संकल्पपूर्तीचे समाधान,वरिष्ठांचे कौतुक आणी नवी प्रेरणा
१०k दुर्बल महिलांना मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचं बळ देण्याचा संकल्प पूर्ण. यानिमित्ताने आज @Vinay1011 सोबत @Dev_Fadnavis यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करण्याची इच्छा अशीच पूर्ण होवो हीच कामना
कालपर्यंत ज्या गोष्टी केवळ भाषणांमध्ये होत्या, आज त्या सन्मान बनून प्रत्यक्ष जमिनीवर दिसत आहेत!
एक काळ असा होता, जेव्हा गरिबाच्या हक्काची मदतही त्याच्यापर्यंत पूर्ण पोहोचू शकत नव्हती. दलाल होते, भ्रष्टाचार होता आणि आश्वासने केवळ भाषणांमध्येच असायची. परंतु गेल्या १२ वर्षांत गरिबी केवळ आकडेवारीने नाही, तर सन्मान आणि सुविधा देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पक्के घर
स्वयंपाकासाठी गॅस
बँक खाते
मोफत उपचार
शौचालय
मोफत अन्नधान्य
नळाने पाणी...
या केवळ योजना नाहीत, तर एका गरिबाचे आयुष्य बदलणारे टप्पे आहेत.
आज गरीब मदतीसाठी लाचार होऊन उभा असलेला लाभार्थी नाही, तर आपल्या हक्कासह ताठ मानेने उभा असलेला सशक्त नागरिक आहे!
#12YearsOfGaribKalyan
I’m overwhelmed by the flood of birthday wishes today. Forgive me for not replying individually, but please know how deeply grateful I am.
X can be a vast, impersonal, even divisive, platform. Yet on days like this, it feels like an extended family, radiating warmth. Thank you for being there. 🙏🏽
I’ve always felt fortunate that my birthday coincides with a public holiday: Maharashtra Day at home in Mumbai, and globally as International Workers’ Day.
This year, there’s another reason to celebrate: the inauguration today of the ‘Missing Link,’ a remarkable network of bridges and tunnels that finally makes the Mumbai–Pune journey seamless.
As I turn 71, it feels fitting to reflect on the ‘missing links’ in our own lives…the people and bonds that have been our unseen support, our emotional bridges through difficult times. And the importance of rebuilding those links, and expressing our gratitude.
Today, my wish for each of you, is that you can reconnect your own missing links, those bridges that quietly held you up when you needed them most.
अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडे नाहीत… तो प्रत्येकाच्या भविष्याचा आराखडा असतो!
तरुणांच्या स्वप्नांपासून ते ज्येष्ठांच्या अपेक्षांपर्यंत…
शेतकरी, कामगार, नोकरदार, उद्योजक...
प्रत्येक घटकाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे असते.
म्हणूनच अर्थसंकल्प केवळ ऐकायचा नाही, तर समजून घ्यायचा आहे.
सोप्या आणि स्पष्ट भाषेत अर्थसंकल्प उलगडणारे माझे पुस्तक अवश्य वाचा.
उद्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरवेल...
त्याची तयारी आजपासूनच सुरू करूया.
लिंक : https://t.co/7ftIh6nJJR
#Maharashtra #MahaSamruddhi #MahaBudget2026
महत्त्वाची सूचना
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.
या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
आपत्कालीन संपर्क तपशील
रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन : +970592916418
ईमेल : [email protected] / [email protected]
दोहा (कतार)
फोन : 00974-55647502
ईमेल : [email protected]
रियाध (सौदी अरेबिया)
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : [email protected]
तेल अवीव (इस्रायल)
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : [email protected]
तेहरान (इराण)
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : [email protected] / [email protected]
कुवैत
फोन : +96565501946
ईमेल : [email protected]
बाहरीन
फोन : 00973-39418071
मस्कत
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : [email protected] / [email protected]
जॉर्डन
फोन : 00962-770 422 276
बगदाद (इराक)
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट :https://t.co/7Qy2AEFUgt
ईमेल : [email protected] / [email protected] / [email protected]@indemtel@India_in_Iran@Indemb_Muscat@CGIJeddah@IndEmbDoha@IndiaInBahrain@IndianEmbRiyadh@EI_Baghdad@IndiainJordan@indembkwt
#TravelAdvisory
Declassified records and intelligence histories describe serious security vulnerabilities during the Nehru–Gandhi era.
Accounts point to foreign intelligence penetration at high levels of governance.
The issue was not perception — it was documented in published sources.
#CompromisedNehru
On the Jayanti of Chhatrapati Shivaji Maharaj, we bow in reverence to the visionary leader, exceptional administrator, strategic thinker and champion of Swarajya.
May his courage inspire us, his governance guide us and his spirit of justice and self-respect strengthen our society.
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे
दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
Truly grateful to the people of Maharashtra for blessing an overwhelming mandate to BJP and MahaYuti in the Municipal Council and Nagar Panchayat elections. This remarkable success belongs to our dedicated Karyakartas; it is their hard work, commitment, and perseverance that has made this victory possible.
The people of Maharashtra have once again reaffirmed their unwavering faith in the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, along with the guidance of BJP National President and Hon Union Minister J. P. Nadda ji and BJP National Working President Nitin Nabin ji, paving the way for the BJP’s historic victory.
As per the trends and results received so far (as of 3 PM), BJP has secured victory in 129 municipal councils (45 %) this year, a significant rise against 94 in 2017.
As MahaYuti, we have won 215 municipal councils (74.65 %), out of a total of 288 municipal councils.
In terms of number of corporators, BJP had won 1602 seats in 2017, which has now surged to 3325 (47.82 %).
This means BJP won more than double the seats won earlier.
As MahaYuti, we have won 4331 seats (62.30 %) out of a total of 6952 seats.
Heartiest congratulations to Maharashtra BJP State President Ravindra Chavan for the outstanding performance in this election, the first held under his tenure and leadership.
Congratulations to all my colleagues too and our tireless Karyakartas who work relentlessly.
This victory is just a trailer of what we will see in the upcoming Municipal Corporation elections.
I urge every party worker to work even harder and with more efforts for driving us towards greater victories in the future!
@narendramodi@JPNadda@NitinNabin@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati
Shri Nitin Nabin Ji has distinguished himself as a hardworking Karyakarta. He is a young and industrious leader with rich organisational experience and has an impressive record as MLA as well as Minister in Bihar for multiple terms. He has diligently worked to fulfil people’s aspirations. He is known for his humble nature and grounded style of working. I am confident that his energy and dedication will strengthen our Party in the times to come. Congratulations to him on becoming the BJP National Working President.
@BJP4India
स्थापना करतानाच घोषित केलं की या खात्याद्वारे आयुर्वेद आणि इतर पारंपरिक उपचार पद्धतींचा फक्त भारतातच नाही तर जगभर प्रसार व्हावा. आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नाहीये तर ती जीवनशैली आहे, जी आजार होऊच नये म्हणून काय करावं हे शिकवते. मोदीजींनी अनेकदा त्यांच्या भाषणात उल्लेख केला की जग मुळात आजारीच पडू नये म्हणून ही आयुर्वेद ही जीवनशैली जगाच्या कानाकोपऱ्यात अंगिकारली जावी आणि तरीही कोणी आजारी पडलं तर त्याला देखील बरं होण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग व्हावा.. भारतातील अमूल्य ज्ञानाचा हा खजिना जगाला देखील खुला व्हावा म्हणून त्यांनी जगभरातील विद्यापीठांमध्ये आयुष अध्यासन केंद्र स्थापन करायला प्रेरित केलं. आयुर्वेदिक औषधं जगभरात उपलब्ध व्हावी म्हणून अनेक योजना सुरु केल्या.
आज जगभरात भारतीय माणसं पसरलेली आहेत. या अनिवासी भारतीयांकडे फक्त परकीय चलन कमवून देणारे असं बघण्याचा आधीच्या सरकारांचा दृष्टिकोन होता. मोदीजींनी मॅडिसन स्क्वेअरला, इंग्लंडमध्ये वेम्बलीला, आणि ह्युस्टनला Howdy Modi असे अतिभव्य कार्यक्रम करून, त्या त्या देशांतील अनिवासी भारतीयांना तुम्ही आमचे आहात याची साक्ष दिली. तिथे केलेल्या भाषणातून, त्यांनी अनिवासी भारतीयांचा उल्लेख, 'राष्ट्रदूत' असा करत, तुम्ही भारताचा वसुधैव कुटुंबकमच्या विचारांचे तुम्ही दूत आहात याची जाणीव करून दिली.
भारत- श्रीलंका-म्यानमार-नेपाळ आणि पूर्वेकडच्या थायलंड ते जपान या देशांना जोडणारा एक समान धागा म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांनी दिलेला विचार. पाली भाषा ज्यात गौतम बुद्धांची शिकवण मांडली आहे, त्या भाषेला त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यावेळी बोलताना मोदीजी म्हणाले भारताने जगाला 'बुद्ध' दिला आहे, 'युद्ध' नाही. मोदीजींनी त्यांच्या पूर्वेकडील देशांच्या प्रवासात तिथल्या बुद्धस्तुपांना भेट दिली, श्रीलंकेत गौतम बुद्धांचा जो ऐतिहासिक ठेवा आहे त्याचं जतन करण्यासाठी त्यांनी भारत सरकारतर्फे १५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली.
हिंदू ही या देशातील बहुसंख्यकांची ओळख आहे. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात ही ओळख अभिमानाने सांगण्यासारखी परिस्थितीच नव्हती. जिथे भारतात हिंदू म्हणवून घेताना अवघड जात असेल तिथे अनिवासी भारतीयांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा विचार पण करवत नाही? पण मोदीजींनी सनातन हिंदू धर्म हा जग तोडणारा नाही तर जग जोडणारा आहे, ज्या धर्मात विश्वासाठी पसायदान मागण्याची परंपरा आहे, तो धर्मच जगात शांतता नांदवू शकतो हे परदेशातील प्रत्येक व्यासपीठावर ठासून सांगितलं. त्यामुळेच जगभरात आपल्या हिंदू धर्माबद्दल एक विश्वासाचं वातावरण तयार झालं आणि त्यातूनच अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर उभं राहिलं. शेख मोहम्मद बिन झाएद यांनी स्वतःहून या मंदिरासाठी जमीन दिली.
२०१५ साली भारत-आफ्रिका खंडातील देशांच्या कॉन्फरन्समध्ये, सूर्यप्रकाश मुबलक असलेल्या देशांनी, सौरऊर्जेच्या वापरात पुढाकार घ्यावा यासाठी इंटरनॅशनल सोलर अलायन्सची घोषणा केली. त्यावर न थांबता त्यांनी जवळपास १.७५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक पण या अलायन्समध्ये केली. आफ्रिकन युनियनला भारतात झालेल्या जी२० समिटला बोलावणं असो की कोव्हीड व्हॅक्सिन जगभरात गरजुंना वेळेत मिळेल यासाठी केलेली धडपड असो या सगळ्यातून त्यांनी भारत ही मृदू संपदा ही जगाच्या मनावर ठसवली. त्यामुळेच जगातील प्रत्येक युद्धप्रवण देशाला किंवा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या देशाला, भारत आपल्यासाठी काहीतरी करू शकेल अशी आशा वाटते, हीच मोदीजींनी भारताला दिलेली ओळख आणि शक्ती...
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ हे मोदीजींनी सत्यात उतरवलं. विश्वगुरू होण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या, देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या मोदीजींना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा...
सुजय पतकी
प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश
#NarendraModi #modibirthday
#narendramodi_primeminister #modi #WorldLeader
#ModiHaiToMumkinHai #BJP4IND
भारतीय मृदू संपदेचा राष्ट्रदूत...
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. @narendramodi जी यांना 75 व्या वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. मे २०१४ पासून मोदीजी देशाचे पंतप्रधान बनले आणि तेंव्हापासून आजपर्यंत जवळपास ११ हुन अधिक वर्ष ते या खंडप्राय देशाचे एकमेवाद्वितीय असे नायक आहेत, इतकंच नाही तर जगातील सगळ्यात लोकप्रिय आणि प्रभावशाली नेत्यांच्या यादीत मोदीजी हे गेली काही वर्ष अग्रक्रमावर आहेत. एखादा नेता देशांत त्याच्या लोकप्रिय योजनांमुळे, त्यांनी आणलेल्या बदलांमुळे देशांतर्गत लोकप्रिय होऊ शकतो. पण एखादा नेता जगाच्या पाचही खंडातील लोकांना माहीत असतो, त्यांच्याबद्दलचं कुतूहल असतं. हा विश्वनेता आहे आणि याच्या मनात आपल्याबद्दलची पण तळमळ आहे असं वाटणं हे मात्र अकल्पित आहे. पण यालाच सॉफ्ट पॉवर (मृदू संपदा ) म्हणतात.. आणि जरी आज मोदीजी या सॉफ्टपॉवरचा चेहरा बनले असले तरी खऱ्या अर्थाने ही भारताची मृदू संपदा आहे.
'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना प्रचलनात आणली जोसेफ न्ये (Joseph Nye ) यांनी विसाव्या शतकाच्या मध्यात... सैन्य आणि शस्त्रांच्या पलीकडे जात लोकांना जिंकणं, त्यांच्या मनावर राज्य करणं, थोडक्यात कोणतीही हार्ड पॉवर न वापरता माणसांना जिंकण्याची कला म्हणजे 'सॉफ्ट पॉवर'. दुसरं महायुद्ध आणि हिरोशिमा, नागासाकी येथे झालेला अणुबॉम्बचा हल्ला यातून जगाचं अपरिमित नुकसान झालं होतं. जगातील सगळ्याच वसाहतवादी देशांना लक्षात आलं होतं की युद्ध हे कशाचंच उत्तर असू शकत नाही. त्यातच पुन्हा अमेरिकेला मानणारा गट आणि रशियाला मानणारा गट यांच्यात शीतयुद्ध सुरु झालं. ते अगदी बर्लिन भिंत कोसळेपर्यंत सुरु होतं. याकाळात देखील तिसऱ्या महायुद्धाची वेळ समीप आली आहे असं वाटावं असे अनेक प्रसंग येऊन गेले. पण या संपूर्ण काळात अमेरिका आणि रशियाने ते टाळलं, याचं कारण दोन्ही राष्ट्रांना हार्ड पॉवरपेक्षा, सॉफ्ट पॉवर वापरण्यातलं तंत्र कळलं होतं.
हॉलीवूडचा सिनेमा, त्यातून जगभरात रुजवली गेलेली जीन्स, टीशर्ट सारखी वस्त्रसंस्कृती असो की मॅक्डोनाल्ड्स सारख्या फूड चेन्समधून जगभरात रुजवली गेलेली अमेरिकन फास्टफूड संस्कृती ही सगळी सॉफ्टपॉवर रुजवण्याची आयुधं होती. रशियादेखील डाव्या विचारांचे सिनेमे, त्यांचं तंत्रज्ञान यातून स्वतःचा गट स्वतःकडे राहील हे पाहत होता. पण या सगळ्यात कुठेतरी जगाला आपल्या ताब्यात ठेवण्याचा आणि त्यातून व्यापार उदीम वाढावा हा उद्देश होता.
पण मोदीजींनी मृदू संपदा (सॉफ्ट पॉवर ) राबवण्याचं जे प्रारूप पुढे आणलं ते या दोन्ही महासत्तांच्यापेक्षा खूप वेगळं होतं. भारत हा असा एकमेव देश आहे जो कायम हिंदुबहुल देश होता की ज्यांनी कधीही विस्तारवादी भूमिका घेतली नाही, उलट बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं जशी दुधात साखर मिसळल्यावर तिचा गोडवा वाढतो तसा... त्यामुळे मोदीजींचं मृदू संपदेचं प्रारूप हे आक्रमक या भावनेतून तयार झालेलं नव्हतं, तर 'वसुधैव कुटुंबकम' या भावनेतून आलं होतं. अगदी दहाव्या शतकापर्यंत, जोपर्यंत इथला धर्म, इथली जीवनपद्धती नष्ट करायची या इर्षेने पेटलेल्यांची आक्रमणं सुरु झाली नव्हती तोपर्यंत जगभरात भारताची एक मृदू संपदा होतीच. ती फक्त व्यापारामुळेच नाही, त्यात इथल्या ज्ञानामुळे, इथल्या अध्यात्मामुळे, इथली शिल्पकला, चित्रकला, संगीत यांच्यामुळे ती सत्ता होती. पुढे आक्रमकांच्या कचाट्यात भारत सापडला आणि पुढे अनेक शतकं त्यातच गेली. पण त्याही काळात विशेषतः युरोपातून व्यापाराच्या आमिषाने आलेले भारतीय जीवनपद्धती, संस्कृती, धर्माचारण यांनी अचंबित होत होते. हेच सगळं पुन्हा जगासमोर मोदीजींनी आणायचं ठरवलं.
योगश्चित्तवृत्तिनिरोधः॥ पतंजलीच्या योग सूत्रांत योग शास्त्राचं केलेलं वर्णन... 'योग'बद्दल जगभरात आकर्षण खूप आधीपासून. पण मधल्या काळात भारतातच आपल्या या प्राचीन शास्त्राचा विसर पडलेला. मोदीजींनी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून संयुक्त राष्ट्रसंघांशी संवाद सुरु केला आणि २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होऊ लागला. याआधी पाश्चिमात्य देशांमध्ये पॉवर योग आणि इतर प्रकारचे काही योगप्रकार लोकप्रिय झाले होते, पण नक्कल नाही तर अस्सल योग, हा मोदीजींच्यामुळे पुन्हा समोर आला, लोकप्रिय झाला. आज जेंव्हा न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात, पॅरिसला आयफेल टॉवरच्या समोर, सिडनीला ऑपेरा हाऊसमध्ये हजारो लोकं २१ जूनला जेंव्हा योग करताना दिसतात तेंव्हा मोदीजींनी पुनर्जीवित केलेल्या मृदू संपदेची शक्ती दिसून येते.
'योग'च्या जोडीला,२०१४ ला मोदीजींनी आयुष मंत्रालयाची स्थापना केली. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये या शास्त्राबद्दल प्रचंड कुतूहल होतं आणि आहे देखील. मोदीजींनी ९ नोव्हेंबर २०१४ ला आयुष मंत्रालयाची cnt
या युवा चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल मा. हरिभाऊ बागडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समिती सदस्य रेखाताई महाजन, तसेच शोभाताई फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी भास्कर ब्रम्हनाथकर, शशिकांत कर्डेकर, गीताताई गुंडे, गिरीश प्रभुणे, अरुण करमरकर, श्याम जाजू आणि डॉ. विनय सहस्रबुद्धे या सत्याग्रहींचा मा. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मूळ स्वभावातच एकाधिकारशाही होती, असे मत मांडत मा. हरिभाऊ बागडे यांनी त्या वेळच्या आंदोलनातील स्वानुभवही कथन केले. समारोप सत्रात शेवटी चर्चासत्राचे निमंत्रक सुजय पतकी यांनी सर्व अतिथींचे, सत्याग्रहींचे आणि १५ जिल्ह्यांतून आलेल्या ६० तरुण सहभागींचे आभार मानले.
#Emergency1975 #आणीबाणीची_५०_वर्षे #emergency
माजी मंत्री, वरिष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस, निवृत्त न्यायाधीश, गोव्याचे माजी लोकायुक्त ॲड. अंबादास जोशी, ज्येष्ठ अधिवक्ता राम आपटे, साहित्यिक आणि विचारवंत दिलीप करंबेळकर व अरुण करमरकर, ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने, पद्मश्री पुरस्कार सन्मानित गिरीश प्रभुणे, माजी आयपीएस अधिकारी प्रवीण दीक्षित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुभवी कार्यकर्ते भास्कर ब्रम्हनाथकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीताताई गुंडे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्याम जाजू आणि लोकलढ्यातील अग्रणी शशिकांत कर्डेकर या सर्व मान्यवरांनी मुलाखत स्वरूपात झालेल्या इतर सत्रांमध्ये सहभागींना मार्गदर्शन केले.
लोकतंत्र हत्येला ५० वर्षे पूर्ण होत असताना योजलेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन केरळचे राज्यपाल आणि आणीबाणी काळात स्वत: तुरुंगवास भोगलेले मा. राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विनोद पवार, डॉ. जयंत कुलकर्णी, चर्चासत्राचे निमंत्रक सुजय पतकी आणि ठाणे भारत सहकारी बँकेचे संचालक सुहास मेहता व्यासपीठावर उपस्थित होते. तत्कालीन संघर्षामध्ये सक्रीय सहभागी असलेल्या मा. राजेंद्र आर्लेकर यांचा सत्याग्रही म्हणून सन्मानही यावेळी करण्यात आला. अनिर्बंध सत्तेसाठी, घराणेशाहीसाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार संपवण्यासाठी आणीबाणी लादली गेली, असे प्रतिपादन मा. आर्लेकर यांनी केले. तसेच ‘Yes, we deserve Democracy’ असे ठामपणे म्हणत, त्यांनी ‘हुकुमशाहीचा पराभव करणाऱ्या तत्कालीन भारतीय जनतेला आपण नमन करायला हवे’, असा आग्रही विचार मांडला. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी पुढील सत्रात लोकतंत्र हत्येची पार्श्वभूमी थोडक्यात विशद केली. लोकलढ्याचे स्वरूप, त्या वेळचे स्वतःचे आंदोलनातील अनुभव, त्या काळातील राजकीय - सामाजिक परिस्थिती आणि आणीबाणीचे भारतावर झालेले आंतरराष्ट्रीय दुष्परिणाम या मुद्द्यांच्या आधारे सहभागींशी संवाद साधला.
‘लोकतंत्र हत्या – ५० : आणीबाणी – आकलन, आव्हाने आणि जबाबदारी’ या विषयावरील विशेष युवा चर्चासत्र रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दि. २७ ते २९ जून २०२५ या कालावधीत योजण्यात आले होते. वर्ष १९७५ ते १९७७ या काळातील आणीबाणीचा लोकशाहीवरील आघात आणि त्या विरोधातील लोकलढा आजच्या ‘जेन झी’ पर्यंत (तरुण पिढीपर्यंत) पोहोचावा, या उद्दिष्टाने हे युवा चर्चासत्र प्रबोधिनीने आयोजित केले होते. आणीबाणी काळातील दमनतंत्र, संविधानाची मोडतोड, माध्यमे – विचारवंत - साहित्यिकांची भूमिका इत्यादी विषयांवर मुलाखतींच्या स्वरूपातील सत्रांमध्ये चर्चा झाली.
"ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. पाकिस्तानने पुन्हा काही चुकीचं पाऊल उचललं तर अशीच कारवाई होणार"
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींनी आज ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आज देशाला संबोधित केलं. त्यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे..
१) मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना, सशस्त्र बल आमच्या गुप्तचर यंत्रणा, वैज्ञानिक यांना प्रत्येक देशवासियांकडून सलाम करतो. आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असीम शौर्याचं प्रदर्शन केलं. मी त्यांच्या वीरतेला नमन करतो, त्यांचं धाडस, पराक्रम देशाच्या प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करतो
२) 2 एप्रिलला पहलगामध्ये दहशतवाद्यांनी जो निष्ठुरपणा दाखवला होता त्याने देश आणि जगाला धक्का दिला होता. सुट्टी साजरा करणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या परिवारासमोर, मुलांसमोर अतिशय निर्घृणपणे मारुन टाकणं हे दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता, क्रूरता होती. देशाच्या सद्भावनेला तोडायचा घाणेरडा प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही घटना खूप मोठी होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, प्रत्येक समाज, प्रत्येक पक्ष एका स्वरमध्ये दहशतवादविरोधात कडक कारवाईसाठी उभे राहिले. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी आणि त्यांची संघटनेला जाणीव झाली आहे की, आमच्या माता, भगिनींच्या माथ्यावरील सिंदूराला हात लावण्याचे काय परिणाम होतात हे पाकिस्तानला कळलं असेल.
३) ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. हे देशाच्या कोटी कोटी भावनेचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे च्या रात्री उशिरा, 7 मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिलं आहे. भारताच्या सेनेने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो. पण देश जेव्हा एकजूट होतो. भारत प्रथमची भावनेत असतो, तेव्हा असे निर्णय घेतला जातो...
४) भारताच्या कारवाईने पाकिस्तान खूप निराश झाला. याच निराशातून त्याने आणखी एक चुकीचं धाडस केलं. दहशतवाद्या विरोधात त्याने भारताची साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्तानने आमच्या शाळा, कॉलेज, गुरुद्वार, मंदीर, सामान्य नागरिकांच्या घरांना निशाणा बनवलं. पाकिस्तानने आमच्या सैन्यतळांना निशाणा साधला. पण आता पाकिस्तानचा चेहरा फाटला आहे. जगाने पाहिलं की, पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल कशाप्रकारे भारतासमोर उद्ध्वस्त झाली. भारताच्या सशक्त एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांना आकाशातच नष्ट केले. पाकिस्तानची तयारी सीमेवर होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला. भारताचे ड्रोन्स, मिसाईलने अचूकपणे हल्ला केला. भारताच्या वायुदलाने पाकिस्तानच्या त्या एअरबेसवर हल्ला केला ज्यावर त्यांना गर्व होता. भारताने तीन दिवसांत पाकिस्तानचं इतकं नुकसान केलं की, ज्याचा त्यांना अंदाज नव्हता..
५) पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याच विषयांवर चर्चा होऊ शकते. यापुढे दहशतवादी हल्ला केला तर सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल. अणू बॉम्बची धमकी भारत सहन करणार नाही. दहशतवाद्याची पाळमूळे असणाऱ्या ठिकाणी जावून कारवाई केली जाईल. भारतीय सैन्य आजदेखील अलर्ट मोडवर आहे.
#OperationSindoor
#Modi