मित्रांनो कोणत्याही बातमीने पॅनिक होऊ नका.
कोणत्याही परिस्थितीत कृषीच्या जागा समाविष्ट करून राज्यसेवा जाहिरातीत अतिरीक्त जागांचा समावेश करून घेऊन शेवटच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ.
सर्वजण गट तट सोडून एकत्र या...
#MPSC
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
@AbhiPawarBJP 👉 परंतु रात्रभरापासून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची आता आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी अगोदर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांकडून टेक्निकल बाबी समजून घ्याव्यात ही विनंती🙏
@AbhiPawarBJP https://t.co/0bBL55gb33
मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब, आपण मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहात त्याबद्दल आपले धन्यवाद,🙏🙏
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
मा. @mieknathshinde साहेब
शेवटी रस्त्यावर उतरावे लागलंच
🔶गेले कित्येक महिने लाखो बेरोजगारांच्या मागण्या आपल्याकडे नम्रपणे मांडत होतो,पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्यात काडीचा रस नव्हता.
गेल्या 16 तासापासून #MPSC उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष,रोष आपण
अहिल्यादेवी अभ्यासिका समोर,पुणे येथे पाहिला असेलच.
आज काय तो
एकदाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.
प्रमुख मागण्या
🔶1. IBPS & MPSC exam dates overlapping issue
25 august
🔶 2. #MPSC कृषी च्या 258 जागा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित 2024 मध्येच तात्काळ समाविष्ट करण्यात याव्यात
🔶3. #MPSC च्या जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा परीक्षेत सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांचे
सर्वसमावेशक मागणीपत्रक तात्काळ
पाठवण्यात यावे.
उपजिल्हाधिकारी,
पोलीस उपाधीक्षक,मुख्याधिकारी सह सर्व महत्वाच्या संवर्गाचा समावेश करण्यात यावा.
गेल्या 9 महिन्यापासून हे उमेदवार विनवण्या करत आहेत,पण आपण त्यांच्यावर अक्षरशः सूड उगवत आहात.
🔶4. #MPSC ची संयुक्त अराजपत्रित
गट-ब् व गट -क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
फेब्रुवारी त नियोजित असणारी जाहिरात ऑगस्ट संपत आला तरी प्रसिद्ध झाली नाही.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE@dhananjay_munde
कृषी जागा वाढीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांवर आंदोलन करायची वेळ सरकार आणणार असेल तर आम आदमी पक्ष पक्षाच्या झेंड्याशिवाय या उमेदवारांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरेल….
बिनशर्त जाहीर पाठिंबा.
@AAPMaharashtra
परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करून
आपल्याला काही सांगू इच्छितो....
दरवेळी प्रत्येक हाकेला हो म्हणणारे माझे सर्व सहकारी,मित्रपरिवार,मला दरवेळी मोलाची साथ देणारे विद्यार्थी मित्र- मैत्रिण या सर्वांना नम्र आवाहन करतो ....
' गोरगरीब बेरोजगारांसाठी जी लढाई लढत आहे त्यात आपण सर्वजण हक्काने सामील व्हा.'
#तयार_रहा #आंदोलन #mpsc #कृषी #राज्यसेवा #कम्बाईन #अंतिम_लढाई
@mpsc_office@Drsuvarnas मा. आयोग, मा मुख्यमंत्री साहेब सुध्दा कृषी अधिकारी च्या 258 जागा याच वर्षी म्हणजेच 2024 मध्येच भरण्यासाठी आग्रही आहेत. तशी विनंतीही त्यांनी #MPSC कडे केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन तत्काळ कृषीच्या258 जागा समावेश करण्यासाठीचे #notification काढावे🙏
काल पुणे विमानतळ येथे मा मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांची agri mpsc 258 जागे संदर्भात मध्ये भेट घेऊन निवेदन दिले व या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. मा,मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना आश्वासित केले की या जागा 2024 मध्येच भरणार.
धन्यवाद साहेब 🙏🌱 @CMOMaharashtra
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मुख्यमंत्री महोदय कृषी विभागातील 258 राजपत्रित जागा याचवर्षीच्या परीक्षेत Add करायला तयार आहेत आज संध्याकाळ पर्यंत आयोगाकडून तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करून उमेदवारांचा संभ्रम मिटला पाहिजे
@mieknathshinde@CMOMaharashtra
कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या २५८ जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करण्यात यावा.. या मागणीसाठी ठिकठिकाणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत … गेले काही दिवस त्यांचा सातत्याने हा लढा सुरु आहे …
गेल्यावर्षी देखील ही भरती न झाल्याने कृषी पदवीधारकांचे नुकसान झाले आहे..तसचं एमपीएससी आणि IBPS ची एकाच दिवशी आलेल्या परीक्षेवर सुद्धा लवकर शासनानं निर्णय घ्यावा … तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत चालू असलेला खेळ थांबवावा… सगळ्या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी विनंती...!!!
@CMOMaharashtra
कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सरकारने या विद्यार्थ्यांचा अंत न बघता तातडीने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. या विद्यार्थ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे असून वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
आज 18 ऑगस्ट रोजी 10,313 पदांसाठीची IBPS RRB ऑफिसर स्केल परीक्षा व MPSC समाजकल्याण परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी झाल्यामुळे आज समाज कल्याण परीक्षेला फॉर्म भरलेल्या पैकी 40% स्पर्धा परीक्षा विद्यार्थी गैरहजर होते. तसेच IBPS RRB परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यां हे समाज कल्याण परीक्षेपासून वंचित राहिले,IBPS RRB परीक्षा फॉर्मचे 1000 रुपये विद्यार्थ्यांचे वाया गेले.खूप दिवसापासून मुलं आर्थिक, मानसिक दडपणाखाली आहेत. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहे हे समजल्यावर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. कर्नाटक लोकसेवा आयोग KPSC ने 25 ऑगस्ट 2024 रोजी होत असलेली IBPS CLERK परीक्षेनिमित्त लाखो विद्यार्थ्यांचा विचार करून KPSC राज्यसेवा परीक्षा ही काही दिवसांसाठी पुढे ढकलली आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.. भारतात संविधान हे सारखेच लागू आहे. भारतासारख्या या भलाढ्य लोकशाही देशात आज संविधानाची पायमल्ली झाली.. शाहू फुले आंबेडकर या समाजसुधारकांच्या एकतेचा समतेचा विचार आज महायुतीच्या सरकारने केला नाही लाखो विद्यार्थी हताश असून ते मानसिक नैराश्यात गेले आहेत.. आता कायद्याची लढाई लढावीच लागणार... समाज कल्याण परीक्षेचा बळी गेला पण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा बळी जाऊ देणार नाही...
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#MPSC
कृषी सेवेच्या 258 जागांचा समावेश करून 15 सप्टेंबरच्या आत परीक्षा घेण्याचे नियोजन आयोगाने करावे यामुळे राज्यसेवा, कृषी सेवा तसेच बँकिंग इत्यादी परीक्षांची सामायिक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@Drsuvarnas@mpsc_office