खलनायक देवेंद्रजी !
बृहन्मुंबई महानगर पालिका लिपिक भरतीच्या जाहिरातीतील ३ जाचक अटींपैकी फक्त एकच अट मान्य करायचा आदेश देऊन मा. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या शासनाच्या GR कडे दुर्लक्ष करुन, राज्यातील प्रकल्पग्रस्त आणि एका भाषेत टाइपिंग परीक्षा पास असलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे.
आम्ही नवीन जाहिरात आल्यापासून @mybmc शी पाठपुरावा करत आहोत परंतु अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही.
मा. देवेंद्र जी,
लाखो उमेदवारांच्या भावनांशी खेळून तुम्ही काय साध्य करत आहात? हे अत्यंत घाणेरडे राजकारण खेळून तुम्हाला असुरी आनंद मिळतोय का?
तुमच्या या “खलनायकी” भूमिकेला महाराष्ट्रातील लाखो तरुण तरुणी कधीच माफ करणार नाहीत!
जाहीर निषेध !
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
#BMC_लिपिक_भरती #AAP
#महाराष्ट्र_द्रोही_भाजपा #DhananjayShinde
♦️धनंजयजी शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मा. विकास खरगे यांच्या सोबत बैठक आज बैठक संपन्न झाली.
मागील काही काळात धनंजयजी शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या प्रयत्नामुळे BMC भरतीच्या अटी बदलल्या गेल्या, राज्यसेवेत आयोगाला SEBC/EWS पर्याय उपलब्ध करून द्यावा लागला आणि कृषीच्या पदांचा राज्यसेवेत समावेश करण्यात आला.
मा. प्रधान सचिव यांच्या सोबतच्या बैठकीत मुख्यत्वे MPSC संयुक्त जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी सरकारने आयोगाला तत्काळ मागणीपत्रे पाठवावी असा आम्ही आग्रह धरला, त्यावर त्यांनी संबंधितांशी फोन व्दारे चर्चा करून सदर मुद्दा लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सरळसेवा पदभरतीत ZP चे अनेक निकाल आणि नियुक्त्या बाकी आहेत तो मुद्दा मांडला, ITI Instrutctor आणि शिक्षक भरती मधील उमेदवारांच्या नियुक्त्या, MIDC, आदिवासी विभाग, आणि इतर प्रलंबित परीक्षेच्या तारखा तत्काळ जाहीर करणे आणि शासनाने MPSC AMVI(RTO) पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठवून सदर जाहिरात प्रसिद्ध करावी, लेखा व कोषागारे विभाग भरती, नगरपरिषद भरती, विविध महानगरपलिकांची भरती, नवीन शिक्षक भरती ई. नवीन सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध करण्याची विनंती केली. याबाबत त्यांनी काही अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला.
आचार संहितेआधी शक्य त्या सर्व पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मागण्या केल्या आहेत, आपल्या पाठपुराव्यामुळे यापैकी काहींचे प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे. विद्यार्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती, धनंजयजी, आदित्यजी ठाकरे, रोहितजी पवार, अभिमन्यु पवारजी, श्रीकांतजी शिंदे, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, यशोमती ताई ठाकूर, विरोधी पक्ष नेते, बाळासाहेब आंबेडकरजी, रविकांत तुपकरजी, बच्चू कडूजी , कैलास पाटील जी आणि इतर अनेक विद्यार्थी आणि नेते प्रयत्न करत आहेत त्या सर्वांचे आभार.
@mieknathshinde@DrSEShinde @Dhananjay_AAP @mpsc_office@Dev_Fadnavis@AUThackeray@CMOMaharashtra@RRPSpeaks@AbhiPawarBJP@AAPMaharashtra
.
ITI इंस्ट्रक्टर भरती 2022
DVET ने 394 उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.
कोणताही न्यायालयीन अडथळा नसताना प्रशासन नाहक अडथळा निर्माण करून या उमेदवारांच्या भविष्याशी खेळत आहे.
@MPLodha@CMOMaharashtra
#BMC लिपिक भरती २०२४ : अत्यंत महत्त्वाचे अपडेट.
बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त मा. भूषण गगराणी जी व सहकाऱ्यांशी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिपत्रक निघावे यासाठी सकाळपासून पाठपुरावा सुरु आहे.
महानगर पालिकेने दहावी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याबाबतची अट रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे. अर्ज करण्यासाठी १० दिवसांची वेळ वाढवून मिळणार आहे. याबाबत परिपत्रक आज संध्याकाळ पर्यंत येणे अपेक्षीत आहे.
या यशस्वी लढाईत खंबीरपणे साथ देऊन अत्यंत सक्रियपणे सहभागी झाल्याबद्दल मा. आदित्य ठाकरे जी, मा. प्रीती शर्मा मेनन ताई, मा. अंजली दमानिया ताई, सर्व विद्यार्थी, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते + पदाधिकारी, सर्व सामाजिक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि समर्थक या सर्वांचे सामूहिक प्रयत्न करून मिळालेल्या ऐतिहासिक यशासाठी हार्दिक अभिनंदन 💐
लढे है, जिते है !!! 🇮🇳
@mybmc@AUThackeray@PreetiSMenon@anjali_damania@RealBacchuKadu@AAPMumbai@AAPMaharashtra
#BMC_लिपिक_भरती #BMC #DhananjayShinde
3/3 आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन असून मुंबई महापालिकेने तत्काळ पत्रक न काढल्यास,सबंध महाराष्ट्रातील उमेदवारांना न्याय देण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल. संबंधितांनी हा निर्वाणीचा इशारा समजावा
@mieknathshinde@DrSEShinde@Prksh_Ambedkar@mybmc @Dhananjay_AAP @ShivSenaUBT_
2/3 सत्ताधाऱ्यांनी किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला तर योग्य प्रतिउत्तर दिलं जाईल.
सत्ताधाऱ्यांचे गल्लीतले काही कार्यकर्ते #श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी याप्रश्नी याआधी प्रयत्न का केले नाहीत याचं उत्तर द्यावे.
1/3 #फडणवीसांच्या पत्राला किंमत आहे का नाही?की नगरविकास मंत्री #एकनाथ_शिंदे फडणविसांना डावलत आहेत?
#BMC मुंबई महापालिकेत अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती,तरीही अन्यायकारक अटी रद्द करण्याचे पत्रक न आल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत
@Dev_Fadnavis@AUThackeray
२/२ नगरविकास खात्याचे मंत्री याबद्दल काहीही बोलायला तयार नाही आणि आपणही पार गळ्यापर्यत पाणी आल्यानंतर निवेदन दिलं आहे. क्रेडिट च्या खेळात विद्यार्थांचा बळी जाता कामा नये. बाकी BMC साठी आधीपासून कोणी प्रयत्न केले ते जगजाहीर आहे. #BMC ने तत्काळ शुद्धीपत्रक काढावे ही आमची मागणी आहे.