ही बाब अत्यंत गंभीर आहे.
वर्ग 4 ची नियमित शासकीय पदे बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरली जात असतील, तर सर्वात मोठा फटका ग्रामीण, गरीब, शेतकरी, भूमिहीन मजूर आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसतो. शासकीय नोकरी ही केवळ नोकरी नसते; ती सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याची संधी असते. त्यामुळे कायमस्वरूपी शासकीय पदे कंत्राटी किंवा बाह्य यंत्रणेकडे देऊन तरुणांची संधी हिरावून घेणे हा त्यांच्या भविष्याशी अन्याय आहे.
अनुकंपा नियुक्तीसाठी मृत पदे पुनर्जीवित केली जात असतील, तर सरळ सेवा भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे का उपलब्ध करून दिली जात नाहीत?
सरकारने स्पष्ट करावे:
1. वर्ग 4 ची एकूण किती पदे रिक्त आहेत?
2. त्यापैकी किती पदे नियमित सरळ सेवा भरतीने भरणार आहेत?
3. किती पदे बाह्य यंत्रणेमार्फत देण्यात आली आहेत?
4. आणि पात्र तरुणांना कायमस्वरूपी सरकारी सेवेत संधी देण्याऐवजी कंत्राटी व्यवस्थेला प्राधान्य का?
महाराष्ट्रातील तरुणांना ठेकेदारांच्या माध्यमातून अस्थिर रोजगार नको आहे. त्यांना पारदर्शक प्रक्रिया, समान संधी आणि गुणवत्तेच्या आधारावर कायमस्वरूपी शासकीय नोकरीची संधी हवी आहे.
1. सरकारने वर्ग 4 ची रिक्त पदे तातडीने जाहीर करून नियमित सरळ सेवा भरती काढावी.
2. तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्या बाह्य यंत्रणेकडे देणे बंद करा.
ही केवळ वर्ग 4 पदांची मागणी नाही; हा महाराष्ट्रातील गरीब आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या हक्काचा प्रश्न आहे.
प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks@MahaDGIPR@INCMaharashtra@INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा@mpsc_office@CMOMaharashtra
@mpsc_office आयोगाने लवकरात लवकर "सरळसेवा परीक्षा योजना" प्रसिद्ध करावी आणि मेगाभरती बाबतच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्यात.
@bhimanwar@mpsc_office
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
आदरणीय @RRPSpeaks आपण एक आमदार आहात आणि ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा बेरोजगार उमेदवारांना आपली अत्यंत गरज आहे कृपया #MPSC सरसकट ऑफलाईन बाबत आपण मैदानात उतरून बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय (TPA) मधील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) पदाची नवीन जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करण्यात यावी हजारो विद्यार्थी जाहिरातीच्या प्रतीक्षेत. #TPA@MAHA_UDD@madhurimisal@mieknathshinde@CMOMaharashtra
अभ्यासिकेत वर्षांनुवर्षे अभ्यास करूनही केवळ आश्वासनेच मिळत आहेत
@Dev_Fadnavis साहेबांनी आकृतीबंधाचे काम सुरू करून दिशा दिली,पण काही विभागांची उदासीनता घातक आहे.
आता वेळ वाया न घालवता सर्व विभागांचे आकृतीबंध त्वरित पूर्ण व्हावेत आणि पदभरतीची जाहिरात निघावी, हीच मागणी
#Recruitment
ही फक्त गर्दी नाही ह्या आहेत विद्यार्थ्यांच्या भावना
लातूर येथे MPSC ऑनलाईन वर्गात झालेल्या भव्य आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
विद्यार्थ्यांचा रोष सरकारने गर्दीवरून समजून घ्यावा. हे तर लातूर आहे पुणे व संपूर्ण महाराष्ट्र अजून बाकी आहे
https://t.co/NWzNJqVXC9
#Latur : लातूरमध्ये #MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा ऑफलाईन #OMR पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
ऑनलाइन #CBT पद्धतीमुळे तांत्रिक अडचणी आणि समान संधीचा अभाव होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.
MPSC ऑफलाइन परीक्षा आंदोलन : दिवस ४
महत्त्वाची सूचना
CBD बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयाबाहेर MPSC परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ व प्रदेश पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ आज आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.
📍 स्थळ: MPSC मुख्यालय, CBD बेलापूर, नवी मुंबई
🗓 दिनांक: १२ जुलै २०२६
🕟 वेळ: सायंकाळी ४.३० वाजता
MPSC परीक्षा ऑनलाइन नव्हे, ऑफलाइनच घ्याव्यात ही राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
विद्यार्थांना न्याय देण्यासाठी कांग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar@mpsc_office
मी येतोय... तुम्ही येताय ना?
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आपला रोष व्यक्त करण्यासाठी लातूर येथे भव्य आंदोलन
दिनांक: १० जुलै २०२६,
वार शुक्रवार
वेळ: सकाळी ठीक ९:०० वाजता
स्थळ : Town हॉल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर