प्रथम "बाबूलाल डाटा कलागौरव" पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर आणि प्रसिद्ध ढोलकी वादक निलेश परब.
पुरस्कार प्राप्त दोन्ही कलाकारांच्या प्रतिक्रियांचा हा संपादित अंश.
बाबूज् लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा यांना ८० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यांचे संचालक श्री प्रशांत डाटा यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने "बाबूलाल डाटा कलागौरव" पुरस्कार सुरू केला आहे.
ज्यांना कार्यक्रम बघता आला नाही त्या प्रेक्षकांची आम्ही विनम्र माफी मागतो.
बाबूज लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा परिवारातर्फे सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांचे आभार आणि प्रथम "बाबुलाल डाटा कलागौरव" पुरस्कार प्राप्त दोन्ही कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन.
श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते प्रथम "बाबूलाल डाटा कलागौरव" पुरस्कार प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर आणि प्रसिद्ध ढोलकी वादक निलेश परब यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरणानंतर प्रशांत डाटा प्रस्तुत "मेलडीयस मंगेशकर्स" हा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. एमइएस चे बाल शिक्षण मंदिर ऑडिटोरियम मध्ये झालेल्या कार्यक्रमात फक्त हाऊसफुल्लच प्रतिसाद मिळाला नाही तर अनेक प्रेक्षकांना जागे अभावी माघारी जावं लागलं.
बाबूज् लक्ष्मीनारायण बेस्ट चिवड्याला ८० वर्ष पूर्ण होत असताना आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो पुणेकरांप्रति, जगभरात पोहोचलेल्या चिवड्याच्या चाहत्यांप्रति. कारण बेस्ट बनतं ते फक्त गुणवत्तेने नाही तर त्यासोबत जोडलेल्या आठवणींनी. त्यातल्या आपुलकीनी.
९ एप्रिल १९४५. लक्ष्मीनारायणजी डाटा यांनी हातगाडीचा परवाना मिळवला ती तारीख. हातगाडी पासून सुरू झालेला हा प्रवास आज जगभरात पोहोचलेला आहे. ही कहाणी आहे ८० वर्षाच्या रंजक प्रवासाची. ही कहाणी आहे खवय्या पुणेकरांच्या विश्वासाची.
आज त्यांची चौथी पिढी लक्ष्मीनारायणजींची लिगसी पुढे नेत आहे. प्रशांत डाटा यांचा मुलगा धिमान डाटा हे तरुण वयातच व्यवसाय वाढीसाठी कष्ट घेत आहेत.
बाबूज् लक्ष्मीनारायण बेस्ट चिवड्याला जी युनिक टेस्ट आहे, गुणवत्तेत सातत्य आहे हे सर्व या चारही पिढ्यांच्या कष्टाचेच फळ म्हणावे लागेल.