ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात महिला कलाकारांच्या मेकअप रुममध्ये परवानगी न घेता कामगारांनी प्रवेश केल्याचा आरोप
https://t.co/VfUoMTRfSl
#Thane#ThaneNews
कोण आला रे कोण आला? राजसाहेब ठाकरे आले! तब्बल 40 वर्षांनी राज ठाकरे शिवसेनेच्या 'त्या' शाखेत
https://t.co/h8D581rRR0
#RajThackeray#MNS#Maharashtra#Thane
शहर स्वच्छ असेल तरच आरोग्यदायी जीवन शक्य आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. हाच संदेश देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रारंभ कला अकॅडमी, आनंद विश्व गुरुकुल सीनियर कॉलेज आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने "चला व्यक्त होऊया" या विशेष कार्यक्रमाचं आयोजन बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे करण्यात आलं होतं.
स्वच्छता या विषयावर खोलवर चर्चा घडवून आणण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी सहभाग घेतला. यामध्ये ठाणे महानगरपालिका, उपायुक्त घनकचरा विभागाचे मनीष जोशी, आरोग्य अधिकारी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या डॉ. राणी शिंदे, वेस्ट मॅनेजमेंट अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते नैनेश पाटणकर, Co founder NGO RNisarg Foundation लता घनश्यामनानी, सुजय पत्की उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे प्रारंभ कला अकॅडमीच्या मनीषा कुलकर्णी आणि अरुंधती भालेराव यांचे मोलाचे योगदान होते.
या कार्यक्रमाला शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यासोबत थेट संवाद साधून त्यांचे अनुभव, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या गेल्या. कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्टिंग, आणि पुनर्वापर यावर विशेष भर दिला गेला.
शहरातील समस्या महापालिकेवर ढकलून चालणार नाही. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेणं आणि आपापल्या परिसरात जबाबदारीने वागणं गरजेचं आहे, असं यावेळी सांगितलं.
@Shivsenaofc@mataonline@sujaypatki
#nareshmhaske #CleanCity #WasteSegregation #Composting #Recycle #CitizenResponsibility #UrbanCleanliness #SustainableLiving #CommunityEngagement #WasteManagement #CleanIndia
महाराष्ट्र टाइम्सच्या ६४व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाईम्सच्यावतीने ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात ‘मटा कॅलिडोस्कोप’ उपक्रमांतर्गत 'तुम्हीच रंगवा तुमची छत्री' हे कार्यशाळा राबवण्यात आली. या कलात्मक उपक्रमाला ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने कलारसिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, गृहिणींपासून तरुणांपर्यंत प्रत्येकजण या उपक्रमात सहभागी झाला.
प्रसिद्ध सुलेखनकार पिनाकीन रिसबूड यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. याआधी ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्र्या सजवण्यात आल्या होत्या. यंदाही तीच कलात्मक परंपरा पुढे नेण्यात आली. प्रत्येक जण अगदी मन लावून आपापली छत्री रंगवत होत. त्यांना पाहून मलाही छत्री रंगवण्याचा मोह आवरता आला नाही म्हणून मी देखील त्यांच्यात सहभागी होऊन एक छत्री रंगवली. त्यांच्यासोबत छत्री रंगवताना माझं बालपणही जणू पुन्हा अनुभवायला मिळालं. शाळेचे दिवस आठवले,चित्रकलेचे तास, शिक्षकांचे मार्गदर्शन हे सगळं डोळ्यासमोर तरळून गेलं.
तसेच यावेळी ठाण्याचे विनीत जांगळे यांच्यावतीने माझा सत्कार करण्यात आला त्यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्याचबरोबर 'महाराष्ट्र टाइम्स’च्या या सृजनात्मक उपक्रमाबद्दल मी त्यांचं कौतुक केलं व आभार मानले.
यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री. सुजय पत्की, तसेच महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी प्रवीण मुळे, सौरभ शर्मा, अनुजा चवाथे, भाविक पाटील आणि ठाण्याचे विनीत जांगळे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र टाइम्स परिवार उपस्थित होता.
@mataonline@Shivsenaofc@mieknathshinde
#NareshMhaske #MaharashtraTimes #MatakaKaleidoscope #ArtWorkshop #UmbrellaArt #CreativeExpression #ArtForAll #ThaneEvent #MumbaiEvent #NaviMumbaiEvent #ArtLovers #CommunityEngagement #ArtTherapy #ColorsOfLife