समृद्धी महामार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु यात खूप मोठे घोटाळे बाहेर येऊ शकतात. गरीब शेतकऱ्यांना लुबाडून जमिनी दलालांनी सरकारला विकल्या . माझी सरकारला नम्र विनंती आहे की समृद्धी महामार्ग, खर्डी एमआयडीसी आणि मुमरी धरण इथे झालेल्या प्रत्येक खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून 65किमी समृद्धी महामार्ग गेला आहे. रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. इथे ही दलालांनी शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक जमिन खरेदीत आणि आर्थिक अशी केली आहे. याची सरकारने चौकशी करावी.
शहापूर तालुक्यातील खर्डी येथे होत असलेल्या एमआयडीसी मध्ये ही मुमरी धरणा सारखाच जमिन खरेदी घोटाळा झाला आहे. सदर दोन्ही ठिकाणी गरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली गेली आहे. दलालांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्यात. सरकार या दोन्ही प्रकल्पांची अधिकृत चौकशी करणार का?
ठाणे जिल्हा शहापूर तालुक्यातील होऊ घातलेल्या मुमरी धरण जमिन खरेदीत झालेल्या जमिन घोटाळ्या कडे शासनाचे लक्ष जाणार का? हजारो एकर जमिन खरेदी घोटाळा नियम धाब्यावर बसवून झाला आहे.पुनर्वसनाच्या नावाखाली जास्त पैसे देऊन खासगी विकासकाची जमिन सरकारला खरेदी करण्यास भाग पाडले आहे.