भूतकाळात निवडणुकेचे मुद्दे महागाई, महिलांची सुरक्षा, बेरोजगारी हे असायचे आणि सत्ताबदल व्हायचं. आजचे निकाल बघता हे मुद्दे जनतेला चालत नाही असा समज झाल्यास गैर नाही.
#MaharashtraElection2024
मी शिवीगाळ करणार नाही, कोणाचाही अपमान करणार नाही. माझी फक्त एकच विनंती आहे - तुम्ही जे १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते कृपया द्या किंवा जनतेला दिलेलं दरवर्षी २ कोटी नोकऱ्या रोजगारांचं वचन तरी पूर्ण करा.
#वचनपूर्ती
देशातील राष्ट्रवादी सरकार देवाचंच काम करत आहे. मग त्यांना प्रश्न विचारायची हिंमत तरी कशी करता?गप्प बसा, डोळे मिटा, टाळ्या वाजवत राहा. प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह, उत्तरदायित्व मागणं म्हणजे राष्ट्रविरोध, आणि अंध समर्थन म्हणजे देशभक्तीलोकशाहीची ही नवी व्याख्या आहे का?
🤐👏❓⚖️🇮🇳
छान मुलाखत. आज जेव्हा बहुसंख्य लोकांनी गप्प बसणं, फक्त बघ्याची भूमिका घेणं आणि प्रश्न नाही विचारणं पसंत केलं आहे, अशा वेळी अशी स्पष्ट आणि निर्भीड मुलाखत अधिक महत्त्वाची ठरते.
FCNR ठेवींवरील व्याजदर वाढवून परकीय चलनसाठा वाढवण्याची वेळ का आली? चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे देशाला अशा तात्पुरत्या उपायांवर अवलंबून राहावे लागत आहे का? अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करणारे सरकार संकटाची चाहूलही ओळखू शकले नाही का? आता याची जबाबदारी कोण घेणार?
#Teaeconomics
नोटाबंदी फसली, आपण गप्प राहिलो. जीएसटीची अंमलबजावणी अयशस्वी ठरली, कोविडच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांचा जीव गेला, तरीही आपण गप्प राहिलो.
अर्थव्यवस्थेची होत असलेली वाटचाल पाहता, उद्या आपल्या बचतीवर आणि मालमत्तेवरही सरकारचा डोळा जाईल, अशी भीती वाटते.
#wakeup
मला अशी शंका आहे की राम मंदिरातील कथित चोरी झालेला निधी आणि पीएम केअर्सच्या नावाने जमा झालेला पैसा याचा वापर स्वतःला स्वयंघोषित “विश्वगुरू” म्हणून प्रतिमा उभी करण्यासाठीजनसंपर्क (PR) मोहिमांवर करण्यात आला असावा. आर्थिक व्यवहारांची पूर्ण पारदर्शक चौकशी करून जनतेसमोर सत्य मांडावे.
५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्यांनी, विद्यार्थ्यांकडून माफी मागवण्यापेक्षा प्रभू रामांच्या मंदिरातील देणग्या कोणी लुटल्या याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. टीका किंवा खिल्ली उडवली गेली म्हणून विद्यार्थ्यांवर दबाव टाकणे हे नेतृत्वाचे लक्षण नाही.
#ownyourfailures