केंद्रीय खाद्य प्रसंस्करन, उद्योग मंत्री भारत सरकार तथा लोकजनशक्ती पक्ष चे राष्ट्रीय अध्यक्ष @iChiragPaswan यांनी सचखंड गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब या गुरुद्वाराला भेट देऊन शीख धर्मियांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांचे दर्शन घेतले त्याच्यासोबत
भारतीय संस्कृतीच्या अक्षय्य वटवृक्षाचे बीज रुजवणारे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
डॉक्टरांचे विचार आणि त्यांचे जीवनचरित्र आपल्या सर्वांना देशसेवेसाठी सदैव ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील.
#DrHedgewar#RSS#Founder#Inspiration #Nationalism #DrAjitGopchade
#BudgetSession2026
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या बळकटीकरणासाठी आज संसदेत आग्रही मागणी केली. विशेषतः 'पीएम सेतू' योजनेतंर्गत महाराष्ट्रातील नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचाही समावेश करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला .यासोबतच, भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेता सर्व ITI मध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चे अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याची सरकारची काय योजना आहे, यावरही चर्चा घडवून आणली.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांच्या हाताला तांत्रिक कौशल्य मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न निरंतर सुरू राहील.
#DrAjitGopchade #RajyaSabha #Maharashtra #ITI #SkillDevelopment #PMSetu #BudgetSession2026 #RajyaSabha #parlimemt
#NewDelhi @sansad_tv@BJP4India
हवाई क्षेत्रात तरुणांसाठी संधींची मागणी!
पहाडी, सीमावर्ती आणि आदिवासी भागातील मुला-मुलींना 'एअरपोर्ट ग्राउंड हँडलिंग' सारख्या क्षेत्रात संधी मिळावी यासाठी संसदेत मुद्दा मांडला.
मागास भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारकडे असलेल्या ठोस योजनेबाबत प्रश्न उपस्थित केले.
यावर मा. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि आयआयटी यांच्या माध्यमातून कौशल्यांचे मॅपिंग करून, स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
#Parliament #Aviation #Jobs #DrAjitGopchade #SkillIndia #BudgetSession2026 #RajyaSabha
@narendramodi@AmitShah@NitinNabin@RamMNK@mohol_murlidhar
देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नवी ताकद!
मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे CAPF जवानांना मिळाला हक्काचा न्याय. सीआरपीएफ पासून एसएसबी पर्यंत सर्व दलांसाठी आता एकसमान आणि पारदर्शक प्रशासन.
सुरक्षित भारत, समृद्ध भारत!
#NationalSecurity#NewIndia#NationFirst#DrAjitGopchade #ViksitBharat
देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या माझ्या वीर जवानांचा आम्हाला अभिमान आहे!
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जवानांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. 'ई-आवास' पोर्टल आणि 'आयुष्मान CAPF' योजनेच्या माध्यमातून आता जवानांना हक्काचे घर आणि कॅशलेस उपचारांची सुविधा मिळत आहे. जवानांचा सन्मान आणि सुरक्षा, हेच आमचे ध्येय!
#BJP #NarendraModi #IndianArmy #CAPF #DrAjitGopchade
जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
तसेच या अपघातात जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
भावपूर्ण श्रद्धांजली!
राज्यसभेत 'समुद्री सुरक्षा आणि संशोधन' या विषयावर महत्त्वपूर्ण प्रश्न मांडला..
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित केल्या, तोच वारसा पुढे नेत आजचे केंद्र सरकार समुद्री संसाधनांचे रक्षण आणि संशोधनावर भर देत आहे. डीप ओशन मिशन आणि गगनयान यांसारख्या ऐतिहासिक मोहिमांच्या माध्यमातून भारत नवी उंची गाठण्यास सज्ज आहे.
#RajyaSabha #MaritimeSecurity #DeepOceanMission #IndiaProgress #DrAjitGopchade @DrJitendraSingh
A follow-up meeting with Hon’ble MP @Drajeetgopchade ji carried forward earlier discussions on key health areas. DG, ICMR, apprised him of research advances & enhanced budget allocation. Discussions were held on strengthening coordination & translation to public health outcomes.
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी "मन की बात" कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार.
दिनांक: 29 मार्च 2026
वेळ: सकाळीं 11 वाजता
#ManKiBaat#मन_की_बात@mannkibaat
A welcome and timely decision by the Government to reduce special excise duty on Petrol & Diesel by ₹10 per litre, bringing much-needed relief to the common citizen amid rising global crude prices due to the West Asia situation.
This reflects a strong commitment to ease the burden on people and prioritize public welfare. Let’s amplify this positive step and ensure it reaches every corner. 🇮🇳
#FuelRelief #PeopleFirst #GoodGovernance @BJP4Maharashtra@BJP4India@narendramodi
राज्यसभेतील अधिवेशनात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि पावसावर अवलंबून असलेल्या शेतीविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील कृषी समस्यांकडे विशेष लक्ष वेधण्यात आले.
मराठवाडा, विशेषतः नांदेड जिल्हा, कमी पर्जन्यमान, पाणी साठवण क्षमता कमी असलेली जमीन आणि पावसावर अवलंबून असलेली शेती यामुळे विविध अडचणींना सामोरे जात आहे. हैदराबाद येथील संस्थांपर्यंत शेतकऱ्यांची पोहोच मर्यादित असल्याने, नांदेड येथे Central Research Institute of Dry Land Agriculture (CRIDA) चे कॅम्प कार्यालय किंवा शाखा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होऊन त्यांच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल.
#Agriculture #Farming #Nanded #Marathwada #CRIDA #PeopleFirst #BudgetSession2026 #DrAjeetGopchade #GoodGovernance
मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करून ते सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन केंद्रीय मंत्र्यांना दिले. यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीशजी महाजन हेही उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विकास कामे पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या कामाला आता गती मिळणार आहे.
नांदेड–पुणे आणि नांदेड–हैदराबाद वंदे भारत ट्रेन तात्काळ सुरू करण्यात यावे . धर्माबाद रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा. नांदेड–बिदर नवीन रेल्वेमार्गाच्या कामास महाराष्ट्रातील भागात तातडीने सुरुवात करावी . बोधन–बिलोली–नरसी–लातूर रोड (134 किमी) या नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी केली.
नांदेड - बीदर या रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक व तेलंगणा राज्य सरकारांशी समन्वय साधून त्यांच्या 50 टक्के खर्चाच्या वाट्याबाबत आवश्यक पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. शिवाय मुदखेड–धर्माबाद (49 किमी) आणि परळी वैजनाथ–लातूर रोड–उदगीर (96 किमी) या रेल्वे मार्गांना हैदराबाद व सिकंदराबाद विभागातून नांदेड रेल्वे विभागात समाविष्ट करण्याचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे प्रस्ताव मांडण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले. या पुढाकारामुळे मराठवाडा, विशेषतः नांदेड परिसरात रेल्वे जाळ्याचा विस्तार आणि प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
#BJP #Railways #Nanded #ashwinivaishnaw #GirishMahajan @AshwiniVaishnaw@girishdmahajan
भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर उत्तर विधानसभा नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 इच्छुक उमेदवारांची मुलाखत
होऊ घातलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माझ्या अंत्योदय जनसंपर्क कार्यालय घेण्यात आल्या.त्याप्रसंगी मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे, माजी मंत्री डी.पी. सावंत, नांदेड महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. चैतन्य बापू देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या वतीने लढू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@cbawankule@save_atul@RaviDadaChavan@AshokChavan1958