दिवस येतो दिवस जातो
आठवणींचा ओहोळ वाहतो..
पाणी तर आटून जाते पण,
डोळ्यांत भूतकाळ दाटतो
आयुष्य ईतकेसे लाभलेले
नाही त्याचा भरोसा
राग मनी मग का धरावा
जन्म पुन्हा नाही असा
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
झाले गेले विसरून जावे
भावना तर या देहाच्या
त्यापलीकडचे गीत गावे..
#म#मराठी
तू पाहूनही पाठ फिरवणे
मनात असूनही अबोला धरणे
लाख इंगळ्या डसतात,
तडफड व्हावी पाण्याविना,
असेच काही माझेही,
तुझ्याविना,
मरणप्राय वेदना,
कदाचित,
कधीतरी तू समजशील,
मात्र तेव्हा,
नसेल मी नजरेच्या टप्प्यात,
शोधून बघ तेव्���ा,
या निरभ्र आकाशात,
भेटेल एखादी पाऊलखुण
#म
#मराठी
#कविता
सवडीतील नको
आवडीतील प्रेम हवेय मला
माझ्यासाठी सतत
धडधडनारे मन हवेय मला
माझं तर आहे
हा�� ठेवतो छातीवर
प्रेम माझं फक्त
फक्त आहे तुझ्यावर
नाही जगणे आता
याहून वेगळे काही
हा रंग या प्रीतीचा
म्हणुन लाल तर नाही ..
#म
#मराठी
#कविता
@HrutaC आता त्याने सांगितले माझ्या संपर्कात बायको,सासू,सासरे आणि मेहुणा पण आला होता..नगरपालिका गाडी परत एकदा घरी आली..सर्वांना बरोबर घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली..आता त्याने तिला विचारले "काय कशी काय आहे चव "
तिला आता पाणीदेखील कडू लागतेय..😀😀😀
कधी कधी एखाद्याचा मिळत असलेला उदासीन प्रतिसाद पाहून वाटतं की आपण आपल्या भावनांचे ओझे त्यांच्यावर लादत तर नाही ना..आणि आपल्या प्रत्येक भावना समोरच्याने समजाऊन घेतल्याच पाहिजेत हा अट्टाहास देखील एक प्रकारे त्यांच्यावर आणखी एक भावना लादण्याचा प्रकार..
#म#मराठी#विचार