दुधात पाणी टाकतो, साखर टाकतो म्हणून लहानपणी जे लोकं “मोठे गुन्हेगार” वाटायचे ते आता युरिया, निरमा आणि पाम ॲाईल वाल्यांच्यासमोर किती “भली माणसं” होती असं वाटतं.
#StockholmSyndrome
लाजवाब अप्रतिम आणि आगळावेगळा अनुभव. दिग्दर्शक Christopher Nolan यांचा The Odyssey लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला #theOdyssey आणि सोबत स्टारकास्टही भारतात @TomHolland1996
दिघी खाडीत फायबरची बिगरयांत्रिक डिंगी वाऱ्यामुळे पलटल्याने तीन मच्छीमार समुद्रात अडकले होते. सागरी सुरक्षा रक्षक अरविंद पाटील व जितेंद्र कांबळे यांनी तत्काळ माहिती देत दिघी-आगरदांडा फेरीबोट Queen Boat चे चालक बाळकृष्ण गणेश पाटील यांच्या मदतीने तिघांची सुखरूप सुटका केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असणारा पवई तलाव आज पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते.
💧Powai lake, one of the most important artificial lakes in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) area, started overflowing around 5.30 am today. With a water holding capacity of 545 crore litres, the lake's water is used only for industrial purposes.
#MyBMCUpdates
#MumbaiRains
जागतिक पुस्तक दिन निमित्ताने पुरोगामी विचाराच्या मित्र मैत्रिणीनी वाचावे असे विवेकवादी, सुधारणावादी, तर्कवादी 50 पुस्तकं.
१) गुलामगिरी - माहात्मा फुले
२) राजर्षी शाहू चरित्र ग्रंथ - डॉ जयसिंगराव पवार
३) शेतकऱ्याचा असूड - माहात्मा फुले
४)जातीव्यवस्थेचे निर्मूलन- डॉ बाबासाहेब आंबेडकर
५) दास - शुद्रांची गुलामगिरी - शरद पाटील.
६) आर्य आणि अनार्य - शरद पाटील
७) बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत - शरद पाटील
८) गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो - डॉ आ.ह साळुंखे
९) विद्रोही तुकाराम - डॉ आ. ह.साळुंखे
१०) सर्वोत्तम भूमिपुत्र - गौतम बुद्ध - डॉ आ.ह साळुंखे
११) आस्तिक शिरोमणी चार्वाक - डॉ आ.ह साळुंखे
१२) शिवराय : संस्कार आणि शिक्षण
१३) ऐतरेय ब्राह्मण - डॉ. आ ह साळुंखे
१४) हिंदू संस्कृती आणि स्त्री
१५) एरिक फ्रॉम याचे स्वातंत्र्याचे भय - मराठी अनुवाद - डॉ आ.ह साळुंखे
१६) महात्मा फुले आणि धर्म - डॉ आ.ह साळुंखे
१७) भिक्षुकशाहीचे बंड - प्रबोधनकार ठाकरे
१८) हिन्दु जनांचा ऱ्हास आणि अधःपात. - प्रबोधनकार ठाकरे
१९) फकिरा - अण्णाभाऊ साठे
२०) संत गाडगेबाबा चरित्र - प्रबोधनकार ठाकरे
२१) सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय - डॉ मा.गो. माळी
२२) आकलन - नरहर कुरुंदकर
२३) शिवरात्र - नरहर कुरुंदकर
२४) जागर- नरहर कुरुंदकर
२५) मागोवा - नरहर कुरुंदकर
२६) भजन - नरहर
२७) हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत - शमसूद्दीन तांबोळी
२९) माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
३०) आगरकर वाड्मय - म.ग नातु | दि.य देशपांडे
३१) क्रांतीसूक्ते राजर्षी छत्रपती शाहू- डॉ एस एस भोसले
३२) प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी
३३) मनुवाद्यांशी लढा - डॉ मा.म देशमुख
३४) बहुजन समाज आणि परिवर्तन
३५) भारतीय संस्कृती - साने गुरुजी
३६) कर्मवीर भाऊराव पाटील - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार - प्रभाकर नानकर
३७) शूद्र पूर्वी कोण होते - डॉ बाबासाहेब आंबेडकर
३८) वाटा माझ्या तुझ्या - नरहर करूंदकर
३९) नवरोजी ते नेहरु - गोविंद तळवलकर
४०) परिचय - नरहर कुरुंदकर
४१) मराठी संतांचे सामजिक कार्य - वि भि कोलते
४२) संत वाड्मयाची फलश्रुती - प्रा गं.बा सरदार
४३) चक्रधर स्वामी चरीत्र- वि.भि कोलते
४४) संत तुकाराम - भालचंद्र नेमाडे
४५) देशीवाद - भालचंद्र नेमाडे
४६) शिवकालीन महाराष्ट्र -डॉ अ रा कुलकर्णी
४७) छत्रपती संभाजी - वा सी बेंद्रे
४८) संत गाडगेबाबा - प्रबोधनकार ठाकरे
४९) पुराणकथा आणि वास्तवता - डी डी कोसंबी
५०) जात समजून घेताना - डॉ गेल ओमव्हेट
पुरोगामी विचारांच्या या पुस्तकांपैकी किमान 10 पुस्तक वाचले तरी माणूस बुद्धीने सशक्त, परिवर्तनवादी, प्रगमनशील विचाराचा होण्यास मदत होते. त्याच्या जगण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून तो मानवतावादी विचाराचा पाईक होऊ शकतो यात तिळमात्र शंका नाही.
Here it is the meaning of #Marathi peom written on royal menue.
अस्प्यार्यागस सूप मत्स्याह ससा त्या नंतरी तीतरें ॥ ॥
Asperges (Holy water) soup with Fish, Rabbit, तितर (bird Grey francoli found in Central India)
टकीं रोस्ट सलाड त्याज वरती डसॉस फूलावरें ॥ ॥
Turkey Roast Salad with Hollandaise sauce ( mixture of egg yolk, melted butter, and lemon) with topping of flowers
झिंग्याची करि भात गोडही पुडिंग जेली सर्वे क्रीमते
Prawns curry rice, with sweet pudding & jelly will follow the que .
आइस्क्री = Ice cream (modern loanword in Sanskrit/Marathi script)
रुचिरा पदार्थ = delightful/delicious substance (or tasty item)
दश = ten (items)
हे त्वां सेविजे भूपते = O King (भूपते = bhūpate, vocative for king/ruler), I serve you (त्वां सेविजे = I serve/worship/serve unto you)
राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
राज्यात सध्या काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडू शकतो.
३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठेवावीत व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
@Indiametdept@Dev_Fadnavis
#Maharashtra #weatherupdate #DevendraFadnavis
ठाण्यातील कॅडबरी जंक्शन पार करण्यासाठी दररोज २० हून अधिक मिनिटांचा अवधी लागत असल्याने चालक त्रस्त. येथील वाहतूक समस्या गंभीर झाली असूनही ही समस्या सोडवण्याकडे होतेय दुर्लक्ष.
@ThaneCityPolice