवांच्या हक्कांसाठी #साहेब सदैव मैदानात !
#combine जागावाढ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी काल आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. या दोन्ही विषयात साहेब व्यक्तिशः लक्ष घालत असून आयोगाशी साहेबांनी बोलणे केले आहे. मुख्य परीक्षेसंदर्भात आजच निर्णय होईल, ही अपेक्षा आहे तर combine परीक्षेसंदर्भात साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून जागावाढीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल.
#mpsc
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
आमची सरकारला आणि आयोगाला नम्र विनंती आहे की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
🛑पुण्यात MPSC उमेदवारांचे आंदोलन.
मागण्या:-
1️⃣संयुक्त गट ब 2024 जागावाढ करावी.
[PSI, STI, ASO L, SR या सर्व पदांच्या जागा रिक्त असूनही सरकारने तटपुंज्या संख्येची जाहिरात काढली आहे.]
2️⃣ राज्यसेवा मुख्य 2024 पुढे ढकलावी.
@mpsc_office@Dev_Fadnavis
#आधारवड
राज्यात कोणत्याही घटकाला काही अडचण असेल तर त्याचा आवाज ऐकून घेणारी राज्यात एकमेव हक्काची व्यक्ती आहे ती म्हणजे आदरणीय पवार साहेब!
सरकारच्या अन्यायाविरोधात काल पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनीही अन्यायच केला.. यासंदर्भात आज आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिला.
@PawarSpeaks@mpsc_office
राज्यसेवा आयोगाच्या जुलूमशाहीविरोधात परीक्षार्थींचा बुलंद आवाज!
१) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मधील आरक्षण व तांत्रिक समस्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलण्यासाठी
२) कंबाइन्ड पूर्व परीक्षा 2024 मध्ये जागावाढ करण्यासाठी
आज अहिल्यादेवी लायब्ररी, पुणे येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे!
#MPSCStudents #MPSC2024 #VoiceOfStudents
#DhananjayShinde
#Dhananjay_Shinde
@mpsc_office@Mpsc_Andolan@degree_holders@punyachiMPSC
#MPSC आयोगाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात विद्यार्थ्यांचा संयम संपतोय!
मा. देवेंद्रजी,
गेल्या अनेक दिवसांपासून संविधानिक मार्गाने, शांततेत पाठपुरावा करूनही
१) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मधील आरक्षण व तांत्रिक अडचणी
२) कंबाइन्ड पूर्व परीक्षा 2024 मधील जागावाढ
या न्याय्य मागण्यांकडे आयोग व सरकार दुर्लक्ष करत असेल, तर आंदोलनाशिवाय पर्यायच उरत नाही.
आंदोलन करणे गुन्हा आहे का?
पुण्यात शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करणं ही लोकशाहीची थट्टा नाही का?
चुका आयोगाच्या आणि शिक्षा परीक्षार्थींना? हे कदापी मान्य होऊ शकणार नाही!
सरकार आणि आयोगाने सर्व विद्यार्थ्यांच्या आक्षेपांवर त्वरित निर्णय घ्यावा आणि अटकेत असलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC2024 #WeStandWithMPSCStudents #VoiceOfStudents #MPSCProtest
#DhananjayShinde #Dhananjay_Shinde